कोरोना देवीची गोष्ट किती खरी आणि किती खोटी.

Corona Goddess Temple in Solapur

देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनामुळे असंख्य लोकांचा बळी गेला, एवढच नाही तर जगात महिने च्या महिने यामुळे लॉक डाऊन ठेवले होते कि कोरोनाचा प्रदुर्भाव एकमेकांना एकमेकांच्या संदर्भात राहिल्याने होऊ नये,

पण देशातील काही लोकांना या सर्व गोष्टी विनाकारण केल्याचे वाटत आहेत, आता पहा ना सोलापुरातील हि एक घटना आहे, जेथे कोरोना ला कोरोनादेवी बनविले, आणि कोरोनादेवीच्या नावावर कोंबड्यांचा आणि बोकडांचा बळी द्यायला सुरुवात केली होती,

पण कोंबड्यांचा आणि बोकडांचा बळी देणे कितपत योग्य वाटत, याला सरळ सरळ मूर्खपणा म्हणाव लागेल,

सोलापुरात कोरोना देवीच्या नावावर कोंबड्या आणि बोकड्यांचा बळी. पहा काय आहे घटना – Corona Goddess Temple in Solapur

Corona Goddess Temple in Solapur
Corona Goddess Temple in Solapur

कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा त्याची लागण होऊ नये या साठी चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आली,  हा मूर्खपणाचा प्रकार सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी शहरातील पारधी वस्तीत पाहायला मिळाला.

काही दिवसा अगोदर एक विडीओ वायरल झाला होता ज्या विडीओ मध्ये एक महिला असे वक्तव्य करताना दिसली कि, “कोरोना काळात आम्ही मास्क वापरला नाही, फक्त कोरोना देवीची पूजा करत असल्यामुळे आम्हाला सर्दी खोखला असे काहीही झाले नाही”

हा विडीओ जेव्हा वायरल झाला तेव्हा संबंधित प्रशासनाने याची लगेच दखल घेत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सोलापुर जिल्ह्यातील बार्शी शहराच्या एका पारधी वस्ती मध्ये तीन जणांनी कोरोना नावाच्या देवीची स्थापना करून तिला प्रसन्न करण्यासाठी कोंबड्या आणि बोकड यांचा बळी देण्याची धक्कादायक घटना समोर आल्याने त्या भागाचे पोलीस निरीक्षक एस. डी. गिरीगोसावी यांनी या माहितीची दखल घेत तीन जणांवर गुन्हा दाखल केला,

अंधश्रध्दा निर्मुलन समिती:

या घटनेवर अंधश्रध्दा निर्मुलन समितीने आक्षेप घेत समाजात असलेल्या अंधश्रद्धेने अशा प्रकारच्या घटना घडतात, असा त्यांनी आक्षेप घेतला आहे,

कोरोना हा एक विषाणू आहे, आणि त्यावर सध्या तरी कोणती ठाराविक लस निघाली नसल्याने या विषाणूची लागण होण्यापासून वाचण्यासाठी तोंडाला मास्क, सोबतच साबणाने स्वच्छ हात धुणे आणि सॅनिटायझर चा वापर ह्याच गोष्टी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कराव्या लागतील, असे सार्वजनिक आरोग्य संघटनेने सांगितलेले आहे, अश्या कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे.

आपणही देशाचे एक जागरूक नागरिक आहोत म्हणून आपणही आपल्या आजूबाजूला अश्या घडलेल्या घटनांचा विरोध करावा, आणि लोकांना अश्या गोष्टींपासून जागरूक करावे. कोरोना हा एक विषाणू आहे, आणि त्याच्या पासून वाचण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचे पालन करावे लागेल.

जसे घराबाहेर निघतेवेळी मास्क घालून निघावे. आणि आपल्या हातांना नेहमी सॅनिटायझ करत राहावे. आणि जेवना अगोदर साबणाने २० सेकंद आपले हाथ स्वच्छ धुवावे, एकमेकांपासून २ मीटर च्या अंतरावर राहायचे प्रयत्न करायचे. सोबतच आजूबाजूच्या अश्या अफवांकडे दुर्लक्ष केलेले कधीही बरे.

अश्याच नवनवीन बातम्यांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top