Home / Marathi Biography / अनुष्का शर्मा यांचे जीवन चरित्र | Anushka Sharma Biography In Marathi

अनुष्का शर्मा यांचे जीवन चरित्र | Anushka Sharma Biography In Marathi

अनुष्का शर्मा – Anushka Sharma  ह्या एक भारतीय फिल्म अभिनेत्री निर्माता आणि यशस्वी मॉडेल आहेत. फिल्म जगास त्यांनी आपले करियर निवडले. व चांगल्या यशस्वीपण झाल्या आहेत. वर्तमानात त्या बॉलीवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या नायिकांमध्ये गणल्या जातात. त्यांनी अनेक पुरस्कार व फिल्मफेयर अवार्ड मिळवले आहेत.

Anushka Sharma Biography

अनुष्का शर्मा यांचे जीवन चरित्र – Anushka Sharma Biography In Marathi

अनुष्का शर्मा यांचा जन्म १ मे १९८८ मध्ये उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे झाला. त्यांचे वडील अजय कुमार शर्मा एक सेना अधिकारी व आई आशिया शर्मा एक गृहिणी आहेत. त्यांचा भाऊ कानेश शर्मा सध्या अनुष्काचे प्रोडक्शन डीपार्टमेन्ट सांभाळतो. आधी एका बंगलोर रणजी क्रिकेट टीमचा सदस्य होता. नंतर एक यशस्वी मर्चंट नेवी ऑफिसर राहिला. अनुष्काच्या एका साक्षात्कारात तिने एका आर्मी ऑफिसरची मुलगी असल्याचा गर्व एक नटी असल्यापेक्षा जास्त जास्त आहे असे नमूद केले होते.

अनुष्काचे बालपण बंगलोर येथे संपन्न झाले. आर्मी स्कूल मध्ये शिकलेल्या अनुष्काने माउंट कार्मेल कॉलेज बंगलोर मधून कॉलेज शिक्षण पूर्ण केले.कलेत पदवी मिळवून तिने अभिनयात आपली रुची असल्याचे दाखविले होते.

कोलेजात असतांना अनेक छोट्या मोठ्या जाहिरातीत काम केले. मोठ्या कंत्राटासाठी ती मुंबईला आली. इलीट मोडेल मॅनेजमेंट मध्ये प्रवेश घेतला. २००७ मध्ये त्यांनी भारतातील सर्वात मोठे मॉडेलिंग जत्रा लॅकमे फॅशन विक मध्ये प्रथमच डिझाईनर वेन्डेल रोड्रिक साठी रॅम्प कंपन्यांचे ब्रांड आकर्षित झाले. त्यात सिल्क अॅण्ड शाईन व्हिस्पर नठेल्ला ज्वेलर्स, फियेट पॉलिओ साठी त्यांनी मॉडेलिंग केले. त्यांच्या कडे अनेक लहानमोठ्या फिल्म्स आणि टी.व्ही. सिरीयल च्या ऑफर येत होत्या.

त्यावेळी यशराज फिल्म्सच्या आगामी प्रोजेक्ट साठी ऑडीशन त्यांनी दिले. त्यांची निवड झाली आणि (२००८) मध्ये “रब ने बना दि जोडी” या फिल्म ने त्यांचे करियर सुरु झाले. हि फिल्म चांगलीच हित ठरली. त्यांचे फिल्मफेयर अवार्ड मध्ये बेस्ट अॅकट्रेस व बेस्ट फिमेल डेब्यू साठी नामांकनही झाले होते. त्यानंतर यशराज फिल्मच्या पुढील “बॅड बाजा बारात” (२०१०) मध्ये निर्मात्यांनी पुन्हा त्यांना संधी दिली. हि फिल्म चांगली सुपरहिट ठरली.

याच बॅनरची “जब तक ही जान” (२०१२) फार यशस्वी झाली. त्यांना याबद्दल बेस्ट सपोर्टिंग एकट्रेस चे फिल्म फेयर अवार्ड मिळाले. त्यानंतर धार्मिक तथ्यावर आधारित पिके (२०१४) हि फिल्म सुपरहिट ठरली. त्यांच्या अभिनयाची चर्चा फार झाली.

त्यानंतर भारतीय पारंपारिक खेळ कुस्तीवर आधारित फिल्म सुलतान (२०१६) ने सर्व कमाईचे रेकॉर्ड तोडले. हि फिल्म फारच यशस्वी ठरली. २०१५ मधी एन.इह.10 मधील त्यांच्या अभिनयाची फारच चर्चा झाली. दर्शकांनी आणि अलोचकांनी त्यांच्या अभिनयास मानाचा मुजरा केला. विशेष बाब म्हणजे ह्या फिल्मची त्या निर्माती पण होत्या.

फिल्म सोबतच त्या अनेक अंतरराष्ट्रीय ब्रांड साठी जाहिराती पण करतात. त्या सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असतात.

अनुष्का अनेक सामाजिक कार्यातही सहभागी होतात. लिंगभेद आणि प्राण्यांच्या शोषणाविरुद्ध अनेक आयोजित कार्यक्रमांमध्ये भाग घेवून आपले मत मांडते.

अनुष्का व भाऊ कार्नेश यांनी आपली स्वतःची प्रोडक्शन कंपनी स्थापन केली आहे.

अनुष्काचा फिल्मी प्रवास :-

२००८ रब ने बना दि जोडी
२०१० बॅड बाजा बारात
२०१० बदमाश कंपनी
२०११ पतियाला हाउस
२०११ लेडीज vs रिकी बहल
२०१२ जब तक ही जान
२०१३ मातृ बिजली का मंडोला
२०१४ पी.के.
२०१५ बॉम्बे वेल्वेट
२०१५ दिल धडकने दो
२०१५ हम ही हैप्पी
२०१६ सुलतान
२०१६ ऐ दिल ही मुश्कील

हे पण नक्की वाचा –

Shilpa Shetty Biography

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी अनुष्का शर्मा बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा अनुष्का शर्मा यांचे जीवन चरित्र  – Anushka Sharma Biography In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Anushka Sharma Biography – अनुष्का शर्मा यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

प्रसिध्द कवयित्री संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती…

Sant Muktabai Information in Marathi महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखले जाते या संतामध्ये ज्याप्रमाणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *