Wednesday, July 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

 बेगम हजरत महल यांचा जिवन परिचय

Begum Hazrat Mahal

आपल्या भारताचा इतिहास अनेक शुरवीरांच्या पराक्रमांनी गाजलेला आणि त्यांच्या रणांगणातील गाथांनी व्यापलेला आहे.

भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतुन स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता आजही झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडु, अरूणा असफ अली, सारख्या साहसी आणि शुर महिलांचे अभिमानाने स्मरण केले जाते.

या पराक्रमी महिलांमध्ये एक नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे ‘बेगम हजरत महल’ यांचे.

बेगम हजरत महल यांनी 1857 ला झालेल्या लढाईत आपली उत्तम संघटन शक्ती आणि शौर्याच्या जोरावर ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणले होते.

इंग्रजांच्या तावडीतुन लखनौ ला वाचविण्याकरता शुरयोध्दयाप्रमाणे ती लढली व अनेक क्रांतिकारी पाऊलं उचलत इंग्रजांना आपल्या पराक्रमाचा परिचय करून दिला.

वाजिद अलि शाह या अवधच्या शासकाची ती पहिली बेगम होती, तीला अवधची आन-बान-शान मानले जात असे.

बेगम हजरत महल सैन्य आणि युध्द कौशल्यात निपुण होती ती स्वतः युध्दाच्या रणांगणात जाऊन आपल्या सैनिकांना प्रशिक्षीत करत असे शिवाय युध्दात विजय मिळविण्याकरीता त्यांचा उत्साह वाढवीत असे.

तिच्यात आदर्श आणि कुशल शासकाचे सर्व गुण समाविश्ट होते.

आपल्या जिवनात अनेक संघर्शांचा सामना करतांना देखील बेगम हजरत महल यांनी कौशल्यपुर्ण रणनिती आखत आपल्या राज्याला अबाधीत राखण्याचे अनेक प्रयत्न केले.

तरीदेखील इंग्रजांकडुन तिला पराजय पत्करून राज्य सोडुन जावे लागले आणि नेपाळ येथे आश्रय घ्यावा लागला.

प्रतिकुल परिस्थीतीला ती कधीही शरण गेली नाही. तीचे जीवन हे इतरांकरता आदर्श घ्यावा असे होते.

या लेखातुन बेगम हजरत महल या इतिहासातील अत्यंत साहसी आणि पराक्रमी रणरागीणी बद्दल जाणुन घेउया. .

Begum Hazrat Mahal in Marathi बेगम हजरत महल यांचा जिवन परिचय – Begum Hazrat Mahal in Marathi

पुर्ण नाव (Name):  बेग़म हज़रत महल
जन्म (Birthday):अंदाजे ई. 1820 फैजाबाद, अवध, भारत
मृत्यु (Death):एप्रील 1879, काठमांडु, नेपाळ
पति (Husband Name):नवाब वाजिद अली शाह
मुलं (Children):1 मुलगा
कार्य (Work):1857 मध्ये इंग्रजांविरोधात विद्रोह पुकारला व आपल्या राज्याला (अवध) ला वाचविण्याकरता इंग्रजांविरोधात युध्द पुकारले.

बेगम हजरत महल चा जन्म आणि प्रारंभिक जीवन – Begum Hazrat Mahal History

1857 ला इंग्रजांविरोधात पहिले युध्द पुकारणारी विरांगना बेगम हजरत महल सुमारे 1820 ला अवध प्रांतात फैजाबाद जिल्हयातील एका लहानश्या गावी अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आली होती.

लहानपणी तीला सगळे मुहम्मदी खातून (मोहम्मद खानम) म्हणत असत.

बेगम हजरत महलच्या कुटूंबाची परिस्थीती इतकी हालाखीची होती की ते तीचे दोन वेळेला पोट देखील भरू शकत नव्हते.

त्यामुळे हजरत महल राजेशाही घराण्यांमधे नृत्य करीत असे.

पुढे तीला शाही हरम मध्ये परी समुहात सहभागी करण्यात आले. तीला ‘महक परी’ म्हणुन ओळखले जाऊ लागले.

‘हजरत महल’ ही उपाधी मिळाली – Hazrat Mahal

बेगम हजरत महल ही अत्यंत सुंदर आणि लावण्यवती होती. तीचे रूप प्रत्येकाला तिच्याकडे आकर्शित करीत असे.

तिचे सौंदर्य पाहुन अवधचा नवाब तिच्या सौंदर्यावर भाळला आणि तिला आपल्या शाही हरम मध्ये त्याने सहभागी करून घेतले.

पुढे अवध चे नवाब वाजिद अली शाह यांनी तीला आपली बेगम बनविले.

तीने एका मुलाला जन्म दिला ज्याचे नाव ‘बिरजिस कादर’.

पुढे तिला ‘हजरत महल’ ही उपाधी देण्यात आली.

अवधची सत्ता सांभाळली:

अनेक संघर्शांनंतर तीच्या आयुश्यात सुखाचे आगमन झाले ज्यावेळी ती अवधच्या राजाची बेगम झाली.

परंतु त्या दरम्यान इ.स 1856 ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने नवाब वाजिद अली शाह च्या अवध राज्यावर कब्जा केला आणि त्याला बंदी बनवुन कोलकाता येथे बंदिवासात टाकले.

या घटनेनंतर बेगम हजरत महल ने अवध राज्याची सत्ता सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या अल्पवयीन बिरजीस कादर नावाच्या मुलाला राज्याच्या गादीवर बसवुन 7 जुलै 1857 ला अवध ची कुशल शासक म्हणुन  इंग्रजांविरोधात युध्दाची ठिणगी पेटवली.

बेगम हजरत महल एक कुशल रणनितीज्ञ होती तीच्यात युध्द आणि सैन्य कौशल्या सोबतच अनेक गुणांमध्ये ती पारंगत होती.

इंग्रजांच्या तावडीतुन आपल्या राज्याला वाचविण्याकरता तिने ब्रिटीशांशी पराक्रमाने लढा दिला आणि अनेक युध्द केलीत.

सैनिकांचे मनोबल वाढविले, महिला सैनिक दल होते तीचे शक्तीस्थान:

एक कुशल प्रशासक असल्याने बेगम हजरत महल सर्व धर्मांना एक समान मानत होती.

धर्माच्या आधारावर तिने कुणाशीही कधी भेदभाव केला नाही, आपल्या सैन्यातील सर्वधर्मातील सैनिकांना तीने एकसमान अधिकार दिले.

इतिहासकारांच्या सांगण्यानुसार बेगम हजरत महल आपल्या सैनिकांचे मनोबल वाढविण्याकरता स्वतः युध्द स्थळी जायची.

झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रमाणेच हजरत महलच्या सैन्यात महिला सैनिक दल कार्यरत होते.

1857 च्या क्रांतीत दिला आपल्या पराक्रमाचा परिचय:

1857 ला झालेल्या युध्दात बेगम हजरत महलने आपले सैनिक आणि समर्थकांच्या सोबतीने इंग्रजांविरोधात विद्रोहाची ठिणगी पेटवली आणि मोठया कौशल्याने आणि पराक्रमाने ब्रिटीशां विरोधात युध्द सुरू केले.

तिच्या नेतृत्वात तिच्या सैन्याने लखनौ जवळ चिनहट, दिलकुशा येथे झालेल्या युध्दात इंग्रजांना नामोहरम केले होते.

लखनौ इथं झालेल्या विद्रोहात साहसी बेगम हजरत महल ने अवध प्रांतातील गोंडा, फैजाबाद, सलोन, सुल्तानपुर, सीतापुर, बहराइच या क्षेत्रांना इंग्रजांपासुन मुक्त करून लखनौवर आपला ताबा मिळविला.

लखनौ इथं झालेल्या युध्दात मिळाली अनेक राजांची साथ:

इतिहासकारांच्या मते लखनौ इथं इंग्रजांविरोधात झालेल्या युध्दात बेगम हजरत महलला अनेक राजांची मदत मिळाली. तीच्या सैन्य प्रतिभेने प्रभावित होत स्वातंत्र्य संग्रामात मुख्य भुमिका बजावणारे व राणी लक्ष्मीबाईचे अत्यंत निकटवर्तीय म्हणुन ओळखले जाणारे नाना साहेबांनी तीला युध्दात मदत केली होती.

बेगम हजरत महल चे कुशल नेतृत्व, उत्तम संघटन सामथ्र्य, आणि अदम्य साहसाने प्रभावित होत राजा जयलाल, राजा मानसिंह आदींनी या युध्दात मदत केली होती.

इतकेच नव्हें तर तिच्यातील प्रभावशाली संघटन कौशल्याचा प्रभाव अवध येथील शेतकरी, जमीनदार, युवा नागरिक यांच्यावर देखील पडला आणि त्यांनी देखील हिरीरीने पुढे येत इंग्रजांविरोधात झालेल्या युध्दात बेगम हजरत महलला भरीव सहकार्य केले.

या युध्दात हत्तीवर स्वार होत बेगम हजरत महल ने सैन्याचे कुशल नेतृत्व केले व इंग्रजांना पळता भुई थोडी झाली.

या युध्दात इंग्रजांना लखनौ रेजीडेंसीत नाईलाजास्तव लपावे लागले होते. हे युध्द पुढे अनेक दिवस सुरू होते, आणि या दरम्यान तीच्या सैन्याने ब्रिटीशांचा मोठया धैर्याने सामना केला.

त्यानंतर मात्र इंग्रजांनी मोठी कुमक बोलवुन पुन्हा एकदा लखनौवर आक्रमण केले आणि लखनौ व अवध च्या मोठया भागांवर आपला कब्जा केला.

इंग्रजांनी बेगमच्या कोठीवर देखील कब्जा मिळवला त्यामुळे बेगम हजरत महल ला हार पत्करून आपला महल सोडुन जावे लागले.

लखनौवर इंग्रजांचा कब्जा झाल्यानंतर देखील बेगमने क्रांतीची मशाल पेटती ठेवली:

आपले राज्य गेल्यानंतर देखील हार न मानता हजरत महल ने अवध च्या ग्रामिण भागातील लोकांमध्ये इंग्रजांविरोधात चिड निर्माण केली व क्रांतिची ज्योत पेटवली. या दरम्यान तिने अवधच्या जंगलात वास्तव्य केले.

नानासाहेब आणि फैजाबाद चे मौलवी यांच्या सोबतीने तीने शाहजहांपुर वर आक्रमण केले आणि गुरिल्ला युध्द नितीचा वापर करीत इंग्रजांच्या अडचणी वाढविल्या.

अश्यारितीने बेगम हजरत महल ने जोवर शक्य होईल तोवर एका पराक्रमी सैनिकाप्रमाणे इंग्रजांविरोधात अखेरपर्यंत लढा दिला.

असं म्हणतात की बेगम हजरत महलच्या नेतृत्वात अवध च्या युध्दात इंग्रजांच्या नाकी नऊ आले होते.

शिवाय ती पहिली अशी राणी होती जीने लखनौ इथं झालेल्या इंग्रजांविरोधातल्या विद्रोहात हिंदु-मुस्लिम राजांच्या आणि अवध च्या जनतेच्या मदतीने इंग्रजांचा पराजय केला होता.

मात्र अखेर बेगम हजरत महल ला तिचे राज्य सोडुन जावे लागले. तीने इंग्रजांवर हिंदु मुस्लिम जनतेत फुट टाकण्याचा आणि वैमनस्य पसरविण्याचा आरोप देखील केला.

आपले राज्य सोडुन नेपाळ येथे घ्यावी लागली शरण आणि येथेच घेतला अखेरचा श्वास – Begum Hazrat Mahal Death

इंग्रजांविरोधात झालेल्या या युध्दा दरम्यान मौलाना अहमदशाह यांची हत्या करण्यात आली त्यामुळे हजरत महल फार एकटी पडली तिच्याकडे लखनौ सोडुन जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.

या दरम्यान अलाहाबाद आणि कानपुर येथे देखील ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या विरोधात क्रांतीची लढाई सुरू झाली होती शिवाय मेरठ दिल्ली येथे देखील इंग्रजांच्या अत्याचारात फार वाढ झाली होती त्यामुळे अनेक क्रांतिकारकांना मागे हटावे लागले होते.

त्याच वेळी इंग्रजांनी बादशहा बहादुर शाह जफर ला कैद करून रंगुन येथे पाठवले.

परिस्थीती फार चिघळत चालली होती, इंग्रजाकरवी कैद होउन बंदी होणे हे स्वाभिमानी हजरत महलला कदापी सहन होणारे नव्हते.

त्यामुळे तीने लखनौ सोडण्याचा निर्णय घेतला व आपल्या मुला सोबत ती नेपाळ येथे निघुन गेली.

तीच्या शौर्याची चर्चा सर्वदुर पसरली होती.

नेपाळचे राजा राणा जंगबहादुर देखील तीच्या पराक्रमाने प्रभावित होते त्यामुळे त्यांनी बेगम हजरत महलला नेपाळ येथे शरण दिली.

मात्र पुढे ती काठमांडु येथे निघुन गेली आणि पुढील जीवन आपल्या मुला समवेत एका सामान्य महिले प्रमाणे व्यतीत केले.

येथे 1879 ला तिने अखेरचा श्वास घेतला. काठमांडु येथील जामा मस्जिदीत बेगम हजरत महल ला दफन करण्यात आले.

बेगम हजरत महलच्या नावाचे स्मारक आणि सन्मान – Begum Hazrat Mahal Memorial

1857 ला झालेल्या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजाच्या विरोधात युध्द लढलेल्या स्वाभिमानी आणि पराक्रमी बेगम हजरत महल च्या सन्मानार्थ 15 ऑगस्ट 1962 ला उत्तरप्रदेशाची राजधानी असलेल्या लखनौ येथील हजरतगंज मध्ये तयार करण्यात आलेल्या एका पार्क ला तिचे नाव देण्यात आले.

लखनौ च्या ओल्ड व्हिक्टोरिया पार्क चे नाव बदलुन ‘‘बेगम हजरत महल पार्क’’ असे करण्यात आले.

तिच्या सन्मानार्थ येथे संगमरवरी स्मारक देखील बनविण्यात आले.

या विशाल पार्क मध्ये दिवाळी, दसरा, आणि लखनौ महोत्सवा दरम्यान मोठ मोठया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

शिवाय लखनौकरता हा पार्क बेगम हजरत महल ची आठवण करून देणारा आहे.

बेगम हजरत महलच्या सन्मानार्थ भारत सरकार ने 10 मे 1984 रोजी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले.

बेगम हजरत महल ही इतिहासातल्या त्या काही विरांगनांमधील एक आहे ज्यांनी आपल्या राज्याला वाचविण्याकरता इंग्रजांविरोधात युध्द पुकारले आणि इंग्रजांना नामोहरम करत भारतिय स्त्रियांची ताकद दाखवुन दिली.

शिवाय ती भारतातील पहिली अशी मुस्लिम महिला होती जीने आपल्या धर्माचा पडदा दुर सारत इंग्रजांविरोधात मोर्चा उघडला व आपल्या राज्याची आणि देशाच्या स्वाभिमानाची आन बान शान राखली.

जेंव्हा कधी 1857 च्या स्वातंत्र्य समराची चर्चा होईल त्यावेळी बेगम हजरत महल चे नाव मोठया सन्मानाने आणि गर्वाने घेतले जाईल.

बेगम हजरत महल ने तलवारीच्या टोकावर आपल्या अद्भुत संघटन कौशल्याने इंग्रजांचे मनसुबे हाणुन पाडले व आपल्या भारताचा गौरव वाढविला.

स्वाभिमानी बेगम हजरत महलच्या देशभक्तीने साहसाने आणि शौर्याने तीचे नाव इतिहासाच्या पानांमध्ये नेहमीकरता कोरले गेले आहे.

आपल्या देशातील पराक्रमी बेगम हजरत महल ला माझी मराठी च्या पुर्ण टिम कडुन शत-शत नमन !

Read More:

  • जलाल उद्दीन अकबर चा इतिहास

लक्ष्य दया:- तुमच्या जवळ आणखी बेगम हजरत महल बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…

धन्यवाद्

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved