बेसबॉल खेळाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती

Baseball Information in Marathi

मित्रांनो आपण सर्वांना क्रिकेट खेळाविषयी माहिती असेलच. जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय खेळांमधील क्रिकेट हा सुद्धा एक खेळ आहे. परंतु अगदी क्रिकेटशी साधर्म्य असणारा तितकाच जगप्रसिद्ध असणारा आणखी एक खेळ म्हणजे बेसबॉल.

अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ म्हणून प्रसिद्ध असणारा बेसबॉल हा खेळ संपूर्ण जगभरात खेळला जातो. तसेच या खेळाच्या अनेक जागतिक स्पर्धा सुद्धा पाहायला मिळतात.

बेसबॉल खेळाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती – Baseball Information in Marathi

Baseball Information in Marathi
Baseball Information in Marathi

बेसबॉल खेळाचा इतिहास – Baseball History in Marathi

बेसबॉल खेळाचा शोध कुणी आणि कुठे लागला याबद्दल खूप मतभेद पाहायला मिळतात. परंतु उपलब्ध माहितीनुसार हा खेळ सर्वात आधी अब्नेर डौब्ले या अमेरिकी नागरिकाने शोधल्याचे समजते. १८३९ साली या खेळाचा शोध लागला.

बेसबॉल खेळासाठी लागणारे साहित्य – Baseball Equipment

या खेळासाठी आपल्याला एक फळी (बॅट), चेंडू (बॉल), हेल्मेट आणि हातमोजे (ग्लब्स) लागते. याशिवाय हा मैदानी खेळ असल्याकारणाने मैदान सुद्धा खूप गरजेचे आहे.

बेसबॉल खेळाचे मैदान – Baseball Court or Ground

Baseball Court
Baseball Court

मैदानाला इनफिल्ड आणि आउटफिल्ड अशा दोन भागांत विभाजित केलेले असते. मैदानावर चार बेस म्हणजेच घर असतात. यावरूनच खेळाचे नाव बेसबॉल पडले आहे. हे मैदान डायमंड आकाराचे असते. चार बेसपैकी एक बेस पंचकोनी तर इतर ३ चौरस असतात. पंचकोनी बेसला होम प्लेट म्हणतात. या बेसवर फलंदाज उभा राहुन फलंदाजी करतो. होम प्लेट पासून ६० फुट ६ इंचावर पिचर प्लेट असते. येथून गोलंदाज बॉल फेकतो.

प्रत्येक बेसमधील अंतर ९० फुटांचे असते. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हे अंतर बदलत राहते.

बेसबॉल खेळाचे नियम – Baseball Rules in Marathi

या खेळत दोन संघ असतात. एक संघ क्षेत्र रक्षण करतो तर दुसरा फलंदाजी करतो. फलंदाजाला (हिटर) होम प्लेट वर उभं राहून गोलंदाजाने (पिचर) फेकलेल्या बॉलला फटका मारावा लागतो. फटका मारल्यानंतर हिटर पहिल्या घराकडे धाव घेतो. आणि अशा प्रकारे धावा केल्या जातात. जसा क्रिकेट मध्ये षटकार मारला जातो तसा या खेळत होम रन घेण्यात येतो. होम रनमध्ये बॉल हा प्रेक्षकांमध्ये जातो आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्तीत जास्त ४ धावा मिळू शकतात.

क्षेत्ररक्षण करणारा संघ हिटरने मारलेला बॉल झेलण्याचा प्रयत्न करतो. जर तसे झाले तर हिटर बाद होतो. जर असे झाले नाही तर खेळाडू बेसकडे बॉल फेकून हिटर किंवा हिटरच्या संघातील मैदानावरील इतर खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतात.

हा खेळ एकूण ९ डावांमध्ये खेळला जातो. ज्यामध्ये प्रत्येक संघातील ३ गडी बाद झाल्यानंतर डाव बदलतो. शेवटच्या डावापर्यंत ज्या संघाची धावसंख्या जास्त तो संघ विजयी ठरतो. जर दोन्ही संघांची धावसंख्या सारखी असेल तर एक निर्णायक खेळ खेळला जातो.

बेसबॉल खेळातील खेळाडू – Players in Baseball

हा खेळ दोन संघांत खेळला जातो. प्रत्येक संघात ९ खेळाडू खेळतात.

भारतीय बेसबॉल खेळाडू – Indian Baseball Players

  1. दिनेश पटेल
  2. रिंकू सिंह इ.

बेसबॉल खेळाबद्दल विचारल्या जाणारे काही महत्वाचे प्रश्न – Baseball Questions and Answers

१. बेसबॉल खेळातील प्रत्येक संघात किती खेळाडू असतात?

उत्तर: ९ खेळाडू.

२. बेसबॉल हा ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट आहे का?

उत्तर: बेसबॉल हा ऑलिम्पिक मधील मुख्य खेळ नाही तथापि काही ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये या खेळला समाविष्ट केले गेले आहे.

३. बेसबॉल हा कुठल्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

उत्तर: अमेरिका

४. भारतात बेसबॉल खेळला जातो का?

उत्तर: जरी भारतात बेसबॉल खेळ खूप प्रसिद्ध नसला तरी काही ठिकाणी तो खेळला जातो.

५. बेसबॉल खेळामध्ये फलंदाज आणि गोलंदाजाला काय म्हणतात?

उत्तर: बेसबॉल खेळामध्ये फलंदाजाला हिटर आणि गोलंदाजाला पिचर म्हणतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top