राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीत यामध्ये काय अंतर आहे?

National Anthem and National Song

भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले होते. त्यानंतर दरवर्षी १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. १५ ऑगस्टला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भारताचे प्रधानमंत्री संपूर्ण देशाला संबोधित करतात. सोबतच सर्वात आधी राष्ट्रगीताचे गायन होऊन झेंडावंदन होते, आणि त्यांनंतर प्रधानमंत्री संपूर्ण देशाला संबोधन करतात. भारत हा विविधतेतून परंपरा दाखविणारा हा देश आहे.

या देशात अनेक धर्माचे पंथाचे लोक सलोख्याने नांदतात. आणि या देशाला धर्मनिरीपेक्षक असल्याचे दाखवितात. प्रत्येक देशाचं एक गीत असते ज्याला राष्ट्रीयगीत म्हणतात. तसेच काही विशिष्ट वेळी या राष्ट्रीय गीताचे गायन केल्या जाते. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीत यामध्ये जास्त फरक नाही, आणि विशिष्ट प्रसंगी या या दोन्ही गीतांचे गायन केल्या जाते. काही लोकांना प्रश्न पडला असेल की राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीत यामध्ये काय अंतर असेल तर या लेखातून आपण आज पाहूया की राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यामध्ये काय अंतर आहे?

राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत मध्ये काय फरक आहे – Difference Between National Anthem and National Song

Difference Between National Anthem and National Song
Difference Between National Anthem and National Song

राष्ट्रगीता विषयी थोडक्यात माहिती – National Anthem Information 

आपल्या देशाचे राष्ट्रगीत हे जण गण मन असून या गीताला रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते. आणि संविधानाच्या सभेत या गीताला २४ जानेवारी १९५० मध्ये संमती मिळाल्यानंतर जण गण मन या गीताला राष्ट्रीय गीत म्हणून घोषित करण्यात आले, आपल्या माहिती साठी या गीताला सर्वात आधी कोलकत्ता च्या काँग्रेस च्या कार्यक्रमात १९११ ला म्हटल्या गेलं होतं.

राष्ट्रगीत देशाचा इतिहास, सभ्यता, संस्कृती, या सर्व गोष्टींचे दर्शन करून देते. राष्ट्रगीताला संविधानाचा दर्जा प्राप्त झालेला आहे, त्यामुळे राष्ट्रगीताचे गायन करतांना काही नियमांचं पालन करायला हवे. त्या नियांनाच पालन हे प्रत्येक भारतीयाने करणे बंधनकारक आहे.

राष्ट्रीयगीता विषयी थोडक्यात माहिती – National Song Information 

आपल्या देशाचे राष्ट्रीयगीत हे वंदे मातरम आहे, या गीताचे निर्माण बकिमचंद्र चॅटर्जी यांनी केलेले होते. वंदे मातरम हे बंगाली साहित्यातील एक कविता होती, आणि या गीताला स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या विरुद्ध प्रेरणा स्रोत बनविल्या जाते. आणि या गीताचे गायन करून प्रत्येकाच्या शरीरात एक नवीन चैतन्य संचारत होते. आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यास त्यांना मदत मिळत होती.

या गीताला सर्वात आधी १८९६ साली काँग्रेसच्या  अधिवेशनात गायल्या गेलं होतं. आणि २४ जानेवारी ला १९५० साली या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा प्राप्त झाला, वंदे मातरम राष्ट्रीय गीताला आणि जण गण मन असलेल्या राष्ट्रगीताला सारखाच दर्जा प्राप्त  झालेला आहे. आजही देशातील बऱ्याच विधान भवनात वंदे मातरम च्या गीताने विधान भवनाचे कामकाज सुरू होते.

भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम आणि राष्ट्रगीत जण गण मन असून यांच्या विषयी आपल्याला अधिक माहिती मिळाली असेल, तर आशा करतो लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल, आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर कारायला विसरू नका.आणि सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत,आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here