शिल्पा शेट्टी यांचे जीवन चरित्र

Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी एक भारतीय अभिनेत्री, प्रोडयुसर,भूतपूर्व मोडेल आणि ब्रिटीश रियालिटी शो “बिग ब्रदर ५” ची विजेती आहे. शेट्टी हिंदी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयासाठी आणि नृत्य अदाकारीसाठी जाणल्या जातात. त्यांनी तेलगु,तमिळ, आणि कन्नड चित्रपटामध्ये काम केले आहे. भारतातील सर्वात प्रसिध्द व्यक्तीमध्ये शिल्पा शेट्टीचे नाव गणल्या जाते. त्यांनी अनेक सम्मान आणि फिल्मफेअर नामनिर्देशन प्राप्त केले आहे.

शिल्पा शेट्टी यांचे जीवन चरित्र – Shilpa Shetty Biography In Marathi

Shilpa Shetty

किशोरावस्थेत मध्येच शिल्पाने जाहिरातींसाठी मोडेलिंग केले होते. त्याचबरोबर त्यांनी काही टेलीविजन कमर्शियल पण केले होते. यानंतर १९९३ मध्ये त्यांनी थ्रिलर फिल्म “बाजीगर” मधून अभिनयाची सुरुवात केली. यासाठी त्यांचे नामनिर्देशन उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून आणि लक्स न्यू फेस ऑफ दी इयर साठी झाले होते.

१९९४ मध्ये आलेली एक्शन कॉमेडी फिल्म “मै खिलाडी तू अनाडी” साठी त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. यानंतर त्यांची अनेक फिल्म्स बॉक्स ऑफिसवर चालली नाहीत. त्यामुळे त्यांच्या करियर वर प्रश्न् चिन्ह लागले होते.

साल २००० मध्ये “धडकन” चित्रपटाने त्यांचे अडखडते करियर पुन्हा गतिमान केले. हि फिल्म बॉक्स ऑफिसवर हिट झाली. यासाठी अनेक अवार्डसाठी त्यांचे नामनिर्देशन झाले परंतु पुढे त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे काही करत नव्हते.

२००४ मधील गर्व, २००५ मधील कन्नड फिल्म आटो शंकर आणि २००७ मधील फमिली ड्रामा “अपने” यांचा समावेश आहे.

यासोबतच त्यांच्या परदेशी बाबू (१९९८) रिश्ते (२००२) आणि लाइफ इन….मेट्रो (२००७) अशा ड्रामाटिक चित्रपटांना चांगले यश मिळाले. त्यांच्या निर्मिती आणि अभिनित चित्रपट “फिर मिलेंगे” प्रेक्षकांनी फार पसंत केले. यास बेस्ट अभिनेत्रीसाठी नामांकनही मिळाले.

२००७ मध्ये ब्रिटीश रियालिटी शो “बिग ब्रदर सीजन 3” मध्ये ५६३७ मतांनी जिंकून त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली.

चित्रपटांमध्ये अभिनयाशिवाय शिल्पा अनेक महागड्या ब्रांड आणि उत्पादनांशी जुडलेली आहे. जनावरांवर होणारे अत्याचार व त्यांचे हक्कासाठी शिल्पा अभियान चालविते. यासोबत भारतीय रियालिटी शो बिग बॉस२ मध्ये सेलिब्रेटी होस्ट आणि रियालिटी शो झलक दिखला जा आणि नच बलिये यांची जज पण बनल्या आहेत.

फेबृवारी २००९ मध्ये IPL मधील क्रिकेट टीम “राजस्तान रॉयल्स” याची ती सह-संस्थापक आहे.

प्रारंभिक जीवन आणि मोडेलिंग करियर

८ जून १९७५ मध्ये शिल्पाचा जन्म चेंबूर येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सुरेंद्र व मातेचे नाव सुनंदा आहे. त्यांची छोटी बहिण शमिता सुद्धा एक बॉलीवूड अभिनेत्री आहे.

शिल्पासोबत तिने २००५ मधील “फरेब”मध्ये सोबत काम केले. शिल्पाने सेंट एन्थोनी हाईस्कूल मधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर पोद्दार कॉलेज माटुंगा मधून आपले उच्चमाध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानी भारतीय क्लासिकल डान्स प्रकार भरत नाट्यम मध्ये निपुणता मिळवली आहे.

शालेय काळात ती त्यांच्या वोलीबॉल टीम ची कप्तान सुद्धा होती. त्यांनी कराटे मध्ये ब्ल्याक बेल्ट मिळविला आहे.

१९९१ मध्ये १० वी ची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी मोडेलच्या रुपात आपल्या करियर ची सुरुवात केली होती. लिम्का टेलीविजन कमर्शियल आणि स्थानिक कमर्शियल सोबत काम केले. जाहिरातींमध्ये काम करता करता त्यांना चित्रपटाचे ऑफर यायला लागले होते.

शिल्पाने अक्षय कुमार यांच्या सोबत “मै खिलाडी तू अनाडी” (१९९४) मध्ये काम केले होते. त्यानंतर (१९९७) मध्ये “इन्साफ” च्या सेटवर ते एकत्र आले आणि त्यांच्यात मैत्रीचे संबंध आणखी पुढच्या स्तरावर गेले. मिडीयावर त्यांनी त्यांच्या संबंधाबाबत मोकळ्या मनानी स्वीकारही केला.

इंडियन मिडिया नुसार अक्षय त्यांच्या संबंधाबाबत अधिक गंभीर होता. शिल्पासमोर विवाहाचा प्रस्ताव त्याने या अटीवर ठेवला कि लग्नानंतर ती चित्रपटांमध्ये काम न करता आपला परिवार सांभाळेल. परंतु शिल्पाने त्याच्या मागणीला अस्वीकार करून आपले संबंध तोडले. त्यांच्या अभिनित “धडकन” चित्रपटाने त्यांचे संबंध नेहमीसाठी संपुष्टात आणले.

शिल्पाने उद्योगपती आणि IPL क्रिकेट टीम राजस्तान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा सोबत २२ नोव्हेंबर २००९ मध्ये लग्न केले. २०१२ मध्ये त्यांनी एका मुलाला जन्म दिला.

हे पण नक्की वाचा –

Anushka Sharma Biography

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी शिल्पा शेट्टी बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा शिल्पा शेट्टी यांचे जीवन चरित्र  – Shilpa Shetty Biography in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Shilpa Shetty Biography – शिल्पा शेट्टी यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top