मृदा प्रदूषणाविषयी संपूर्ण माहिती.

Soil Pollution Information in Marathi

जेव्हा आपण आठवीच्या इयत्तेला असतो, तेव्हा आपल्याला प्रदूषणा विषयी शिकविल्या जात, आताच्या अभ्यासक्रमात तर पाचवी आणि चौथीच्या मुलांना सुद्धा प्रदूषणाविषयी अभ्यासक्रम आहे, सांगायचे इतकेच कि पर्यावरण हा विषय किती महत्वाचा असतो, हे आपल्याला यावरून समजेल,

तर आज आपण प्रदूषणाच्या एक प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे मृदा प्रदूषण, आपण आज मृदा प्रदुषणा विषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत, तर चला पाहूया मृदा प्रदूषण काय असतं आणि ते प्रदूषण होऊ नये म्हणून काय करायला हवे.

मृदा प्रदूषण पाहण्या अगोदर आपण सर्वात आधी जाणून घेऊया, प्रदूषण म्हणजे काय?

YouTube video

प्रदूषण म्हणजे प्रदूषकांमुळे पर्यावरणाला जी हानी पोहचते त्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. आणि प्रदूषण हे नेहमी प्रदूषकांमुळे घडत असतं. प्रदूषक हे मानवनिर्मित सुद्धा असू शकतात, आणि नैसर्गिक सुद्धा.

मृदा प्रदूषणाविषयी संपूर्ण माहिती – Soil Pollution Information in Marathi

Soil Pollution Information in Marathi
Soil Pollution Information in Marathi

मृदा प्रदूषण – Mruda Pradushan

मातीमध्ये होत असलेल्या प्रदूषणाला Mruda Pradushan असे म्हणतात. जसे एखाद्या कारखान्यातील केमिकल युक्त पाणी त्या कारखान्यातून बाहेर सोडले जाते तेही त्यावर कोणतीही योग्य प्रक्रिया न करता. यामुळे ते पाणी ज्या जमिनीमध्ये जातं ती जमीन काही दिवसांनी नापीक बनते आणि त्या जमिनीवर कोणतीही गोष्ट उगवत नाही,

मृदा प्रदूषण हे सोप्या शब्दांमध्ये समजायचे झाले तर सुपीक जमीन नापीक जमिनीत रुपांतरीत होण्याच्या प्रक्रियेला मृदा प्रदूषण म्हणतात.

मृदा प्रदूषणाची कारणे – Soil Pollution is Caused by

मृदा प्रदूषण बऱ्याच गोष्टींमुळे होते, त्यापैकी खाली काही दिल्या आहेत.

  1. कारखान्यांमधून सोडले जाणारे केमिकल युक्त द्रव्य.
  2. शेतीमध्ये पिकांवर बरेचदा काही कीटकनाशके फवारली जातात त्यामुळे कीटकनाशकांमध्ये असलेले केमिकल हे जमिनीमध्ये मिसळतात आणि त्यामुळे सुद्धा मृदा प्रदूषण होते,
  3. कचरा जाळण्याने सुद्धा मृदा प्रदूषण होत असतं.
  4. जंगल तोडीमुळे सुद्धा मृदा प्रदूषण होतं, कारण झाडे तोडल्यानंतर जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते,
  5. शेतीतील पिकांना गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्याने सुद्धा मृदा प्रदूषण होतं.

मृदा प्रदूषणाचे परिणाम – Consequences of Soil Pollution

  1. कारखान्यांमधून सोडले जाणारे केमिकल युक्त द्रव्य जेव्हा जमिनीत जात तेव्हा त्यातील केमिकल जमिनीत मिसळतात, आणि केमिकल जमिनीत गेल्यामुळे त्या जमिनीला पूर्णपणे नापीक बनवून टाकतात. जमीन नापीक झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे पिक त्या जमिनीवर घेता येत नाही.
  2. शेतीत फवारलेल्या कीटकनाशकांमध्ये असलेले केमिकल जेव्हा जमिनीत जातात तेव्हा तेच केमिकल पिकांमध्ये जातात आणि ते पिक पूर्णपणे केमिकल युक्त बनतं. आणि ते आपल्या जेवणातून आपल्या पोटामध्ये जाऊन वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतात.
  3. अश्याच प्रकारे बाकी कारणांचे सुद्धा परिणाम असेच आहेत.

मृदा प्रदूषणावर उपाय – Measures of soil pollution

  1. कारखान्यांमधून येणाऱ्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून त्या पाण्याला बाहेर सोडणे.
  2. शेतीमध्ये जितके झाले तितके सेंद्रिय खतांचा वापर करणे.
  3. शेतीतील पिकांना आवश्यक तितकेच पाणी देणे. ठिबक सिंचनाच्या वापरला महत्व देणे.
  4. मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करणे. जेणेकरून जमिनीची धूप होणार नाही.
  5. कचरा जाळण्यापेक्षा त्याचे योग्य व्यवस्थापन करणे.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखनासाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत,
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top