English Speaking Tips
आजच्या व्यावहारिक जीवनासाठी इंग्रजी भाषा येणे खूप आवश्यक झाले आहे.
मराठी हि आपल्या ओठाची भाषा असली तरी इंग्रजी हि पोटाची भाषा झालेली आहे, बरेच ठिकाणी आपण इंटरव्युव देण्यासाठी गेले असाल तिथेही मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेचा वापर केला जातो.
तसेच दैनंदिन जीवनात मोठ-मोठ्या कंपन्या त्यांच्या ऑफिसमध्ये इंग्रजी भाषेलाच जास्त महत्व देताना दिसतात.
मग आपल्याला जर त्यांच्या मध्ये टिकून राहायचे असेल तर आपल्याला सुद्धा इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
बरेच वाचकांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला असेल कि,
मी इंग्रजी का शिकावे? माझी मातृभाषा तर मराठी आहे.
हो! आपल्यालाच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला आपण मराठी असल्याचा स्वाभिमान आहे.
आणि तो नेहमी राहणारही! आपल्याला भविष्यात इंग्रजी भाषेचे कुठे आणि कसे काम पडेल काही सांगू शकत नाही, असे नाही कि आपण आपल्या भाषेपर्यंतच सीमित राहावे.
माणसाच्या बुद्धीची रचनाच शिकण्यासाठी झालेली आहे, आणि तसेही एखादी जास्तीची भाषा आपण शिकलो तर उलट त्यामध्ये आपलाच फायदा आहे.
म्हणून आपणं प्रयत्न करू कि जेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला इंग्रजी भाषा शिकता येईल तेवढा आपण प्रयत्न करू.
“इंग्रजी बोलण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स” – English Speaking Tips in Marathi
तर चला जाणून घेऊया काही टिप्स ज्या मुळे आपण आपल्या इंग्रजीला चांगल्या प्रकारे सुधारू शकता.
१) शब्दांच्या सोबत वाक्य हि शिका – Learn Sentences with Word
जेव्हा आपण नवीन शब्द शिकायचे प्रयत्न कराल तेव्हा त्या शब्दांना कोणत्या वाक्यामध्ये आपल्याला वापरता येतील, हे पण शिकून घ्या, म्हणजे जेव्हा आपण एखाद्याशी इंग्रजी मध्ये बोलायला जाऊ तेव्हा त्या वाक्यांचा उपयोग होईल.
आणि दररोज स्वतःला सवय करून घ्या इंग्रजी मध्ये बोलण्याची.
ज्या शब्दांना किंवा वाक्यांना आपण दैनंदिन जीवनात शिकाल त्या शब्दांना आपण आपल्या नोटबुक मध्ये लिहायला विसरू नका.
झाले तर त्यासाठी नवीन वही बनवा.
२) आत्मविश्वासाने बोला – Speak Confidently
सुरुवातीला इंग्रजी शिकल्यानंतर आपण विचार करतो कि, आपल्याला बोलता येईल कि नाही तर त्या गोष्टीची भीती आपल्या मनामध्ये मुळीच ठेव नका, आणि बिनदास्त पणे आपल्याला जे बोलता येईल ते बोला, असाच सराव करत राहिल्याने आपल्याला हळू हळू इंग्रजी बोलायला मदत होईल.
बोलताना आपला आत्मविश्वास हा नेहमी जास्त ठेवा, जेणेकरून समोरच्यावर आपला चांगला प्रभाव पडेल.
म्हणून आत्मविश्वासाने आपल्या गोष्टी समोरच्याजवळ मांडा.
३) इंग्रजी वर्तमानपत्रे वाचा – Read Newspaper
आपली इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी आपण दररोज चे इंग्रजी वर्तमान पत्रे वाचू शकता.
त्यामधून आपल्याला दररोज नव-नवीन शब्द वाचायला मिळतील, आणि त्यामुळे आपला शब्द साठा वाढायला मदत होईल, तसेच वर्तमानपत्रामधील भाषा हि समजण्यासाठी खूप सोपी असते, तर आपण त्या गोष्टीचा फायदा घेत, आपल्या इंग्रजीला आणखी सुधारू शकतो.
वाचनानेच आपल्या शब्द साठ्यात आणखी भर पडेल.
४) इंग्रजी ऑडीओ बुक ऐका – Listen English Audio
नवीन भाषा शिकायला जास्त वेळ लागत नाही, जर त्या भाषेला शिकण्यासाठी आपली इच्छा हि प्रबल असेल तर, इंटरनेट वर बरेच असे ऑडीओ बुक उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून आपण आपल्या इंग्रजी भाषेला चांगली करू शकतो.
आपण सतत त्या गोष्टींचे अध्ययन केले तर ती गोष्ट आपल्या मेंदू मध्ये बसून राहते आणि आपाला मेंदू त्या गोष्टीला लवकर विसरत नाही, तसेच त्यामधील उच्चार, शब्द , ह्या गोष्टी आपली भाषा चांगली होण्यास मदत करतील.
५) इंग्लिश स्पिकिंग क्लास ज्वोईन करा – Join English Speaking class
आपल्याला जर मुळीच इंग्रजी बोलता येत नसेल तर आपण व्यावहारिक भाषा शिकण्यासाठी इंग्लिश स्पिकिंग क्लास चा सहारा घेऊ शकता, इंग्लिश स्पिकिंग क्लास ज्वोईन करून आपण आपल्या इंग्रजी भाषेला आणखी चांगले बनवू शकता, तेथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे इंग्रजी भाषा शिकविल्या जाईल.
आणि जवळ जवळ दोन महिन्यात आपण चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकाल.
म्हणून शिकण्यासाठी उशीर न करता आपण लवकरात लवकर इंग्लिश स्पिकिंग क्लास ज्वोईन करावे.
६) आजूबाजूला इंग्रजी वातावरण बनवा – Make The English Atmosphere Around You
आपण जर ऑफिस मध्ये कामाला असाल तर आपल्या ऑफिस चे वातावरण म्हणजेच तेथील सर्वांशी इंग्रजी भाषेत बोला, तसेच आपण विध्यार्थी असाल तर आपल्या मित्रांना सांगून ठेवा कि, मी इंग्रजीमध्ये बोलणार कारण मला इंग्रजी शिकायची आहे.
तसेच आपल्या घरातील व्यक्तींशी हि थोड्या प्रमाणात इंग्लिश बोलायचे प्रयत्न करा.
जेणेकरून आपल्या आजूबाजूला इंग्रजी भाषेचे वातावरण बनेल.
आणि दररोज च्या या इंग्रजी भाषेच्या वातावरणामुळे आपल्या कानांवर इंग्रजी शब्द पडतील आणि आपल्याला आपली इंग्रजी भाषा सुधारण्यास मदत होईल.
७) ऐकून घ्या आणि नंतर बोला! – Listen First And Then Speak
आपल्याला माहीतच असेल एक चांगला श्रोताच चांगला वक्ता बनू शकतो, त्यासाठी आपण सर्वात आधी समोरच्याला पूर्ण पणे ऐकून घ्या, त्यानंतर थोडा वेळ मनामध्ये विराम घेऊन त्यानंतर आपण आपले मत मांडा.
आणि समोरच्याशी बोला, त्या गोष्टीचा आपल्याला आणखी फायदा होईल.
आणि जर आपल्याला समोरच्या व्यक्तीचे उच्चार आणि वाक्य कळले नाही तर त्यांना आपण नम्रतेपणे माफी मागून ते काय बोलले पुन्हा विचारावे आणि नंतर आपले बोलणे सुरु ठेवावे.
८) सुरुवातीला व्याकरणाकडे लक्ष देऊ नका – Ignore Initially Grammar Mistakes
जेव्हा आपण इंग्रजी बोलायची सुरुवात करू, तेव्हा बोलताना बऱ्याच चुका होतील.
चुका कोणत्या, तर त्या व्याकरणाच्या. तर सुरुवातीला व्याकरणाकडे एवढे लक्ष न देता आपण आपल्या बोलण्यावर लक्ष द्यावे आणि आत्मविश्वासाने आपण बोलायला सुरुवात करा, काही काळाने आपोआप आपल्या बोलण्यात व्याकरण येऊन जाईल.
म्हणून व्याकरणाची चिंता न करता, आपण फक्त आपल्या भाषेवर लक्ष द्या.
९) इंग्लिश मूवी पाहण्यात भर द्या – Watch English Movie
तुम्ही निरीक्षण केले असेल कि आपण पाहिलेली कोणतीही बॉलीवूड ची मूवी आपल्याला आठवत असेल, आपण ती विसरत सुद्धा नाही तसेच त्या मूवी मधील डायलॉग सुद्धा आपल्या पाठ होऊन जातात, या जगात वेगवेगळ्या प्रकाराची लोक आहेत.
त्यांचा मेंदू हा वेगवेगळ्या प्रकारे शिकत असतो.
काही लोक असे असतात जे एखाद्या गोष्टीला ऐकुन शिकून जातात, तर काही विडीवो च्या माध्यमातून शिकतात.
आपण कोणत्या गटात बसता? आपला मेंदू ऐकून लवकर शिकत असेल तर आपण ऑडिओ ऐकून शिकू शकता.
तसेच आपण जर विडीवो पाहून लवकर शिकत असाल तर इंग्लिश मूवी आपल्यासाठी कधीही योग्य राहील कारण त्यामध्ये आपल्याला शब्दांचे उच्चार तसेच त्यांना कशा प्रकारे बोलल्या जाते हे आपल्याला शिकायला मिळेल.
म्हणून इंग्लिश मूवी पाहण्यात भर द्या.
१०) आनंद घेऊन शिका – Learn To Enjoy
कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी वेळ तर लागतोच म्हणून कोणत्याही प्रकारचा तान न घेता, आपण इंग्रजी भाषेला शिका.
आपण ताण न घेता जर शिकलात तर आपण लवकर इंग्रजी भाषा शिकाल, त्यानंतर आपण कुठेही आणि कसेही इंग्रजी बोलू शकणार.
आणि भविष्यात आपल्याला या गोष्टीची खूप मदत होईल.
आजच्या लेखात आपण इंग्रजी भाषेला कश्या प्रकारे आणखी चांगली बनवू शकू, हे पाहिले तर आशा करतो आपल्याला आजचा लेख आवडला असेल आपल्याला आजचा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये या लेखाला शेयर करायला विसरू नका. तसेच आपला अभिप्राय majhimarathi.com वर द्यायला सुद्धा विसरू नका.