चिकू फळाची संपूर्ण माहिती

Chiku chi Mahiti

हे फळझाड मूळचे मेक्सिको मधले असून भारतात लोकप्रिय झाले. हिवाळी ऋतूतील हे फळ असून खायला अगदी गोड आहे .यात ओषधी गुणधर्म सुद्धा आहेत. चिकू मध्ये महत्त्वाची घटक व्हिटामिन सी, फायबर, पोटॅशियम, टार्टरिक ऍसिड, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम हि महत्त्वाची पोषण द्रव्य आढळतात.

चिकू फळाची संपूर्ण माहिती – Chikoo Information in Marathi

Chikoo Information in Marathi
Chikoo Information in Marathi
हिंदी नाव: चिकू
इंग्रजी नाव: Chikoo

चिकू ची झाडे मोठी असून, खोड काळपट रंगाचे असते. याची पाने हिरवीगार असून, आकार थोडासा लांबट असतो, पानाला छोटेसे देठ असते. ही पाने टोकाला थोडीशी टोकदार असतात.
चिकूचे फळ हे चॉकलेटी असते. ही फळे जातीनुसार गोलाकार व अंडाकृती लहान-मोठी असतात. आतील गर तांबूस तपकिरी रंगाचा व चवीला गोड असतो. फळांमध्ये काळ्या रंगाचे मोठे बी असते. काही फळांमध्ये एकापेक्षा अधिक म्हणजे दोन बिया असू शकतात.

जाती : काळी पत्ती, छत्री, कलकत्ता मोठी, पाला, द्वारापुडी अशा प्रकारच्या या फळांच्या चार ते पाच जाती आढळतात.

चिकूचे औषधी उपयोग – Chikoo Fruit Benefits

  1. पचनास मदत होते -पचनास मदत होऊन बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होतात .
  2. रक्तदाब ला योग्य नियंत्रित करते .चिकू खाल्ल्याने रक्ताभिसरनाची क्रिया योग्य होते .
  3. चिकू खाल्ल्याने शक्ती येते, पित्त कमी होते.
  4. हाडे मजबूत व बळकट होण्यास मदत होते .कारण चिकू मध्ये लोह हा घटक आहे .
  5. पित्तकारक डोकेदुखी, ताप, लघवीचा त्रास इत्यादीवर हे फळ उपयोगी पडते.
  6. चयापचय क्रिया नियमित करते त्यामुळे वजन कमी होण्यास याचा उपयोग होतो .
  7. आजारातून उठल्यानंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी चिकूचा ज्यूस देतात.
  8. चीकुमध्ये नैसर्गिकरीत्या फ्रुक्टोज व सुक्रोज असल्याने शरीरास एक नवी उर्जा व शक्ती मिळते.
  9. चिकू एका प्रकारे क्लीनझिन चे कार्य करणे जसे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते त्यामुळे आपली त्वचा व केस उत्तम होतात .

 

इतर माहिती : चिकूच्या झाडाला बारा महिने फळ येते. चिकू या फळांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अ, ब व क जीवनसत्त्वे मिळतात. चिकू हे गरम प्रकृतीचे फळ आहे.
घरोघरी, बागेत चिकूची झाडे लावतात. अशा बहुउपयोगी फळाची बाजारपेठेत मागणी वाढत असल्याने शेतकरी चिकूच्या बागा तयार करत आहेत. जोडधंद्यामुळे शेतकऱ्यांना अर्थार्जनाचा उत्तम मार्ग मिळाला आहे.

चिकू बद्दल काही महत्वाचे प्रश्न – Quiz Question about Chikoo 

प्रश्न. चिकू खाल्याने डोळ्याच्या आरोग्याला लाभ होतो का?

उत्तर: हो, चिकू मध्ये विटामिन ए व विटामिन सी असल्याने डोळ्यांना ते निरोगी ठेवण्यास मदत करते.

प्रश्न. चिकू चा कोणत्या ऋतूत लागतात?

उत्तर: हिवाळी ऋतूत चिकू खाण्यास योग्य होतात.

प्रश्न. साधरण चिकू लागवडीच्या कलमा कोणत्या महिन्यात लावाव्या?

उत्तर: एप्रिल – मे कारण कोरड्या व दमट वातावरणात चिकू च्या झाडाची वाढ झपाट्याने होते.

प्रश्न. चिकू चे botanical नाव काय?

उत्तर: Manilkara zapota (मनिलकारा झापोटा)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top