• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, August 19, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information

भूकंप म्हणजे नेमकं काय

Bhukamp Information in Marathi

कधी कधी आपल्याला जमीन हादराल्याचा अनुभव आला असेल. हे कशामुळे होत असेल याचा आपण कधी विचार केला आहे का? अशी कोणती शक्ती असेल जी चक्क जमिनीला हादरून ठेवते? आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. जमिनीच्या या हादराण्याला भूकंप असे म्हणतात.

भूकंप म्हणजे नेमकं काय? – Bhukamp Information in Marathi

Bhukamp Information in Marathi
Bhukamp Information in Marathi

भूकंप म्हणजे काय ? – What is Earthquake?

भूकंप म्हणजे जमिनीची होणारी हालचाल. कधी कधी आपण जमिनीवर धक्के अनुभवतो. यालाच भूकंप किंवा धरणीकंप असे देखील म्हणतात.

भूकंप कशामुळे घडून येतो : Causes of Earthquake?

भूकंप नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही कारणांमुळे होऊ शकतो. नैसर्गिक कारणांमध्ये

  • जमिनीखालील टेक्टोनिक प्लेट ची हालचाल
  • ज्वालामुखी
  • भूस्सखलन
  • जमिनीमधील दगडांतून बाहेर पडणारी उर्जा इ.

कृत्रिम कारणे :

  • उत्खनन
  • स्फोट
  • अणुउर्जेचे प्रयोग इ.

भूकंपाचे परिणाम – Effects of an Earthquake

भूकंपाचे अनेक वाईट परिणाम दिसून येतात.

१. जमीन हादरने : भूकंपाचा सामान्य परिणाम म्हणजे जनीन हादरने. या मुळे तेथील इमारतींची, मोठ्या झाडांची आणि इतर वास्तूंची पडझड होते.

२. त्सुनामी : समुद्राखालील जमिनीत भूकंप घडून आल्याने या पाण्याच्या भल्यामोठ्या लाटा उसळतात. यालाच आपण त्सुनामी म्हणतो.

३. भूस्सखलन : भूकंपाच्या तीव्र हादऱ्यांमुळे टेकड्यांवरील किंवा पहाडांवरील माती खाली घसरते ज्याला आपण भूस्सखलन म्हणतो.

४. जमीन फाटणे : हा भूकंपाचा अतिशय गंभीर परिणाम आहे. यामध्ये जमिन दोन भागांत विभाजित होते.

५. इतर परिणाम : घरांची पडझड झाल्याने कित्येक लोक बेघर होतात. पाणीटंचाई, आग लागणे, आजार हे देखील भूकंपाचे परिणामच आहेत.

भूकंपाचा प्रतिबंध – Prevention of Earthquake

आपण नैसर्गिक भूकंपाला प्रतिबंध घालू शकत नाही. परंतु कृत्रिम भूकंपाला नक्कीच घालू शकतो. यासाठी आपण खालील प्रतीबंधांचा उपयोग करू शकतो.
१. अणुउर्जेचे प्रयोग मनुष्य विरहित ठिकाणी करावे
२. इमारतींची बांधणी करतांना त्या भूकंप पासून सुरक्षित राहतील अशा उपाययोजना कराव्यात.
३. पूर्व सूचना देणाऱ्या गाजराचा उपयोग करावा.
४. भूकंप सक्रीय असणाऱ्या ठिकाणी बांधकाम करू नये.

भूकंपापासून घ्यावयाची काळजी – Precautions of Earthquake

भूकंप घडून येताच आपल्याला काही सुचेनासे होते. कधी कधी जीवितहानी देखील होते. परंतु जर आपण योग्य ती खबरदारी घेतली तर यापासून आपण आपले रक्षण करू शकतो. यासाठी आपण खालील काळजी घ्यावी:

  1. भूकंपाचे हादरे जाणवतच मोकळ्या मैदानात जावे.
  2. घरात असल्यास टेबलाखाली बसावे.
  3. गॅस आणि विजेचा पुरवठा बंद करावा.
  4. झाड किंवा वीजवाहिनी यांच्या खाली उभं राहू नये.
  5. गाडी चालवत असाल तर सुरक्षित ठिकाणी गाडी उभी करून थांबावे.

भूकंप मापन यंत्र – Earthquake Measuring Device

Earthquake Measuring Device
Earthquake Measuring Device

भूकंप मोजण्यासाठी सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटरचा पुयोग केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, यामध्ये एक धातूचा गोलक लटकवलेला असतो. या गोलकावर पेन जोडलेला असतो. गोलकाखाली कागद ठेवला जातो. जेव्हा भूकंपामुळे हा गोलक हलतो, तेव्हा पेनाच्या मदतीने खालील कागदावर रेषा ओढल्या जातात. अशा प्रकारे सिस्मोग्राफ तयार केला जातो.

तसेच भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रीक्टर स्केल चा उपयोग केला जातो.

भारतातील भूकंप – Earthquakes in India

भारतामध्ये आजपर्यंत अनेक भूकंप आलेले आहेत. ज्यामध्ये अनेकांना जीवित आणि आर्थिक हानीला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये २००१ साली गुजरात येथे आलेला भूकंप हा सर्वाधिक तीव्रतेचा होता. या भूकंपाची तीव्रता रीक्टर स्केलवर ७.७ एवढी होती. तसेच १९३४ सालचा बिहार भूकंप, १९३३ साली आलेला महाराष्ट्रातील भूकंप आणि १९५० सालचा आसाम भूकंप हे देखील भयावह होते.

भूकंपाचा निष्कर्ष : Conclusion of Earthquake

एकंदरीत भूकंप म्हणजे काय तर, जमिनीची झालेली हालचाल. कधी कधी या भूकंपाची तीव्रता इतकी असते कि जमीन दोन भागांत विभाजित देखील होऊ शकते. भूकंपांमुळे समाजजीवनाला मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते.

काही महत्वाचे प्रश्न :

१. भारतातील भूकंप प्रवण स्थळ कोणते?

उत्तर: मुंबई, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, श्रीनगर इ.

२. भारतातील सर्वात मोठे भूकंप कोणता?

उत्तर: २००१ सालचा गुजरात भूकंप हा भारतातील सर्वात मोठा भूकंप मानला जातो.

३. भूकंप मापक यंत्राला काय म्हणतात?

उत्तर: भूकंप मापक यंत्राला सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर असे म्हणतात.

४. भुकंपापासून बचावासाठी काय करावे?

उत्तर:

  1. खुल्या मैदानात जावे.
  2. झाडाखाली किंवा मोठ्या इमारतींचा सहारा घेऊ नये.
  3. घरामध्ये असल्यास टेबल किंवा पलंगाखाली बसावे.
Editorial team

Editorial team

Related Posts

जाहिरात लेखन कसे करावे
Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
July 10, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved