चार पानांच्या रोपट्याची किमंत जाणून व्हाल हैराण, न्यूझीलंड ची घटना

जगातील सर्वात महाग वस्तूंविषयी आपण बरेचदा आपल्या माझी मराठी साईट वर वाचलेले असेलच कि जगातील सर्वात महाग वस्तू हि आहे, किंवा जगातील सर्वात महाग फळ हे आहे, अश्याच अनेक मजेदार आणि माहितीपूर्ण लेख आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो,

आजही एक असाच विशिष्ट माहितीपर लेख आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्याला वाचून आपण म्हणणार कि जगात असेही काही लोक राहतात, जे स्वतःच्या अमाप संपतीचा वापर असा करतात.

आजच्या लेखात आपण जगात सर्वात महाग विकल्या गेलेल्या या चार पानांच्या रोपट्या विषयी माहिती पाहणार आहोत, तर चला पाहूया या रोपट्या बद्दल काही विशेष माहिती.

जर तुमच्याकडे जर ६ लाख रुपये असतील तर तुम्ही काय करणार? एखादी व्यक्ती त्या पैशाची एखाद्या विशिष्ट ठिकाणी गुंतवणूक करेल, किंवा एखादी कार, काही चैनीच्या वस्तू विकत घेऊ. पण एका व्यक्तीने चक्क सहा लाख रुपये खर्च करून चार पानं असणारे रोपटे घेतले,

चार पानांच्या रोपट्याची किमंत जाणून व्हाल हैराण, न्यूझीलंड ची घटना – Expensive House Plant

Expensive House Plants
Expensive House Plants

अनेक लोक आपल्या घरी घरात लावण्यात येणारे मनी प्लांट किंवा आणखी एखादे रोपटे आणत असतात पण न्यूझीलंड च्या एका व्यक्तीने स्वतःच्या घरात एक चार पानांचे रोपटे आणले त्याची किमंत ६ लाख रुपये आहे.

या रोपट्याचे नाव फिलोडेन्ड्रॉन मिनीमा (Philodendron Minima) आहे, या रोपट्याला ओकलंड च्या एका वनस्पतीशास्त्रज्ञाने विक्रीस काढले होते. हे रोपटे एक दुर्मिळ रोपट्यांपैकी एक आहे. या रोपट्याला (Variegated Raphidophora Tetrasperma) या नावाने ओळखल्या जाते.

या रोपट्याला एक दुर्मिळ रोपटे म्हणून ओळखल्या जात. न्यूझीलंड च्या सर्वात मोठ्या ट्रेडिंग साईट वर या रोपट्याची बोली लागली, ती साईट ट्रेड मी (Trade Me) म्हणून होती, सर्वात आधी या रोपट्याची बोली हि ४.७७ लाख रुपये एवढी लागली होती.

पण काही वेळानंतर एका व्यक्तीने या रोपट्याची बोली ५ लाख ९८ हजार ८५३ रुपये इतकी लावली. त्यानंतर कोणीही या रोपट्याची बोली लावली नाही, आणि हे रोपटे त्या व्यक्तीने जवळ जवळ ६ लाख रुपये देऊन विकत घेतले.

रोपट्या विषयी थोडक्यात – About Philodendron Minima House Plants

या रोपट्याचे नाव व्हेरिगेटेड रॅफिडोफोरा टेट्रास्पर्मिस हे आहे, पण त्याला फिलोडेन्ड्रॉन मिनीमा या नावाने ओळखल्या जात. या रोपट्याची विशेषता म्हणजे या रोपट्याला चार ते पाच पाने असतात आणि त्यांचा अर्धा रांग हा हिरवा आणि अर्धा पिवळा असतो,

हे रोपटे नेहमी त्याच्या पानांचा रंग बदलत असते. या रोपट्यामध्ये असलेला हिरवा रंग पानांना प्रकाश संश्लेषण साठी मदत करते आणि पिवळा रंग त्यांची वाढ आणि पुन्हा निर्माण होण्यासाठी मदत करते.

या रोपट्याला बरेच देशांमध्ये मागणी आहे, एवढच नाही तर या रोपट्याला काही लोक लकी मानतात. आणि या रोपट्याला आपल्या घरात ठेवण्यासाठी विकत घेतात. आपल्या देशामध्ये जसे मनी प्लांट लोक आपल्या बाल्कनी किंवा घरात ठेवतात त्याचप्रमाणे हे प्लांट सुद्धा लोक आपल्या घरी ठेवतात.

तर अश्या प्रकारे ते छोटे रोपटे विकल्या गेले लाखोंमध्ये. आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल, आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास सोशल मिडीयावर कळवायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here