गोव्यात सापडले रात्री चमकणारे मशरूम्स

Bioluminescent Mushrooms in India

आपण दररोज बऱ्याच अनोख्या गोष्टी पाहत असतो, आणि आपल्याला नवनवीन गोष्टी माहिती करून घ्यायला आवडते सुद्धा. अशीच एक अनोखी गोष्ट आताच्या दिवसात गोव्यात एका ठिकाणी पाहायला मिळाली.

दैनंदिन जीवनात आपण मशरूम ला एक प्रोटीन चा सोर्स समजून त्याला आपल्या जेवणात घेत असतो. पण काही मशरूम हे खाण्यासाठी योग्य असतात तर काही विषारी सुद्धा असू असतात, पण खूप कमी प्रमाणात खाण्यायोग्य मशरूम ची निर्मिती केल्या जाते.

तसे पाहिले असता मशरूम च्या अनेक प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात, पण आपण कधी अश्या मशरूम विषयी ऐकले नसेल, हे मशरूम आपल्याला रात्रीला चमकणाऱ्या काजव्या प्रमाणे चमकताना दिसतात.

तर आजच्या लेखात आपण त्याच गोष्टीविषयी माहिती पाहणार आहोत, कि हि सापडलेली अनोखी गोष्ट काय आहे तर.

गोव्यात सापडले रात्री चमकणारे मशरूम्स – Bioluminescent Mushrooms in India

Bioluminescent Mushrooms
Bioluminescent Mushrooms

विषय असा आहे कि गोव्याच्या बिचोलिम तालुक्यातील मेनकुरेम च्या जंगलात रात्रीला चमकणारे काही मशरूम मिळाले आहेत. हे मशरूम आपल्या साधारण मशरूम प्रमाणेच आहेत, पण हे मशरूम रात्रीला एक वेगळी चमक मारतात.

आपल्याला हि गोष्ट ऐकून विश्वास होत नसेलही पण हि गोष्ट एकदम खरीखुरी आहे, तेथे जंगलात राहणाऱ्या संस्कृती नाईक या महिलेचे एक दिवस रात्री जंगलातून जात असताना एका चमकणाऱ्या  गोष्टीकडे लक्ष गेले, तेव्हा ती महिला या चमकणाऱ्या गोष्टीजवळ गेली असता तिला मशरूम मध्ये हिरवा निळा रंग असल्याचे दिसले,

पण ते असे मशरूम होते जे चमकत होते, आणि त्यानंतर या गोष्टीची माहिती त्यांनी वनविभागाला दिली वनविभागाच्या काही कर्मच्यार्यांनी त्या गोष्टीची पुष्टी केली,

त्यानंतर या जंगलात काही शास्त्रज्ञांची टीम आली आणि त्यांनी या मशरूम चे फोटो काढले आणि काही नमुने आपल्या संशोधनासाठी घेऊन गेले. या संशोधनात त्यांनी बऱ्याच गोष्टींचा शोध घेतला,

या मशरूम ला त्यांनी बायोल्यूमिनसेंट (Bioluminescent) असे नाव दिले. या मशरूम ची विशेषता सांगताना शास्त्रज्ञ सांगतात कि हे मशरूम रात्री एखाद्या बल्ब सारखे चमकतात. मशरूम च्या ह्या प्रजातीला मायसेना जीनस म्हटल्या जाते.

हे मशरूम रात्री या साठी प्रकाश सोडतात कारण या मशरूम च्या स्पोअर्स ना किड्यांच्या माध्यमाने दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मदत होते आणि यामुळेच या प्रकारच्या मशरूम चे आणखी मोठ्या प्रमाणात उगण्यास मदत होते.

अश्या प्रकारच्या मशरूम च्या आतापर्यंत एकूण ५० प्रजाती आणखी सापडलेल्या आहेत, गोव्यातील हे मशरूम पावसाळ्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. आपल्याला हे मशरूम गोव्याच्या म्हाडेई वाइल्डलाइफ सेंचुरी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.

अश्याच प्रकारचे मशरूम आपल्याला हॉलीवूड च्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. आपण गोव्याचे असणार किंवा गोव्याच्या जवळपास राहत असणार तर या मशरूम ना पाहण्याचा आंनद आपण घेऊ शकता.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुलेलेले रहा माझी मराठी सोबत,

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here