Tuesday, July 1, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

एलिफंटा गुफा माहिती

Elephanta Caves Marathi Mahiti

अवघ्या विश्वात प्रसिद्ध असलेल्या एलिफंटा गुफा या महाराष्ट्राची राजधानी मुंबई पासून अवघ्या काही अंतरावर घारपुरी द्वीपावर आहेत याला काही वेळा घारापुरी लेणी (Gharapuri Leni) म्हणून सुद्धा संबोधल्या जाते. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या गुफांमध्ये शिवाच्या तीन भव्य मूर्ती आपल्याला पहायला मिळतात.भारतातील प्रमुख ऐतिहासिक आणि महत्वांच्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या या भव्य गुफा 2 वेगवेगळ्या धर्मांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. या गुफांच्या एका भागात हिंदू धर्माशी जोडल्या गेलेल्या गुफा असून अन्य भागात बौद्ध धर्माशी संबंधित गुफा आढळतात…या एलिफंटा गुफांचे ऐतिहासिक महत्वं लक्षात घेऊन 1987 साली युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या गुफांची नोंद केली आहे. महाराष्ट्रातील या भव्य अश्या एलिफंटा गुफांबद्दल या लेखातून अधिक जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील एलिफंटा गुफांचा इतिहास – Elephanta Caves Information in Marathi

Elephanta Caves Information in Marathi
Elephanta Caves Information in Marathi

एलिफंटा गुफांविषयी संक्षिप्त माहिती – Gharapuri Caves Information in Marathi

एलिफंटा गुफा कोठे आहेतमुंबई, महाराष्ट्र (भारत)
एलिफंटा गुफा कधी बनविण्यात आल्या6-8 शतकात
एलिफंटा गुफेच क्षेत्रफळ60 हजार चौरस फुट क्षेत्रफळ
एलिफंटा गुफा का प्रसिद्ध आहेभगवान शिवाला समर्पित गुफा

एलिफंटा गुफांची निर्मिती आणि इतिहास – Eliphanta Caves History in Marathi

एलिफंटा गुफांची नोंद आपल्याला बादामी चालुक्य सम्राट पूलकेशिन द्वितीय यांनी कोंकण चे मौर्य शासकांचा पराजय केला तेंव्हा पासून सापडते. त्या दरम्यान शिवाला समर्पित या विशाल एलिफंटा गुफांना पुरी (पुरिका) या नावाने ओळखले जायचे. घारपुरी द्वीप पूर्वी कोंकण मौर्यांची राजधानी होती. या गुफां संबंधित जाणकारांची वेगवेगळी मत पाहायला मिळतात.काही इतिहासतज्ञांच्या मते कोंकण मौर्यांनी या एलिफंटा गुफांची निर्मिती केली  होती. तर काही तज्ञांच्या मते राष्ट्रकुट आणि चालुक्यांना या गुफांचे श्रेय दिले जाते. पोर्तुगीजांशी देखील या गुफांचा इतिहास जोडला गेला आहे, 16 व्या शतकात येथे पोर्तुगीजांची सत्ता होती व इथल्या विशालकाय हत्तीच्या प्रतिमेमुळे पोर्तुगीजांनी या गुफांना एलिफंटा असे नाव दिले होते.या वेगवेगळ्या मत-मतांतरामुळे या प्रसिद्ध गुफांचा इतिहास स्पष्ट आढळत नाही. याविषयी इतिहासकारांची वेगवेगळी मतं आहेत. या गुफांची निर्मिती कधी आणि कोणी केली याविषयी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. काही विद्वानांच्या मते या गुफांची निर्मिती पांडवानी केली होती. तर काही विद्वान म्हणतात की या गुफा शिवभक्त बाणासुराने बनविल्या आहेत.

एलिफंटा गुफा वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना – Elephanta Caves Architecture

  • एलिफंटा गुफा (Elephanta Gufa) 60,000 चौ.फुट क्षेत्रफळात पसरलेल्या असून या परिसरात एकूण 7 गुफा आहेत. यातील 5 गुफा हिंदू धर्माशी संबंधित असून उर्वरित 2 गुफा बौद्ध धर्माचे प्रतिनिधित्व करतात.
  • घारपुरी द्वीप येथे स्थित असलेल्या गुफांमधील 1 ल्या क्रमांकाची गुफा ‘ग्रेट गुफा’ या नावाने ओळखली जाते. या गुफेत भगवान शिवाच्या अनेक मूर्ती असून मध्यभागी शिवाची त्रिमूर्ती स्थापित करण्यात आली आहे. या मूर्तीला सदाशिव या नावाने ओळखले जाते.
  • या गुफेत भगवान शिव गंगेला धरतीवर आणतांनाचे दृश्य दाखवणारी मूर्ती देखील विराजित करण्यात आली आहे.
  • क्रमांक 2  ते 5 या गुफांना कैनन हिल नावाने ओळखले जाते. 6 वी आणि 7 वी गुफा स्तूप हिल्स असून 6  व्या गुफेला सीताबाई गुफा देखील म्हणतात.
  • 7 व्या गुफेसमोर एक तलाव असून तो ‘बौद्ध तलाव‘ या नावाने ओळखला जातो.

भगवान शिवाला समर्पित एलिफंटा गुफा – Elephanta Gufa Mahiti

मुंबई नजीक घारपुरी द्वीप येथे असलेल्या या भव्य गुफा शंकराला समर्पित आहेत. या गुफांमध्ये शिवाच्या अनेक प्रतिमा आपल्याला पहायला मिळतात. शिवाच्या तिन्ही रूपाचे वर्णन करणाऱ्या मूर्ती या ठिकाणी स्थापित आहेत. कैलासावर शिव-पार्वती, नटेश्वर, अर्धनारीश्वर, महेशमूर्ती शिव, पार्वती परिणय, कैलाशधारी रावण आणि भैरव या प्रतिमा येथे पहायला मिळतात.

एलिफंटा गुफांशी संबंधित विशेष माहिती – Elephanta Caves Facts

  • मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया पासून 10 की.मी अंतरावर असलेल्या एलिफंटा गुफा 7 गुफांचे संमिश्रण आहे, यात महेश मूर्ती गुफा मुख्य आहे.
  • एलिफंटा च्या एकूण 7 गुफांपैकी 5 गुफा हिंदू आणि अन्य 2 गुफा बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. महेश मूर्ती गुफा हिंदू गुफांमधील मुख्य गुफा असून यात असलेल्या 26 खांबांमध्ये भगवान शिवाच्या वेगवेगळ्या रूपांना अत्यंत सुरेख रीतीने कोरण्यात आलं आहे.
  • एलिफंटा गुफेत हिंदू धर्मातील अनेक देवी देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत…हे या गुफेचे वैशिष्ट्य देखील आहे.
  • 60,000 वर्ग चौ.मी. क्षेत्रात पसरलेल्या एलिफंटा गुफा पहाडाला कोरून तयार करण्यात आल्या आहेत.
  • एलिफंटा गुफेत भगवान शिवाची त्रिमूर्ती प्रतिमा अतिभव्य आणि विशाल असून पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. या प्रतिमेत शिवाची तिन्ही रुपं अत्यंत सुबक रीतीने निर्माण करण्यात आली आहेत. ही विशाल मूर्ती 24 फुट उंच आणि 17 फुट रुंद आहे.
  • या गुफेत भगवान शिवाची अर्धनारीश्वर प्रतिमा देखील स्थापित असून उजवे अंग पुरुषाचे आणि डावे अंग स्त्रीचे आहे.
  • एलिफंटा गुफेत असलेल्या भगवान शिवाच्या विभिन्न रुपांमुळे यांना “टेम्पल केव्स” देखील म्हंटल्या जातं. शिवपार्वतीचा विवाह, आणि रावणाद्वारे भगवान शिवाला लंकेत घेऊन जाणारा प्रसंग या गुफेत अत्यंत सुरेख पद्धतीने कोरण्यात आला आहे.
  • आपल्या अद्भुत शिल्पकारी आणि ऐतिहासिक महत्वं यामुळे 1987 साली युनेस्कोने एलिफंटा गुफांना जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलं आहे.
  • सद्यस्थितीत एलिफंटा गुफांचे संरक्षण भारताच्या पुरातत्व विभागाच्या देखरेखी खाली केल्या जात आहे.

एलिफंटा गुफांना भेट द्यायला कसे जाल ? – How to reach Elephanta Caves

  • मुंबई पासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या एलिफंटा गुफांना जाण्याकरता पर्यटक रेल्वे, विमानसेवा, आणि खाजगी वाहनाने देखील सहज पोहोचू शकतात.
  • विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज एयरपोर्ट ला उतरून खाजगी वाहनाने एलिफंटा गुफा येथे पोहोचता येते.
  • मुंबई विमानतळा पासून हे अंतर 28 की.मी. चे आहे.
  • मुंबई रेल्वे मार्गाने देखील उत्तम रीतीने जोडले असल्याने आपण रेल्वेने देखील मुंबई ला येऊन एलिफंटा गुफा पहायला जाऊ शकतात.
  • रस्ते मार्गाने देखील डिलक्स बसेस एलिफंटा गुफा पहायला पर्यटकांना नेत असतात.
  • एलिफंटा गुफा पहायला गेटवे ऑफ इंडिया येथून बोटीने देखील पोहोचता येतं.
Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved