• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 9, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information

ब्लॅक होल (कृष्ण विवर) बद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी

Black Hole Information

अवकाश जगतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दलचे शोध माणसाला अजूनही लागले नाहीत. काही गोष्टींबद्दल शास्त्रज्ञ केवळ गृहीतकं मांडत असतात. कालांतराने या गृहीतकांची सत्यासत्यता सिद्ध होते आणि मग त्याला मान्यता मिळते. अशीच एक अलीकडच्या काळात मान्यता मिळालेली संकल्पना म्हणजे ब्लॅक होल !

ब्लॅक होल (कृष्ण विवर) बद्दल काही महत्वपूर्ण गोष्टी – Black Hole Information

Black Hole Information
Black Hole Information

ब्लॅक होल ला ब्लॅक होल म्हणण्याचे कारण म्हणजे त्याचा रंग. ब्लॅक होल मध्ये आपण पाहू शकत नाही आपण फक्त त्याचे परिणाम पाहू शकतो. ब्लॅक होलच्या सभोवतालच्या क्षेत्राचे विश्लेषण केल्याने आपण त्याचे वातावरण यावर होणारे परिणाम पाहू शकतो.
ब्लॅक होल म्हणजेच मराठीत कृष्ण विवर.

“ब्लॅक होल ही काही तार्‍यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत ब्लॅक होलमध्ये रुपांतरित होतात. अशा ब्लॅक होलचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की प्रकाशदेखील त्यापासून सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा तार्‍यांना ब्लॅक होल म्हणतात.”

ब्लॅक होलमध्ये गेलेली कोणतीही वस्तू परत येऊ शकत नाही, अगदी प्रकाशसुद्धा! ब्लॅक होल ही संकल्पना सर्वप्रथम १७८३ साली केम्ब्रिज येथील जॉन मिचेल यांनी मांडली होती. त्यानंतर काही वर्षांनी याच संकल्पनेशी साधर्म्य साधणारी संकल्पना ला-प्लास यांनी मांडली. त्यांनतर सन १९१५ मध्ये अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला. १९१९ साली सूर्यग्रहणाच्यावेळी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे एका ताऱ्याची जागा बदललेली आढळली आणि या सिद्धांताला पुष्टी मिळाली.

ब्लॅक होल किंवा ब्लॅक होलची शास्त्रीय संकल्पना मांडण्याचे श्रेय मात्र अमेरिकन खगोल वैज्ञानिक जॉन व्हीलर यांचे. व्हीलर यांनी १९६७ साली ब्लॅक होल ची शास्त्रीय कल्पना मांडली. त्यांनतर १९७१ मध्ये पहिले ब्लॅक होल मध्ये शोधले गेले.

ब्लॅक होल या संकल्पनेला स्टीफन हॉकिंग यांनी एक वेगळा दृष्टिकोन दिला. त्यांच्या मते, ब्लॅक होलमध्ये शिरल्यानंतर आपण नष्ट होणार नाही तर, ब्लॅक होलच्या पलीकडे कदाचित अजून एखादे विश्व असेल आणि ब्लॅक होल हा त्या विश्वात जाण्याचा मार्ग असेल.

शास्त्रज्ञांप्रमाणेच सर्वसामान्य माणसांच्या मनातही एलियन, टाइम ट्रॅव्हल, पॅरलल युनिव्हर्स या संकल्पना इतकंच कुतूहल ब्लॅक होल बद्दलही आहे. ब्लॅक होलमध्ये गेलेली कोणतीही वस्तू परत येत नसल्यामुळे ब्लॅक होलच्या आतमध्ये नक्की काय आहे याबद्दलची कोणतीच माहिती आपल्याला मिळू शकत नाही.

ब्लॅक होल्सचे तीन प्रकार आहेत.

1. लघु ब्लॅक होल (Primordial Black Holes) –
हा सर्वात लहान ब्लॅक होल आहेत. यांचे आकारमान साधारणतः अणूच्या आकारापासून ते एखाद्या छोट्या डोंगराच्या वस्तुमानाएवढे असते.

2. मध्यम आकाराचे ब्लॅक होल (Stellar Black Holes) –
सर्वसामान्यपणे आधणारा हा ब्लॅक होलचा प्रकार सूर्यापेक्षा साधारणतः २० पट जास्त मोठा असतो.

3. विशाल ब्लॅक होल (Supermassive Black Holes)-
हा ब्लॅक होल मधील सर्वात मोठा प्रकार असून याचा आकार सूर्यापेक्षा १ दशलक्ष पट जास्त असतो.

खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय टीमने केलेल्या नव्या अभ्यासात J2157 नावाचे ब्लॅक होल हे आत्तापर्यंत ज्ञात असलेल्या ब्लॅक होल्स पैकी सर्वात जलदगतीने वाढणारे ब्लॅक होल आहे. हे ब्लॅक होल प्रचंड मोठे असून, आपल्या सूर्याच्या वस्तुमानांपेक्षा 34 अब्ज पट आहे. हे संशोधन “ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी” ने केले होते व याबाबतचा विस्तृत अहवाल ‘रॉयल अस्ट्रोनोमिकल सोसायटीच्या मासिक पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आला होता.

डॉ. क्रिस्तोफर ओन्केन यांच्या मते, हे ब्लॅक होल आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या इतर ब्लॅक होलपेक्षा 8,000 पट मोठे आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, “जर हे ब्लॅक होल असेच वाढत राहिले तर आपल्या आकाशगंगेतील दोन तृतीयांश तारे गिळंकृत करेल.”

ख्रिश्चन वुल्फ यांच्या म्हणण्यानुसार, “हा ब्लॅक होल इतक्या वेगाने विस्तारत आहे की तो संपूर्ण आकाशगंगेच्या तुलनेत हजारो पटीने उजळलेला असतो, कारण दररोज सर्व वायू त्यात शोषून घेतले जातात ज्यामुळे बर्‍याच घर्षण आणि उष्मा होतात.”

हे वाचून भयभीत होऊ नका, पृथ्वीला सध्यातरी अजिबात धोका नाही. खगोलशास्त्रज्ञांच्या मते सर्वात जवळचा ब्लॅक होल ‘व्ही 6464647 Sagitarii’ पृथ्वीपासून जवळपास 20,000 प्रकाश वर्ष दूर आहे.

Editorial team

Editorial team

Related Posts

जाहिरात लेखन कसे करावे
Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
July 10, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved