Wednesday, June 25, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

गाजराची माहिती आणि फ़ायदे

Gajar chi Mahiti

सलादमध्ये आपण खातो त्या पदार्थात गाजरच. सर्वोत्तम असते. गाजरामुळे रक्तवाहिन्यांना संजीवन प्राप्त होते. गाजर कच्चे-सलादरुपात खाणे तर चांगले असतेच. पण गाजराचा कपभर रस थोडे पाणी मिसळून घेतला असता फार उपयोगी ठरतो. काम करून मनुष्य थकतो. या क्षीणतेची उत्तम पूर्ती गाजराच्या रसाने लगेच होते, कारण यात भरपूर पोषक तत्वे असतात, ज्यांची शरीराला नितांत आवश्यकता असते. गाजराच्या रसपानामुळे पचनसंस्था मजबूत होते. मलातील दुर्गध व विषारी किटानु नष्ट होतात. गाजरात बिटा-कॅरोटीन नामक औषधी तत्त्व असते ते कॅन्सरवर नियंत्रण करण्यासाठी उपयोगी असते. दीर्घकालीन आजारानंतर शरीराची जी हानी होते त्यांची क्षतिपूर्ती करण्यासाठी गाजर-रस फार प्रभावी ठरतो.

अश्या बरेच गुण आहेत या गाजर, काय तुम्हाला माहिती नाही. आम्ही या लेखात घेवून आलो आहोत गाजराची माहिती आणि फ़ायदे, चला तर मग वाचू या पुढे

गाजराची माहिती आणि फ़ायदे – Carrot Information in Marathi

Carrot Information in Marathi
Carrot Information in Marathi
हिंदी नाव गाजर
इंग्रजी नाव Carrot

रोगी अल्पकाळात चुस्त व शक्तिशाली बनू शकतो. गाजराचा रस इतका लाभदायक असला तरी सर्दी-पडसे, जीर्णज्वर, न्यूमोनिया किंवा तीव्र ज्वर असताना मात्र गाजराचे सेवन करू नये. टॉन्सिलायटीस, आंव, रक्ताल्पत मूतखडा, मूळव्याध, अल्सर इ. मध्ये गाजर फार उपयुक्त असते.

लालभडक रंगाच्या गाजरापेक्षा काळपट रंगाचे गाजर अधिक चांगले असते. स्वादासाठी गाजराच्या रसात जिऱ्याची पावडर, सेंधेमीठ किंवा थोडी साखर मिसळून घ्यायला हरकत नाही. एक ग्लासभर गाजराचा रस पूर्ण भोजन समजले जाते. यापेक्षा जास्त रस मात्र एकावेळी न घेणेच हितकर असते. जे लोक सफरचंद खात नाहीत किंवा खाऊ शकत नाहीत त्यांनी गाजर अवश्य खावे. सफरचंदांच्या तुलनेत गाजर बरेच स्वस्तही असते. गाजरात व्हिटामिन ‘ए’ सर्वाधिक आढळते. व्हिटामिनबी. सी, डी, ई, जीव के सुद्धा काही प्रमाणात आढळतात. यात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह तत्व असतात. गाजरामळे मज्जासंस्थेची चांगली रक्षा होते.

गाजरात संतुलित आहाराचे तत्त्व असतात. यामुळे अनिद्रा रोग दूर होतो. शारीरिक थकवा जाऊन स्नायुविक शक्ती उत्पन्न होते.

गाजरामुळे हानीकारक एलडीएल कोलेस्टेरॉलमध्ये घट होते. गाजरात उच्च दर्जाचे (पेक्टिन सह) घुलनशील तंतूमय तत्व असतात. त्यामुळे रोज मध्यम आकाराचे दोन गाजर खाल्लेत तर १० ते २०% कोलेस्टेरॉलची घट होऊ शकते.

गाजराचे फ़ायदे – Carrot Benefits

  • जीवनात उत्साह साहस व शक्ती निर्माण होते,
  • रक्ताची कमतरता दूर होते व वजन वाढते.
  • गाजर प्रत्येक व्यक्तीसाठी शक्तीवर्धक टॉनिक समजले जाते.
  • गाजरामुळे हृदयाची धडकन कमी होते, लघवी साफ व्हायला लागते,
  • स्मरणशक्ती वाढते,
  • गाजरामुळे नेत्र-ज्योती वाढते व म्हातारपणात डोळ्यांची कमजोरी जाणवत नाही.
  • दूध पाजणाऱ्या मातांना गाजरं नियिमितपणे खाल्ले तर अंगावरचे दूध वाढते.
  • गाजरात व्हिटामिन ‘बी’ कॉम्प्लेक्स आढळते जे पचनसंस्थेला शकतशाली बनविते.
  • अन्न न पचणे, पोटात वायु होणे इ. कमी होऊन शौच्यास साफ व्हायला लागते.
  • दुर्बल मुलांना दोन-तीन चमचे गाजराचा रस रोज पाजला तर धष्टपुष्ट होतात.
  • ज्या बालकांना लहानपणी गाजराचा रस दिला गेला ते सहजा आजारी पडत नाहीत.
  • गाजराच्या रसामुळे शरीरात कॅल्शियमची कधीही कमतरता निर्माण होत नाही. यकृत रोग असणाऱ्यांनी विशेषतः काविळीचा विकार झालेल्यांनी गाजराचा रस जरूर प्यावा.
  • हृदयाची धडकन वाढणे व रक्त घट्ट होणे इ. मध्येसुद्धा गाजर गुणकारी असते.
  • तूप किंवा तेलाचे पदार्थ पचत नसतील तर गाजर व पालकाचा रस एकत्र करून घ्यावा, फायदा होईल.
  • जुनाट हगवण, संग्रहणी इ. मध्येसुद्धा गाजर फार लाभकारी असते. गाजराचा रस किटाणुनाशक असतो व संक्रमण दूर करतो.
  • गाजरामुळे रक्त शुद्ध होऊन फोड-फुन्सी, खाज-खुजली मिटते व चेहऱ्यावरील मुरूमही जातात.
  • त्वचेला कोरडेपणा गाजराच्या रसामुळे कमी होतो.
  • हिवाळ्यात त्वचा शुष्क होते व तेव्हा गाजर भरपूर उपलब्ध असतात. म्हणून हिवाळ्यात तरी गाजर नियमित खावेत.
  • गाजर उकळून त्यातून रस काढावा व त्यात मध टाकून सेवन करावे, ज्यामुळे छातीत दुखणे कमी हाते.
  • त्वचा अग्नीमुळे जर भाजली गेली तर त्यावर कच्च्या गाजराचा किस लावावा, आग कमी होईल व पू होणार नाही.
  • गाजराच्या रसामुळे संधीवातात चांगला फायदा होतो.
  • गाजर, बिट व काकडी यांचा रस समान प्रमाणात एकत्र करून घेतल्यास शीघ्र लाभ होतो.
  • मुत्रपिंडाच्या विकारात एक चमचा गाजराचे बी एक ग्लास पाण्यात उकळून घेतल्यास लघवी साफ होते.
  • गाजराच्या रसामुळे मूतखड्याच्या विकारातही आराम होतो.
  • गाजरामुळे टॉन्सिलायटीसमध्ये लाभ होतो व दातही मजबूत होतात.
  • गाजर व पालकाचा रस एकत्र करून घेतल्यास मधुमेहींनाही फायदा होतो. त्यात काकडीचा रस टाकून घेतला तर श्वासाची दुर्गंधीही मिटते व नेत्र-ज्योतीसुद्धा वाढते.
  • डोकेदुखी, गजकर्ण, ज्वर इ. मध्ये गाजराचा रस काकडी व बिटच्या रसाबरोबर देणे हितकारक असते.

Editorial team

Editorial team

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved