बॉलिवूड चे १० सर्वात महाग चित्रपट, काही झाले फ्लॉप तर काही झाले हिट

10 Biggest Budget Bollywood Movie  

आपणही तिकीट घेऊन ३ तासांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपट गृहात गेले असणारच. चित्रपट पाहिला असणार. आणि घरी येऊन मित्रांमध्ये किंवा परिवाराच्या सदस्यांसोबत त्या चित्रपटाचा रिव्ह्यू शेयर केला असणार. काही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले असणार तर काही चित्रपट फ्लॉप झाले असणार. पण चित्रपट ब्लॉकबस्टर होणे किंवा फ्लॉप होणे हे सर्व चित्रपटाच्या मनोरंजनावर अवलंबून असतं.

चित्रपट प्रेक्षकांना किती मनोरंजन देतो यावर चित्रपटाचे यश ठरलेलं असतं. मग त्या चित्रपटाला कितीही खर्च लागलेला का असो कमी किंवा जास्त. यावर काहीही अवलंबून नसते. एखादा चित्रपट कमी खर्च लागलेला असतो पण त्यापेक्षा दुप्पट तिप्पट कमाई करून देतो, तेच एखाद्या चित्रपटाला बक्कळ पैसा खर्च होतो पण तो प्रेक्षकांच्या मनोरंजनात खरा उतरत नाही.

आजच्या लेखात आपण असेच काही चित्रपट पाहणार आहोत, सोबतच त्या चित्रपटांना बनविण्यासाठी किती बजेट लागला याविषयी सुध्दा पाहणार आहोत तर चला पाहूया बॉलीवूड च्या १० सर्वात जास्त पैसे खर्च करून बनलेलले चित्रपट.

हेच आहेत ते १० चित्रपट ज्यांचा बजेट आहे सर्वात जास्त – Top 10 Big Budget Movie in Bollywood

Highest Budget Movies
Highest Budget Movies

) 2.0

सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार या दोघांची २०१९ मध्ये २.० हा आलेला चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता. .० या चित्रपटात अनिमेशन चा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. सोबतच या चित्रपटाला बनविण्यासाठी एकूण खर्च ५४३ करोड रुपये इतका आला होता.

) साहो – Saaho

बाहुबली या चित्रपटाच्या घवघवीत यशा नंतर साऊथ स्टार प्रभास यांना हा चित्रपट मिळाला होता. आणि या चित्रपटाला बनविण्यासाठी ३०० करोड रुपये खर्च आला होता. पण ज्याप्रमाणे बाहुबली ने प्रेक्षकांना आकर्षित केले त्या प्रमाणे साहो या चित्रपटाला प्रेक्षकांनी एवढी पसंती मिळाली नाही. आणि चित्रपट फ्लॉप झाला.

) ठग्स ऑफ हिंदुस्थान – Thugs of Hindostan

ठग्स ऑफ हिंदुस्थान चित्रपटाविषयी ट्रेलर यायच्या अगोदर लोकांमध्ये चित्रपटाला पाहण्याची आतुरता होती. कारण या चित्रपटामध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि अमीर खान यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार होती. परंतु ट्रेलर नंतर लोकांना या चित्रपटाविषयी जी आतुरता होती आणि आशा होती त्या आशेवर चित्रपट खरा उतरू शकला नाही आणि ३०० कोटी खर्च केलेला ठग्स ऑफ हिंदुस्थान एक फ्लॉप चित्रपट ठरला.

) पद्मावत – Padmaavat

संजय लीला भन्साळी निर्मित दीपिका आणि रणवीर सिंग यांनी भूमिका साधलेला पद्मावत चित्रपट सुरुवातीला वादाच्या विळख्यात अडकला होता, अगोदर त्या चित्रपटाचे नाव पद्मावती होते, पण वादानंतर त्या चित्रपटाला पद्मावत म्हणून प्रदर्शित केल्या गेले आणि या चित्रपटाला लोकांनी खूप पसंती दिली होती. या चित्रपटाला बनविण्यासाठी एकूण २१५ करोड रुपयांचा खर्च आला होता.

) टाइगर ज़िंदा है – Tiger Zinda Hai

टाइगर ज़िंदा है. या चित्रपटात सलमान खान आणि कॅटरिना यांनी भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बनविण्यासाठी जवळजवळ २१० करोड रुपये खर्च आला होता, या चित्रपटाला सलमान खान च्या चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

) झिरो – Zero

बॉलिवूड चे सुपरस्टार शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना या तिघांनी भूमिका केलेला चित्रपट झिरो पाहिजे तेवढा प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकला नाही, आणि बॉक्स ऑफिस वर हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटाला बनविण्यासाठी जवळजवळ २०० करोड रुपये खर्च आला होता.

) बाहुबली: द बिगिनींग – Baahubali: The Beginning 

काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एक प्रश्न फिरत होता तो म्हणजे कटप्पा ने बाहुबली ला का मारले? आणि हा प्रश्न लोकांना राजमाऊली यांनी निर्मित केलेल्या बाहुबली या चित्रपटामुळे पडला होता. याच बाहुबली चित्रपटाला बनविण्यासाठी १८० करोड रुपये खर्च आला होता. या चित्रपटाला प्रेक्षाकांचा चांगल्या रित्या प्रतिसाद मिळाला होता.

) धूम ३ – Dhoom 3

विजय कृष्णा आचार्य निर्मित धूम ३ हा चित्रपट ज्यामध्ये अमीर खान, अभिषेक बच्चन, कॅटरिना या सारख्या कलाकारांनी भूमिका साधलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस खरा उतरला. या चित्रपटाला बनविण्यासाठी एकूण १७५ करोड रुपये खर्च आला होता.

) रेस ३ – Race 3

रेस १ आणि २ या चित्रपटां नंतर रेस ३ ला बनविण्यात आले होते. या चित्रपटाचे रेमो डीसुजा यांनी चित्रपटाचे निर्माण केले होते. सोबतच सलमान खान, अनिल कपूर या सारख्या मोठ्या सुपरस्टार अभिनेत्यांना एकत्र या चित्रपटात पाहायला मिळाले. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला नाही. या चित्रपटाला १७५ करोड रुपयांपर्यंत खर्च आला होता.

१०) दिलवाले – Dilwale

शाहरुख खान, वरून धवन, काजोल, आणि कीर्ती सेनॉन. यांनी भूमिका साधलेली दिलवाले मूवी लोकांना पाहिजे तशी आकर्षित करण्यास असमर्थ ठरली. काजोल आणि किंग खान ची जोडी बरेच दिवसानंतर मोठ्या पडद्यावर आली होती. या चित्रपटाला बनविण्यासाठी एकूण १६५ करोड रुपयांचा खर्च आला होता.

तर हे होते बॉलिवूड चे १० चित्रपट ज्यांचा बजेट खूप जास्त होता, आणि याच पैकी काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यास समर्थ ठरले होते. आणि काही फ्लॉप ठरले होते.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here