बाळापुर किल्ला इतिहास

Balapur Fort Information in Marathi

इतिहास कालीन कालखंडात विदर्भाची ओळख वऱ्हाड प्रांत म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या प्रांताबाबत ऐतिहासिक माहिती सुद्धा मिळते. त्यानुसार, वऱ्हाड प्रांतातील आकोला या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून या जिल्ह्याच्या भागात पूर्वी अनेक शासकांनी शासन केलं आहे. त्यानुसार, अकोला जिल्ह्यात असलेल्या बाळापुर या तालुक्याच्या ठिकाणी पूर्वी मुघलांचे राज्य होते अशी इतिहास कालीन माहिती मिळते.

याबाबत सांगायचं म्हणजे मन आणि म्हैस (महिषी) नद्यांच्या संगमावर वसलेला बाळापुर येथील पुरातनकालीन किल्ला व या किल्ल्याच्या शेजारी मन आणि म्हैस नदीच्या तीरावर वसलेले बाळादेवीचे मंदिर. देवीच्या नावावरूनच गावाचे नाव बाळापुर असे पडले.

या किल्ल्याबाबत मिळालेल्या ऐतिहासिक माहितीनुसार, इ.स. १७२१ साली मुघल शासक औरंगजेब यांचा दुसरा मुलगा शहजादा आजमशहा यांनी या किल्ल्याचा पाया रचला असून त्यांचे पूर्ण बांधकाम अचलपूर येथील नवाब इस्माईल खान यांनी इ.स. १७५७ साली पूर्ण केले होते.

बाळापुर किल्ला इतिहास – Balapur Fort Information in Marathi

Balapur Fort Information in Marathi
Balapur Fort Information in Marathi

किल्ल्याबाबत थोडक्यात माहिती – Balapur Killa Mahiti Marathi

मन आणि म्हैस नद्यांच्या मध्यभागी असलेल्या किल्ल्याला दुहेरी बंधनाची भक्कम स्वरुपाची तटबंदी असून, जागोजागी बुलंद आणि उंच बुरुजाची बांधणी करण्यात आली आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेश द्वार उत्तर देशेला असून, या प्रवेश मार्गात तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरसाकृती असून त्याचे बांधकाम भक्कम बुरुजामध्ये केले गेले आहे.

या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यास दुसरा दरवाजा पडतो तो दरवाजा पश्चिम मुखी आहे. इतिहास कालीन हे लाकडी दरवाजे आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही दरवाज्यांच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाज्यांमधून आत प्रवेश केल्यानंतर आपणास दोन्ही बाजूला तटबंदी केलेली दिसते व समोरच्या दिशेने उत्तराभिमुख दिशेने तिसरा दरवाजा दृष्टीस पडतो.

या दरवाज्याच्या कमानीवर सुद्धा महिरप केले आहे. किल्ल्याच्या प्रवेश द्वाराची रचना करण्याबाबत थोडक्यात सांगायचं म्हणजे किल्ल्याच्या प्रवेश द्वारांची रचना उत्तर-पश्चिम- उत्तर अश्या स्वरुपात केली आहे. या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यास आपणास तटबंदी चढण्यासाठी जागोजागी पायऱ्यांच्या रांगा दिसतात. या किल्ल्यावर असलेल्या तटबंदीची रुंदी सुमरे तीन मीटर इतकी आहे.

पावसाळ्यात नदीला येत असलेल्या पुरामुळे किल्ल्याला तिन्ही बाजूनी पाण्याचा विळखा बसतो. सन २००० साली आलेल्या पुरामुळे किल्ल्याच्या तटबंदीचा काही भाग कोसळला होता. सन २९ ऑगस्ट १९१२ साली राज्य सरकारने या किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या यादीत समाविष्ट केलं होत. परंतु, आजगत या किल्ल्याची कुठल्याच प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नाही.

किल्ल्याबाबत विशेष माहिती – Balapur Fort History

  • इ.स. १६६५ साली मुघल शासक औरंगजेब यांनी जेंव्हा राजा जयसिंग यांना शिवाजी महाराज यांच्यावर स्वारी करण्यासाठी दक्षिणेच्या मोहिमेवर पाठविले होते तेंव्हा नदीच्या काठावर राजा जयसिंग यांनी भव्य छत्रीचे बांधकाम केले होते. नदीच्या पुरामुळे छत्रीचे नुकसान झाल्याने राजा जयसिंग यांनी सुमारे तीन हजार रु. खर्च केले होते.
  • राजा जयसिंग यांच्या सोबत झालेल्या पुरंदरच्या तहानुसार महारज बाळ संभाजी राजे यांना घेऊन आग्ऱ्याला गेले. आग्ऱ्यावरून सुटून आल्यानंतर त्यांनी मुघल बादशाहा यांच्यासोबत नमते धोरण पत्कारून तह केला. या तहानुसार, बादशाहने संभाजीराजे यांना सात हजाराची मनसबदारी बहाल केली. या मनसबदारीच्या सैन्य खर्चासाठी वऱ्हाड आणि खानदेश प्रांत मिळून पंधरा लाख होनांची जहांगिरी दिली होती. वऱ्हाड प्रांतातील परगणाचा तो भाग म्हणजे बाळापुर हा होय.

किल्ल्याच्या भेटीला जाण्याचा मार्ग – How to reach Balapur Fort

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापुर या तालुक्याच्या ठिकाणी मन आणि म्हैस नदीच्या काठी हा किल्ला असून, बाळापुर हा तालुका अकोला खामगाव मार्गाशी जोडला गेला आहे. त्यामुळे याठिकाणी जाण्यास सर्व प्रकारची सोय उपलब्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top