फुग्यांच्या सहाय्याने आकाश्यात गेला २५ हजार फुटांवर, पहा पुढे काय झाले.

स्कायडायविंग करण्याचा आनंद आपल्याला कधी ना कधी घ्यावा वाटला असणारच ना. आपणही कधी ना कधी विमानात बसले असणार किंवा बसावे वाटत असेल, जसे कि लहानपणी आपल्याला वाटत असायचे कि आपल्याला ही पंख असते तर आपल्यालाही उडता आले असते.

त्याच प्रमाणे एका व्यक्तीने आकाशात हवेत उडून एक नवीन विक्रम रचला आहे, हा विक्रम त्याने कश्या प्रकारे केला असेल, आणि हि व्यक्ती कोण आहे?

या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखात मिळणार आहेत, तर आजच्या लेखात आपण त्या व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत त्या व्यक्तीविषयी. तर चला जाणून घेवूया.

फुग्यांच्या सहाय्याने आकाश्यात गेला २५ हजार फुटांवर, पहा पुढे काय झाले – David Blaine Flies into Sky with the Help of Balloons

David Blaine Flies into Sky with the Help of Balloons
David Blaine Flies into Sky with the Help of Balloons

हे रेकॉर्ड करणारी व्यक्ती अमेरिकेची आहे. या व्यक्तीचे नाव डेव्हिड ब्लेन असे आहे. डेव्हिड हा अमेरिकेचा एक प्रसिद्ध जादुगार आहे. या जादुगार व्यक्तीचे वय ४७ असून या या व्यक्तीने जवळ जवळ २५ हजार फुटांपर्यंत फक्त फुग्यांच्या सहाय्याने उडत जाण्याचा नवीन विक्रम रचला आहे.

अमेरिकेच्या डेव्हिड ब्लेन (David Blaine) नाव असणाऱ्या एका जादुगाराने फुग्यांच्या सहाऱ्याने एक अजब स्टंट केला आहे, आणि अजब स्टंट चा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर टाकला आहे. या व्हिडियो मध्ये तो फुग्यांच्या सहाऱ्याने २४९०० फुट हवेत उडत जातो, आणि हे कार्य त्याने एकट्याने केले नसून त्याच्या टीमने सोबत केले आहे.

या स्टंट ला त्याने Ascension असे नाव दिले आहे, Ascension म्हणजे स्वर्गारोहण होते, आभाळाची एक वेगळी सवारी.

त्याने या स्टंट च्या व्हिडीओ ला लाइव्ह स्ट्रीम केले होते, त्याच्या या व्हिडीओ ला युट्यूब वर जवळ जवळ १ कोटी ५२ लाख लोकांनी पाहिले आहे. या स्टंट साठी त्याने एकूण २ वर्षाआधी तयारी केली होती. तयारी मध्ये डेव्हिड ने सर्व प्रकारच्या संभावना काढल्या होत्या. आणि त्यानंतर च त्याने या स्टंट ला पूर्णत्वास नेले.

तो जेव्हा या स्टंट ला करताना २५ हजार फुटांवर गेला तेव्हा त्याने फुग्यांना सोडून दिले आणि तो पॅराशूट च्या साहाय्याने जमिनीवर आला. २५ हजार फुट उंची म्हणजे ज्या उंचीवर विमान उडत असते. तर आपण विचार करू शकता तो जमिनीपासून किती अंतरावर असेल.

याधीही त्याने असेच अनेक स्टंट केलेले आहेत. तो बरेच दिवस बर्फाच्या एका ब्लॉक मध्ये राहिल्याचे माहिती होते. पण असा स्टंट त्याने पहिल्यांदा केल्याचे लक्षात येते.

आपल्याला लिहिलेली माहिती आवडली असणार तर या माहितीला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेल राहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top