‘काजू’ फळाची संपूर्ण माहिती

Kaju chi Mahiti

आपल्या परिसरात अनेक गुणकारी झाडे आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘काजू’ चे झाड होय. हे तुम्हाला कदाचित माहित असेलच कि फळाचा राजा म्हणजे हापूस आंबा तर फळाची राणी म्हणजे काजू. हे फळ सुकामेवा असून खाण्यास अगदी चविष्ट असल्याने मिठाईत याचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रत कोकणात काजूची लागवण होते, याची मोठ्या प्रमाणवर आयात -निर्यात सुद्धा होते. काजूच्या फळाला बोंडू किंवा जांबू असे देखील म्हणतात.

महत्वाचे सागायचे म्हणजे काजू हे औषधी उपयुक्त आहे. काजू हे बरेचाशा आजारावर मात करण्यासाठी उपयोगात आहे.

‘काजू’ फळाची संपूर्ण माहिती – Cashew Tree Information in Marathi

Cashew Tree Information in Marathi
Cashew Tree Information in Marathi
हिंदी नाव: काजू
इंग्रजी नाव: Cashew

काजू हे औषधी उपयुक्त – cashews useful as Medicine

  • काजूमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.
  • काजू हे औषधी उपयुक्त असल्याने बऱ्याच आजारावर मात करते, जसे कि वात, पित्त, कफ पोटाचे आजार, ताप, जंत, जखमा, पांढरा कृष्ठरोग, मुळव्याध, भूक न लागणे आणि अश्यक्तपणा कमी करण्यास मदत करते .
  • काजू मध्ये कॅल्शिअम, स्निग्ध पदार्थ, खनिजे, फॉस्फरस, कर्बोदके आणि प्रोटीन्सचा उत्तम स्रोत आहे .
  • काजु फळ हे फायबर विपुलपूर्ण असल्याने त्याचा उपयोग पोट साफ होण्यासाठी होतो.
  • काजूचे नियमित सेवन केल्याने हृदयरोग आणि मधुमेह टाळण्यासाठी सहाय्यक आहे.
  • काजू मध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे घटक आहेत .
  • काजू हे डोळ्यांसाठी लाभदायक आहे.
  • काजू इम्यून सिस्टमला बूस्ट अप करतो.त्यामुळे बऱ्याच आजारावर मात होते.

काजू खाण्याचे महत्वाचे फायदे – Benefits of cashews

1.हृदय तंदुरुस्त राहते –

काजूमध्ये बायो ऍक्टिव्ह मायक्रोन्यूट्रिएंट नावाचा महत्वाचा घटक असतो, हा घटक आपले हृदय तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो.

2. कॅन्सर विरोधी –

तज्ञाच्या सागन्यानुसार असे म्हटले जाते कि काजूमध्ये एनाकार्डीक ऍसिड आढळत असल्याने हा घटक कॅन्सर जीवाणू विरोधी असल्याने कॅन्सर पासून आपला बचाव होतो.

3.गर्भवती महिलांसाठी –

काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे उपयुक्त पोषक घटक असल्याने याचे सेवन केल्यास गर्भवती महिलांना याचा फायदा होतो तसेच होणाऱ्या बाळाची हाडे देखील मजबूत होतात.

काजूच्या झाडा बद्दल माहिती – chasews Tree Information

काजू च्या झाडाचे वर्णन आंब्यांच्या झाडाशी मिळते-जुळते असते. या झाडाची पाने हिरवी असतात. वरून तांबूस रंगाचे आवरण व आतामध्ये पांढऱ्या रंगाचे फळ असते. या झाडाला जी फुले येतात त्यांनाच मोहर असे म्हणतात. या झाडाचे जे पांढरे फळ, जे सुकामेवा म्हणून खाण्यासाठी वापरतात, तेच काजू म्हणून वापरतात.

काजूची लागवड – Kaju Lagwad

काजू या झाडाची लागवड करण्यासाठी उष्ण व दमट हवामान असावे लागते, या झाडाला पावसाचे पाणी प्रामुख्याने असावे लागते. विशेषकरून कोकण, केरळ, तामिळनाडू या ठिकाणी काजूचे उत्पादन घेतले जाते. जास्तीत जास्त उत्पादन सिंधुदुर्गरत्नागिरी जिल्हयांत घेतले जाते.

इतर उपयोग : Other Uses

शिरा, बर्फी, लाडू तसेच मिठाईमध्ये काजूचा उपयोग करतात, काजूची जेली, मुरंबा, चॉकलेट वगैरे पदार्थ बनवतात.

इतर माहिती : Other Information

काजूच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होती, या झाडाच्या लाकडापासून होड्या, टाईपरायटर, गैलर्स तयार करतात, कलाकुसरीचे लाकूडकाम करताना या झाडाच्या लाकडाचा उपयोग करतात.

या झाडाच्या सालीपासन मिळणाऱ्या रसाचा उपयोग बाई व रंग तयार करण्यासाठी करतात, काजूच्या फळावर जे तांबूस रंगाचे टरफल असते, ते कोंबड्यासाठी पौष्टिक अन्न म्हणन वापरले जाते. या टरफलाचा उपयोग तेल काढण्यासाठीही होतो. या तेलाचा उपयोग कोळी लोक जाळयाना लावण्यासाठी व बोटीच्या बाहेरील भागास लावण्यासाठी करतात, अशा या बहुगुणी काजूच्या झाडाची लागवड लोक शेतात करतात, त्यापासून त्यांना उत्पादन मिळते. हे एक अर्थार्जनाचे झाड आहे. पूर्ण वाढ झालेल्या प्रत्येक झाडापासून किमान ६० ते ७० किलो काजूफळे मिळतात.

काजू बद्दल काही प्रश्न –  Quiz questionabout Cashews 

Q. काजू खाण्यचा शरीरासाठी महत्वाचा फायदा कोणता ?

उत्तर: महत्वाचा फायदा रक्तातील व्हाईट कोलेस्टेरॉल (LDL कॉलेस्टरॉल) आणि triglyceride चे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

Q. काजूचे अति सेवनामुळे होणारे तोटे कोणते ?

उत्तर: काजू मध्ये सोडियम घटक असल्याने त्याच्या जास्त सेवनाने शरीरात सोडियम चे प्रमाण वाढते ,त्यामुळे ब्लड प्रेशर ,स्ट्रोक किवा हृद्य संबधित आजार होऊ शकतात .

Q. दिवसाला किती काजू खावेत ?

उत्तर: काजू दिवसाला दोन ते चार खावे .

Q. काजूचे उत्पादन शेती करणे योग्य आहे का ?

उत्तर: होय, इच्छुक शेतकरी याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करू शकतो, काजू या झाडाची लागवड करण्यासाठी उष्ण व दमट हवामान असावे लागते, या झाडाला पावसाचे पाणी किवा मुबलक पाण्याची आवश्यकता प्रामुख्याने असावे लागते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top