हळदीचे फायदे आणि माहिती

Haldi che Fayde

आपणा सर्वांना परिचित नित्याच्या वापरातील वनस्पती म्हणजे हळद होय, तसेच अनेक रोगांवर हळद याचा औषधी म्हणून वापर केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत, धार्मिक कार्य हळदीला सर्वांत उच्च स्थान आहे. कोणत्याही देवाचे पूजन करताना प्रथम हळद व कुंकू वाहण्याची प्रथा आहे. सत्यनारायण पूजा, देवाला अभिषेक कर हळकुंड वापरतात.अश्या अनेक प्रकारे हळदीचा वापर होतो.

हळद ही नैसर्गीक वनस्पती आयुर्वेदात फार महत्वपुर्ण आणि मोलाची मानली गेली आहे. “पी हळद आणि हो गोरी” अशी म्हण उगीच पडली नाही, हळदीचे सेवन जर नित्यनियमाने केले तर आरोग्याला खुप फायदा झालेला दिसतो. हळद आपल्या त्वचेकरता देखील बहुगुणी आहे जखम झाल्यास, किंवा गोऱ्या त्वचेकरता हळदीचा उपयोग जुन्या काळात मोठया प्रमाणात केला जात असे.

हळदीला स्वास्थ्याकरता आणि सुंदर त्वचेची शान मानले गेले आहे. त्वचेसंबंधी रोगात हळदीचा वापर वेगाने वाढतो आहे. हळद ही घरात सहज उपलब्ध होणारी आणि रोजच्या जेवणात तीचा वापर होतांना दिसतो. म्हणुन तुम्हाला तुमच्या त्वचेच्या देखभालीकरता जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. इथे आम्ही हळदीचे काही महत्वाचे फायदे आणि हळदी विषयची माहिती सांगत आहोत त्याचा उपयोग तुम्हाला सहज करता येण्यासारखा आहे.

जाणून घ्या आरोग्यदायी हळदीचे फायदे – Benefits of Turmeric in Marathi

Benefits of Turmeric

शास्त्रीय नाव : (करक्युमा लाँगा) Curcuma longa
इंग्रजी नाव : (टर्मरिक) Turmeric
हिंदी नाव : हल्दी

हळदीची माहिती – Turmeric Information in Marathi

हळदीची रोपे ही फारशी उंच वाढत नाहीत. त्यामुळे त्यांना झुडूप असे म्हणतात. रोपाची उंची सर्वसाधारणपणे एक ते दीड मीटर असते. याची पाने रंगाने हिरवीगार असतात. हळदीची पाने ३५ ते ४० सें.मी. लांब व १० ते २० सें.मी. रुंद, आकाराने आयताकृती असतात. याला सुगंध येतो. आणि हळद ही जमिनीत उगवते.

हळदीची लागवड – Halad Lagwad Mahiti

संपूर्ण भारतात हळदीची लागवड ही केली जाते; परंतु महाराष्ट्र, मद्रास, कर्नाटक, बंगाल येथे मोठ्या प्रमाणात अर्थार्जनाचा व्यवसाय म्हणून हळदीची शेती केली जाते. हळदीची रोपे तयार करून नंतर त्याची लागवड केली जाते. सर्वसाधारणपणे हळदीच्या एका रोपाला ८ ते १० हळकंडे हळकुंडे जमिनीत खाली लागतात.

इतर माहिती :

रासायनिकदृष्ट्या अल्कली पदार्थ व हळद यां की त्याचा रंग लाल होतो. भारतात सर्वत्र हळदीच्या रोपांची लागवड होते. तसेच महाराष्ट्रात सांगलीजवळ हरिपूर येथे खास हळदीची खूप मोठी अशी बाजारपेठ उपलब्ध आहे.

स्त्रिया रोजच्या स्वयंपाकात स्वादासाठी व रंग येण्यासाठी हळद याचा वापर करतात. तसेच मसाल्यात व मेतकुटातसुद्धा हळकुंडाचा उपयोग केला जातो.

हळदीचे धार्मिक महत्त्व :

आपल्या भारतीय संस्कृतीत, धार्मिक कार्यात हळदीला सर्वांत उच्च स्थान आहे. कोणत्याही देवाचे पूजन करताना प्रथम हळद व कुंकू वाहण्याची प्रथा आपल्याकडे आहे. सत्यनारायण पूजा, देवाला अभिषेक करण्यासाठी हळकुंड वापरतात.

स्त्रिया ह्या एकमेकांची ओटी भरताना हळकुंडाचा वापर करतात. तसेच उटणे तयार करताना हळदीचा वापर केला जातो. हळद, हरभरा डाळीचे पीठ व यांचे मिश्रण दहा मिनिटे चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळ मुलायम होतो. आणखी पाहाता पोटात सुद्धा घेण्यासाठी हळदीचा उपयोग होतो. वेदनाशामक म्हणून हळदीचा वापर करतात मार लागून आलेल्या सुजेवर हळदीचा लेप लावला की त्याचा उत्कृष्ठ असा आराम मिळतो.

हळदीचे औषधी उपयोग – Advantages of Turmeric

 1. एखादी जखम झाली असता प्रथमोपचार म्हणून हळदीचा वापर केला जातो.
 2. तसेच अनेक प्रकारचे मलम तयार करण्यासाठी हळदीचा उपयोग केला जातो हळद जंतूनाशक म्हणून उपयोगी पडते.
 3. बाहेरून लेप लावण्यासाठी हळदीचा उपयोग केला जातो, तसेच पोटातून घेण्यासाठी सुद्धा हळदीचा उपयोग केला जातो.
 4. कफनाशक, पित्तनाशक म्हणून हळदीचा खासकरून उपयोग होतो.
 5. सर्दी, खोकला या रोगांवर घरगुती उपाय म्हणून रात्री झोपताना गरम दुधात हळद व गूळ घालून प्यावे म्हणजे ज्याने छान असा आराम मिळतो.
 6. अनेक प्रकारच्या त्वचारोगात सुद्धा पोटात घेण्यासाठी हळद वापरतात.
 7. पोटाच्या विकारांवरसुद्धा हळद उपयोगी असते.
 8. घसा बसला असता गरम दुधात हळद व आले घालून ते उकळून घेतल्याने किंवा हळद व गूळ यांच्या मिश्रणाची गोळी घेतल्याने आवाजाला आराम मिळतो.
 9. स्त्रियांचे गर्भाशयाचे आजार, स्तन्यरोग यांवर हळदीचे चूर्ण उपयोगी असते.
 10. तसेच कर्करोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.
 11. हळद आणि मध यांच्या मिश्रणाचे चाटण घेतल्यास रक्त वाढते.

हे आहेत गुणकारी हळदीचे फायदे – Turmeric Benefits for Skin

 • हळद पावडर आणि कडुलिंबाच्या पानांना चांगले बारीक करा त्याचे मिश्रण बनवा. आणि पुर्ण शरीराला लावा काही वेळानंतर थंड पाण्याने अंघोळ करा यामुळे शरीरावर असणारे सर्व किटाणु नष्ट होतील.
 • हळदीला दोन थेंब सरसो तेल आणि काही थेब लिंबाच्या रसाच्या मिश्रणात मिसळा, मिश्रण तयार झाल्यास शरीरावर सर्व जागी लावा आणि १५ मिनीटांपर्यंत चोळा आणि थंड पाण्याने धुवुन घ्या. हे मिश्रण तुमच्याकरता स्क्रब सारखे काम करेल.
 • हळद पावडर आणि लोण्यापासुन देखील तुम्ही स्क्रब बनवु शकता, या मिश्रणाला रोज अंघोळीपुर्वी लावावे. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरच्या मृत पेशी नष्ट होतील आणि त्वचा चमकु लागेल.
 • हळद, लिंबाचा रस, आणि काकडी चा रस याचे मिश्रण तयार करा. याला चेहऱ्यावर आणि मानेवर लावा, हे लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होण्यास मदत होईल.
 • चेहेऱ्यावरच्या सुरकुत्यांसाठी हळद एक प्रभावी उपाय आहे. हळद आणि ताक याचे मिश्रण चेहेऱ्यावर आणि मानेवर लावावे, वाळल्यावर थंड पाण्याने धुवुन टाकावे.
 • हळद आणि खोबरेल तेल एकत्र करून पायाच्या भेगांना लावावे. असे केल्याने पायाच्या भेगा प्रभावीपणे कमी व्हायला लागतात.
 • हळद आणि दुधाचे मिश्रण तयार करावे, अंघोळीपुर्वी संपुर्ण शरीराला लावावे यामुळे तुम्हाला उजळलेला चेहेरा आणि स्वस्थ त्वचा मिळेल.
 • हळद पावडर, पाणी आणि चंदन पावडर चे मिश्रण तयार करा याला आपल्या चेहेऱ्यावर लावा आणि १० मिनीटांनंतर चेहेरा साफ करा. असे केल्याने चेहेऱ्यावर असलेले मुरूम नाहीसे होतील.

या सर्व उपायांनी तुम्ही घरच्या घरी हळदीचा उपयोग करून चेहेऱ्यावर ग्लो आणु शकता. तर हे होते हळदीचे काही फायदे जे आपल्याला दररोज च्या जीवनात पाहायला मिळतात, आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

हळद विषयीची विचारली जाणारी काही प्रश्न – FAQ About Turmeric

Q. हळदीचे शास्त्रीय नाव काय आहे ?

उत्तर – हळदीचे शास्त्रीय नाव (करक्युमा लाँगा) Curcuma longa हे आहे.

Q. हळदी मध्ये कोणते अन्नघटक असतात ?

उत्तर – हळदी मध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेटे, स्निग्ध पदार्थ, कँलशियम, लोह, फॉस्फरस, जीवनसत्वे इत्यादी अन्नघटकाचा समावेश होतो.

Q. हळदीचे लागवड ही कोठे केली जाते ?

उत्तर – संपूर्ण भारतात हळदीची लागवड ही केली जाते; परंतु महाराष्ट्र, मद्रास, कर्नाटक, बंगाल येथे मोठ्या प्रमाणात अर्थार्जनाचा व्यवसाय म्हणून हळदीची शेती केली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top