बाजरी ची माहिती

Bajra Chi Mahiti

आरोग्यमं धन संपदा हे आपण नेहमी ऐकत राहतो. याचाच अर्थ आपले आरोग्य चांगले असणे ही सगळ्यात मोठी संपती आहे. आपल्या रोजच्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे प्रथिने, लोह, विटामिन असलाच हवे. आज आपण बाजरी या धान्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत,

बाजरी ची माहिती – Bajra Information in Marathi

Bajra Information in Marathi
Bajra Information in Marathi
बाजरी चे विविध नाव: Bajara, बाजरा, वजान्न
शास्त्रीय नाव: Pennisetum Typhoidem,
धान्याचे प्रकार: तृणधान्य
हंगाम: खरीप
बाजरीचे उत्पादन: भारत आणि आफ्रिका या देशात
बाजरीमध्ये असणारी पोषक तत्व: कॅल्शियम, कर्बोदके, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, कॅलरी, फायबर, विटामिन बी6, पोटॅशियम,

Pennisetum Typhoidem, Bajara, बाजरा, वजान्न अशा नावांनी प्रसिद्ध असणारे बाजरी हे काळसर, राखाडी रंगाचे एक धान्य पौष्टिक आहे.

महाराष्ट्रामध्ये संक्रांतीला तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि वांग्याची भाजी असा मेन्यू तोंडाला पाणी सुटेल असा असतो.

बाजरीची निर्मिती:

बाजरीच्या कणसाला ओंबी म्हणतात. बाजरीच्या पांढरी, देशी तसेच हायब्रीड अश्या तीन जाती असतात. आफ्रिका आणि भारत या देशांत बाजरीचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

भारतात महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेशात बाजरी मोठ्या प्रमाणात पिकते. बाजरीची भाकरी, गूळ, तूप व उडदाची डाळ हे खूप पौष्टिक आहे. बाजरीचा वापर लोणी व तूप यांसह करावा.

बाजरीची पौष्टिकता – Bajra Benefits

  • म्हशीच्या दुधा सोबत बाजरीची भाकरी खाल्याने शरीराला पुष्टी येते व लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी हे अन्न पूरक ठरते.
  • बाजरी उष्ण असल्याने ती थंड वातावरणात म्हणजेच हिवाळ्यात व पावसाळ्यात खावी.
  • बाजरीपासून बनविलेले दिवे, उंडे, खिचडी, चकोल्या बनवल्या जातात ज्या बलवर्धक असतात. .
  • बाजरीचे सेवन बाळंतिणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. आरोग्य राखण्यास तसेच मातेला भरपूर दूध येण्यास ते उपयोगी ठरते. .
  • बाजरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स व वर्गीय जीवनसत्वे, फायको केमिकल्स आढळतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.
  • बद्धकोष्ठता असल्यास उन्हाळ्यात बाजरी टाळावी.
  • बाजरी ही बलकारक, उष्ण, अग्निदीपक, कफनाशक मानली जाते.

बाजरी बद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – FAQ About Bajra

1. बाजरीचा रोजच्या जेवणात समावेश करू शकतो का?
उत्तर: हो, बाजरीचा उपयोग रोजच्या जेवणात असायलाच हवा.

2. बाजरी ही गव्हापेक्षा आरोग्यासाठी चांगली आहे का?
उत्तर: बाजरी मध्ये गव्हापेक्षा कमी कलरीज असल्यामुळे ती वजन कमी करण्यास मदत करते त्यामुळे गव्हा पेक्षा बाजरी खाणे उत्तमच.

3. बाजरी कधी खाणे चांगले आहे?
उत्तर: बाजरी ही उष्ण असल्यामुळे ती शक्यतोवर हिवाळा किवां पावसाळ्यात खाणे चांगले असते.

4. बाळंतिण बाजरी खाऊ शकते का?
उत्तर: हो नक्की खाऊ शकते. बाजरी ही बाळंतीणी अतिशय उत्तम आहार आहे.

5. बाजरीच पिक कोणत्या देशात जास्त होते?
उत्तर: बाजरीच पिक भारत आणि आफ्रिका या देशात जास्त प्रमाणात घेतले जाते.

6. बाजरी पीक कोणत्या राज्यात जास्त होते?
उत्तर: बाजरीच पिक भारतील महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here