त्सुनामी बद्दल संपूर्ण माहिती

Tsunami Information in Marathi

असे म्हणतात कि सागर आपली सीमा कधीच ओलांडत नाही, पण जेव्हा स्तुनामी येते तेव्हा हाच सागर पार सीमेपलीकडे निघून जातो. ही त्सुनामी आपल्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपल्या मध्ये सामावून घेते.

त्सुनामी हा जपानी शब्द आहे. त्सुनामीचा जपानी अर्थ आहे मोठ्या लाटांची मालिका. जेव्हा त्सुनामी येते तेव्हा अशाच भल्यामोठ्या लाटा एका पाठोपाठ एक तयार होत राहतात.

त्सुनामी बद्दल संपूर्ण माहिती – Tsunami Information in Marathi

Tsunami Information in Marathi
Tsunami Information in Marathi

त्सुनामी म्हणजे काय? – What is Tsunami?

त्सुनामी म्हणजे पाण्याच्या भव्य लाटा. समुद्र किंवा महासागराच्या पाण्याचे जेव्हा मोठ्या प्रमाणावर विस्थापन होते तेव्हा त्सुनामी तयार होते. एकंदरीत स्तुनामी म्हणजे भयंकर महापूर.

त्सुनामीची कारणे – Causes of Tsunami

समुद्रा खालील जमिनीमध्ये जेव्हा भूकंप, भूस्खलन किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकाने हादरे निर्माण होतात, तेव्हा मोठ्या प्रमाणावर पाणी विस्थापित होते. यामुळे पाण्याच्या मोठ्या लाटा किंवा लहरी तयार होतात. हेच त्सुनामीचे मुख्य कारण असल्याचे म्हटल्या जाते.

त्सुनामीचा वेग किती असतो – How Fast Does a Tsunami Travel

त्सुनामी काळात लाटांचा वेग सुमारे ७००-८०० किमी. (५०० मैल) प्रती तास असू शकतो. या दरम्यान समुद्राच्या लाटा जवळपास ३० मी. (१०० फुट) पर्यंत उंच जाऊ शकतात.

त्सुनामीचे मानवी जीवनावरील परिणाम – What Happens to Human During Tsunami

समुद्र किनाऱ्यावरील लोकांना स्तुनामी म्हणजे कर्दनकाळच. यामध्ये कितीतरी लोक बेघर होतात. कित्येकांना आपले प्राण गमवावे लागतात. शिवाय त्सुनामी मुळे गंभीर आजार देखील पसरतात. सर्वत्र फक्त आणि फक्त घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते.

त्सुनामीचे जलीय जीवनावरील परिणाम – What Happens to Sea Animals During Tsunami

त्सुनामीमुळे समुद्र किंवा महासागरात होणाऱ्या बदलांमुळे जलजीवन विस्कळीत होते. वेगाने वाहणाऱ्या लाटा आपल्या सोबत लहान मोठ्या सर्व माशांना किनाऱ्यावर घेऊन येतात. कित्येक दिवस तसेच पडून राहल्याने ते मरण पावतात.

शिवाय या लाटा परत जातांना सोबत कचरा आणि घाण घेऊन जातात. यामुळे देखील जलजीवनावर विपरीत परिणाम होतात. तसेच यामुळे जलप्रदूषण देखील घडून येते.

इतिहासातील काही विनाशकारी त्सुनामी : Some Destructive Tsunamis in the History

  1. लीस्बोन, पोर्तुगीज : १७५५
  2. वाल्दिविया, चिली : १९६०
  3. सुमात्रा, इंडोनेशिया : २००४
  4. माउले, चिली : २०१०
  5. सेंदाई, जापान : २०११
  6. पालू, सुलावेसी, इंडोनेशिया : २०१८

 त्सुनामी बद्दल काही महत्वाचे प्रश्न – Tsunami Questions

१. त्सुनामी म्हणजे काय? (What is tsunami?)

उत्तर: त्सुनामी म्हणजे समुद्र किंवा महासागरात उठणाऱ्या मोठ्या लाटा.

२. शेवटची त्सुनामी कधी आली होती?

उत्तर: २०१८ साली, इंडोनेशिया येथे शेवटची त्सुनामी आली होती. (इंटरनेट वरील माहितीच्या आधारे)

३. आपण त्सुनामीच्या पाण्याखाली जिवंत राहू शकतो का ?

उत्तर: याचे नेमके उत्तर कोणीही सांगू शकणार नाही. याचे उत्तर आपल्या नशिबावर अवलंबून आहे.

४. भारतामध्ये शेवटची त्सुनामी कधी आली होती ?

उत्तर: २६ डिसेंबर २००४.

५. त्सुनामीचे मुख्य कारण काय आहे ?

उत्तर : समुद्र किंवा महासागरा खालील जमिनी मध्ये घडून येणारे भूकंप, भूस्खलन किंवा ज्वालामुखीचा उद्रेक ही त्सुनामीची मुख्य कारणे आहेत.

६. त्सुनामीच्या लाटांचा वेग किती असतो?

उत्तर: त्सुनामीच्या लाटांचा वेग जवळपास ७००-८०० किमी. (५०० मैल) प्रती तास असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here