मुगल वंशाचा महान योद्धा बाबर चा इतिहास

Babar Marathi Mahiti

भारतावर जवळ-जवळ 300 वर्ष मोगलांची सत्ता होती, या दरम्यान मोगल साम्राज्याचे अनेक महान आणि परमवीर योद्धा आले ज्यांचे वर्णन भारतीय इतिहासात आपल्याला पहायला मिळते. परंतु मुगल वंशाचा बाबर हा केवळ महान योद्धाच नव्हता तर सर्वात महान शासक देखील होता, ज्याने मुगल राजवटीचा पाया रचला.

महान शासक बाबर चा इतिहास – Babar History in Marathi

Babar History in Marathi
Babar History in Marathi

बाबर विषयी संक्षिप्त माहिती – Babar Information in Marathi

नाव (Name) जहीर-उद-दीन मुहम्मद बाबर
जन्म (Birthday) 14 फेब्रुवारी 1483 (अन्दिझान, उज्बेकिस्तान)
आई (Mother Name) कुतलुग निगार खानुम
वडील (Father Name) उमर शेख मिर्जा 2, फरगाना चे शेख
पत्नी (Wife Name)
 • महम बेगम,
 • गुलरुख बेगम,
 • दिलदार बेगम,
 • मुबारका युरुफझाई,
 • गुलनार अघाचा
मुलं-मुली(Child)
 • हुमायु,
 • कामरान मिर्जा,
 • अस्करी मिर्जा,
 • हिंदल ,मिर्जा,
 • फख्र-उन-निस्सा,
 • गुलरंग बेगम,
 • गुलबदन बेगम,
 • गुलचेहरा बेगम,
 • अल्तून बिषिक,
 • कथित बेटा
भाऊ (Brother Name) चंगेज खान
मृत्यू (Death) 26 डिसेंबर 1530 (आग्रा, मुगल साम्राज्य)

बाबर विषयी महत्वपूर्ण माहिती – Babar Biography in Marathi 

बाबर हे भारताचे पहिले मुगल सम्राट होते त्यांचे पूर्ण नाव जहिरुद्दिन मोहम्मद बाबर होते. बाबर फरगाना घाटी चे शासक उमर शेख मिर्जा यांचा सर्वात मोठा मुलगा, वडिलांच्या मृत्यू पश्चात वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी राज्यकारभाराची सूत्र त्यांच्या हाती देण्यात आली. 

त्यांनी भारतीय उपमहाद्वीपावर आपले लक्ष्य केंद्रित केले आणि इब्राहीम लोधीचे शासन असलेल्या दिल्लीवर हल्ला केला व पानिपत च्या पहिल्या युद्धात इब्राहीम लोधीला पराजित केले. भारतात मुगल साम्राज्याची सुरुवात झाली. पुढे मेवाडच्या राणा सांगा यांच्या विरोधाचा बाबरला सामना करावा लागला. त्यांनी बाबर ला विदेशी समजून आव्हान दिले, बाबर ने खानवा येथील युद्धात राणा सांगा ला पराजित केले. एक महत्वाकांक्षी योध्या व्यतिरिक्त बाबर एक प्रतिभावान कवी आणि निसर्गप्रेमी देखील होते.

बाबरला मिळाले भारतात येण्याचे निमंत्रण – Babar Received Invitation to visit India

मोगल सम्राट बाबरला मध्य एशियात आपले साम्राज्य पसरविण्याची इच्छा होती पण त्यात तो अपयशी ठरला. पण त्याच्या इच्छाशक्ती ने त्याला कधी पराजित होऊ दिले नाही त्यामुळे जेंव्हा त्याची नजर भारतावर पडली त्यावेळी  भारताची राजकीय स्थिती विखुरलेली होती. या परिस्थितीचा बाबर ने फायदा उचलला आणि भारतात आपले साम्राज्य प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला. त्या सुमारास दिल्लीचा सुलतान अनेक युद्ध लढत असल्याने एकंदरीत परिस्थिती अस्ताव्यस्त झालेली होती.

बाबर ने आपले आत्मचरित्र बाबरनामा‘ त देखील पाच मुस्लिम शासक आणि दोन हिंदू शासकांचा उल्लेख केला आहे. दिल्ली, मालवा, गुजरात आणि बहमनी मुस्लिम शासकांच्या ताब्यात होते तर मेवाड आणि विजयनगर हिंदू शासकांच्या. मुगल बादशहा बाबर ने आपल्या बाबरनामा या आत्मकथेत विजयनगर चे तत्कालीन शासक कृष्णदेव राय यांना समकालीन भारताचे सर्वाधिक बुद्धिमान आणि शक्तिशाली सम्राट म्हंटले आहे.

बाबर च्या शौर्याने आणि त्याच्या कुशल शासनाने ते प्रभावित झाले होते, त्यामुळे दौलत खां लोधी आणि इब्राहीम चे काका आलम खान यांनी मुगल सम्राट बाबर ला भारतात येण्याचे निमंत्रण पाठवले.

त्याने हे आमंत्रण आनंदाने स्वीकारले कारण दिल्लीवर त्याची पूर्वीपासून नजर होती. या आमंत्रणात आपला फायदा दिसल्याने, मोगल साम्राज्याचा विस्तार भारतात करण्याकरता बाबर दिल्लीला गेला. 

पानिपत च्या युद्धात बाबर चा विजय – Battle of Panipat

पानिपत चे पहिले युद्ध बाबर ची सर्वात मोठी लढाई होती. हे युद्ध एप्रिल 1526  ला सुरु करण्यात आले होते जेंव्हा बाबर च्या सैन्याने उत्तर भारतात लोधी साम्राज्यावर हल्ला केला होता. या युद्धासाठी इब्राहीम लोधीचे काका आलम खान आणि पंजाब च्या सुभेदारांनी बाबरला आमंत्रित केले होते. कुशल शासक बाबर ने या युद्धात उतरण्यापूर्वी 4 वेळा पूर्णपणे याची खात्री केली होती.

राणा सांगा विरुद्ध खानवा चे युद्ध – Battle of Khanwa

खानवा चे युद्ध देखील मुगल सम्राट बाबर ने लढलेल्या प्रमुख युद्धापैकी एक होते. बाबर ने हे युद्ध खानवा नजीक राणा सांगा विरुद्ध लढले होते.

राणा सांगा मुगल सम्राट बाबर ला विदेशी मानत होते आणि त्यांना वाटायचे की बाबर ने काबुल ला परत जावे, म्हणून त्यांनी बाबरच्या भारतातील शासनाचा विरोध केला व बाबर ला भारता बाहेर काढण्याकरता व सोबतच दिल्ली आणि आग्रा ला जोडून आपल्या क्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला… खानवा चे युद्ध 17 मार्च 1527 ला लढल्या गेले, बाबर च्या सैन्याने या युद्धात नव्या उपकरणांचा प्रभावीपणे उपयोग केला आणि राजपूत नेहमीप्रमाणे हे युद्ध लढले परिणामी राणा सांगा आणि त्याच्या सैन्याचा यात पुरता पराभव झाला.

मुगल बादशहा बाबर चा मृत्यू – Babur Death

आपल्या अखेरच्या क्षणांपर्यंत बाबर ने जवळ-जवळ भारतातील अधिकाधिक भागात मुगल साम्राज्याचा विस्तार केला होता. बाबर ने पंजाब, दिल्ली, बिहार जिंकले होते. आपल्या मृत्युपूर्वी त्याने आपली आत्मकथा बाबरनामा लिहिली होती ज्यात आपल्या शौर्याच्या लहान मोठ्या गोष्टींचा त्याने उल्लेख केला होता. त्यासोबतच बाबरनामा मधे जीवनातील लहान मोठ्या सर्व युद्धांचा देखील उल्लेख केला होता.

1530 मधे बाबर चा मृत्यू आजारपणा मुळे झाला. त्याचे अंतिम संस्कार अफगाणिस्तान येथे करण्यात आले. बाबर च्या मृत्युनंतर त्याचा मुलगा हुमायु ला मुगल साम्राज्याचा उत्तराधिकारी बनविण्यात आले व त्याने दिल्ली च्या सिंहासनावर राज्य केले…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top