डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी संपूर्ण माहिती

Dr Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi

देशाला अनेक राष्ट्रपती लाभले जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अव्वल होते, त्यापैकी देशाला लाभलेले एक राष्ट्रपती म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. ज्यांचा जन्म दिवस अनेक शिक्षकांच्या कामगिरीची सराहना करण्यासाठी साजरा केला जातो, तो दिवस म्हणजे ५ सप्टेंबर शिक्षक दिन.

तर आजच्या लेखात आज आपण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी थोडीशी माहिती पाहूया, जी आपल्याला त्यांच्या विषयी असलेल्या काही गोष्टींचे ज्ञान देऊन जाईल. तर चला जाणून घेवूया, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन – Dr Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi

Dr Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi
Dr Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi

राधाकृष्णन यांचे सुरुवातीचे जीवन – Dr Sarvepalli Radhakrishnan in Marathi

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये तामिळनाडू मध्ये तीरुत्तानी येथे एका गरीब ब्राम्हण परिवारात झाला होता, तीरुत्तानी हे त्याकाळी मद्रास संस्थानात होते. ब्राम्हण परिवारात जन्म झालेला असल्याने डॉ. राधाकृष्णन यांच्या वडिलांची एक इच्छा होती, कि राधाकृष्णन यांनी भविष्यात पांडित्य शास्त्राचा अभ्यास करून मोठे पंडित व्हावे,

पण जेव्हा राधाकृष्णन यांना शाळेत टाकले तेव्हा ते अभ्यासात अतिशय हुशार निघाले, ते अभ्यासात एवढे हुशार होते कि त्यांनी बरेचश्या शिष्यवृत्या प्राप्त केल्या होत्या, याच शिष्यवृत्यांच्या भरवशावर त्यांनी कॉलेजात प्रवेश घेतला. पहिले वेल्लूर च्या वूर्ही कॉलेजला गेले त्यानंतर मद्रास ख्रिश्चन कॉलेज मध्ये आपले शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

मद्रास ख्रिश्चन कॉलेज मध्ये त्यांनी फिलोसोफी हा विषय निवडला, फिलोसोफी हा विषय त्यांनी यासाठी निवडला होता कि त्यांच्या कडे बाकी विषयांचे पुस्तके घेण्यासाठी पैसे नव्हते, फिलोसोफी या विषयाचे पुस्तके सुद्धा त्यांनी त्यांच्या एका नातेवाईका कडून घेतले होते ज्याने त्याच कॉलेजातून त्याचे फिलोसोफी चे शिक्षण पूर्ण केले होते,

त्यानंतर त्यांनी कसून अभ्यास केला आणि फिलोसोफी विषयात प्रथम क्रमांक मिळवून ते पास झाले. सोबतच त्यांनी विसाव्या वर्षी स्वतः वेदांत तत्वज्ञानावरील प्रबंध या विषयाचे लिखाण केले. आणि ते लिखाण सर्वोत्तम म्हणून घोषित सुद्धा करण्यात आले होते,

अश्या प्रकारे त्यांचे जीवन एक वेगळे वळण घेत होते, स्वतःच्या कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी खूप मोठी उपलब्धी मिळविली होती.

समोरील शिक्षणासाठी त्यांनी नितीशास्त्र हा विषय निवडला, तेव्हा त्यांनी नितीशास्त्रातून स्वतःची एम.ए. ची पदवी मिळविली.

राधाकृष्णन यांचे व्यावहारिक जीवन – Dr Sarvepalli Radhakrishnan Biography in Marathi

१९०८ सालानंतर त्यांनी मद्रास प्रेसिडन्सी या कॉलेजात फिलोसोफी हा विषय शिकवायला सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी १९१७ पर्यंत आपली सेवा दिली, त्यानंतर ते कलकत्ता युनिवर्सिटीत कार्यरत झाले, असे करता करता करता त्यांनी अनेक युनिवर्सिटीत कार्यभार सांभाळला.

१९३१ साली इंग्लंडने डॉ.राधाकृष्णन यांना सर या पदवी ने सन्मानित केले, १९४६-४९ या काळात त्यांची निवड राज्य घटनेच्या समितीचे सभापती म्हणून झाली होती,

डॉ.राधाकृष्णन हे बनारस हिंदू युनिवर्सिटी आणि आंध्र युनिवर्सिटीचे सुद्धा कुलगुरू राहिले होते. यादरम्यान त्यांना आंध्र युनिवर्सिटीने १९३९ मध्ये डी.लिट. हि पदवी बहाल केली होती.

डॉ. राधाकृष्णन यांचा विवाह लहानपणी म्हणजेच सोळाव्या वर्षी सिवकामू नावाच्या मुलीशी झाला होता, त्यांचे वैवाहिक जीवन बऱ्यापैकी होते, त्यांना एकूण सहा मुल, मुली होते त्यापैकी एक मुलगा होता त्याचे नाव त्यांनी सर्वपल्ली गोपाल असे ठेवले होते, त्यांचे पारिवारिक जीवन चांगले सुरु होते पण १९५६ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले, या गोष्टीचे त्यांना दुखः झाले पण ते त्यांचे कर्तव्य बजावत राहिले.

१९५२ साली डॉ. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदी निवड झाली होती. त्यानंतर १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले. उपराष्ट्रपती पदी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारत सरकार ने १९५८ साली त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात आला.

यानंतर १९६२ मध्ये डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती पदासाठी निवड झाली, आणि ते देशाचे राष्ट्रपती बनले. त्यानंतर त्यांच्या काही विधार्थ्यांनी त्यांचा जन्म दिवस हा “शिक्षक दिन” म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली,

डॉ. राधाकृष्णन यांना हा विचार आवडला कि आपला जन्मदिवस शिक्षकांच्या सन्मानासाठी जर साजरा केला जात असेल तर हि कल्पना उत्तम असल्याचे सांगत त्यांनी या कल्पनेला मान्यता दिली, आणि तेव्हापासून ५ सप्टेंबर या दिवसाला शिक्षक दिन म्हणून साजरे केल्या जाऊ लागले.

डॉ. राधाकृष्णन हे जेव्हा भारताचे राष्ट्रपती होते तेव्हा त्यांच्या कार्यकाळात भारताने दोन युद्धांचा सामना केला. १९६२ साली चीन सोबत, आणि १९६५ साली पाकिस्तान सोबत.

डॉ. राधाकृष्णन यांचे शेवटचे दिवस.

यानंतर १९६७ साली डॉ. राधाकृष्णन निवृत्त झाले, त्यानंतर ते त्यांच्या गावी रहायला गेले, निवृत्त झाल्यानंतर आठ वर्षांनी त्यांनी शेवटचा स्वास घेतला. आयुष्याचे शेवटचे दिवस त्यांनी एकटेपणात काढले, पण त्यांच्या आठवणीत आजही ५ सप्टेंबर ला त्यांच्या जन्मदिवसाला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

सोबतच या दिवशी देशाच्या राष्ट्रपती यांच्या हातून देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतो. या दिवशी शाळेतील मुले आपल्या शिक्षकांना पुष्प तसेच ग्रीटिंग कार्ड देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतात, या दिवशी शाळेमध्ये शिक्षक शिकवत नाहीत तर मुले शिक्षकांच्या वेशात येऊन वर्गांवर शिकवतात.

आपणही शिक्षक दिनाला शाळेमध्ये किंवा कॉलेज मध्ये शिक्षक बनवून शिकविले असेलच किंवा आपल्या मित्रांना शिकविताना पाहिले असेलच, तर आजचा हा छोटासा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला सोशल मिडीयावर कळवायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here