जल प्रदूषणा विषयी संपूर्ण माहिती

Water Pollution Information in Marathi

विश्वाला भेडसावत असलेली समस्या ती म्हणजे प्रदूषण, प्रदूषणामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, आणि निसर्गाला त्रास होणे म्हणजेच अप्रत्यक्षपणे पृथ्वीवर राहणाऱ्या सजीवांना. प्रदूषणाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे मागच्या काही लेखांमध्ये आपण मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, यांच्याविषयी सविस्तर माहिती पाहिली,

आजच्या लेखात आपण प्रदूषणाचा राहिलेला प्रकार, जो कि जल प्रदूषण आहे, तर आज जल प्रदूषणाविषयी माहिती पाहणार आहोत, आशा करतो मागील लेखाप्रमाणे हा लेख सुद्धा आपल्याला आवडणार. तर चला पाहूया.

YouTube video

जल प्रदूषणा विषयी संपूर्ण माहिती – Water Pollution Information in Marathi

Water Pollution Information in Marathi
Water Pollution Information in Marathi

सर्वप्रथम आपण पाहूया कि प्रदूषण म्हणजे काय तर,

प्रदूषण म्हणजे काय? – Meaning of Pollution

प्रदूषणामुळे पर्यावरणाला जी हानी पोहचते, त्याला आपण प्रदूषण म्हणतो, आजच्या काळात प्रदूषणाला कमी करण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. प्रदूषणाला मुख्यता तीन प्रकारांमध्ये विभागल्या गेले आहे, ते असे जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. त्यांनतर मृदा प्रदूषण आणि बाकी प्रदूषणाचे प्रकार येतात. तर आजच्या लेखात आपण जल प्रदूषणाविषयी माहिती पाहणार आहोत,

जल प्रदूषण म्हणजे काय? – Jal Pradushan Mhanje Kay

मानवी कृत्यांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेमध्ये झालेले बदल, आणि तेच जेव्हा पाणी सजीवांच्या पिण्यायोग्य राहत नाही तेव्हा जे प्रदूषण होते त्या प्रदूषणाला “जल प्रदूषण” म्हणतात.

जल प्रदूषणाची कारणे आणि परिणाम – Causes of Water Pollution

जल प्रदूषण घडण्यामागे काही कारणे आहेत, ते खालीलप्रमाणे.

  • जेव्हा कारखान्यातील उत्सर्जित अपशिष्ट कार्बनी पदार्थ मलवाहिन्यांतून नदी, समुद्र, आणि इतर पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मिसळतात तेव्हा पाण्याचे प्रदूषण होते, जलाशयातील सजीवांना या कार्बनी पदार्थांमुळे यामुळे ऑक्सिजन ची कमतरता भासते आणि त्यांची मृत्यू होते.
  • जेव्हा शेतामध्ये काही रसायने फवारली जातात, तेव्हा त्या रसायनांचा काही अंश हा जमिनीत राहतो, आणि हीच रसायने जमिनीच्या माध्यमाने पिण्याच्या पाण्यात येऊन आपल्यासाठी हानिकारक बनू शकतात.
  • सांडपाणी आणि मलमुत्र यामुळे सुद्धा जलप्रदूषणाचा सामना करावा लागतो. जेव्हा मानवी वस्तीमधील मलमूत्र आणि सांडपाणी नदी आणि तलावात मिसळते तेव्हा ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही सोबतच आणि ते पाणी चुकून पिण्यात आले तर त्यामुळे जठर आणि पोटाच्या आतड्यांचे आजार होतात.
  • बरेचदा खनितेल समुद्राच्या मार्गाने ने आण केल्या जाते तेव्हा त्यातील काही तेलाच्या टाकी गळतात तेव्हा ते खनिज तेल समुद्राच्या पृष्ठभागावर जमा होते आणि यामुळे समुद्रातील सजीव मरण पावतात, सोबतच समुद्रातील वनस्पती सुद्धा नष्ट होतात.

जल प्रदूषणावर उपाय – Solution of Water Pollution

  • जेव्हा कारखान्यातील उत्सर्जित अपशिष्ट कार्बनी पदार्थ बाहेर टाकायला येतात तेव्हा त्यांच्यावर योग्य प्रक्रिया करून बाहेर टाकावे जेणेकरून बाहेरील पर्यावरणाला त्याची हानी होणार नाही.
  • शेतांमध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात सेंद्रिय खते आणि शेणखताचा वापर होईल तेवढे चांगले. जेणेकरून होणारे पाण्याचे प्रदूषण थांबवता येईल.
  • मानव वस्तीमधील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. आणि पाण्यात सोडण्यापूर्वी त्यावर विशेष क्रिया करून नंतर सोडावे.
  • खनिज तेलांच्या गळतीमुळे होणाऱ्या जल प्रदूषणावर उपाययोजना आखणे.
  • पिण्याच्या पाण्याचे परीक्षण करणे आणि नंतर पिण्यासाठी वापरणे.
  • किरणोत्सारी अपशिष्टांना पाण्यात सोडण्यापेक्षा एखाद्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवण्याच्या पद्धतींवर भर देणे.

तर आशा करतो आपल्याला जल प्रदूषणावर लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here