जाणून घ्या रतन टाटांविषयी 8 महत्वपूर्ण गोष्टी!

योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही, मी निर्णय घेतो आणि मग त्यांना योग्य करण्याचे काम करतो”

असे प्रेरणात्मक विचार देणारे भारताचे यशस्वी उद्योजक, भारतातील प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित तसेच टाटा समूहाचे अध्यक्ष ज्यांनी आजपर्यंत लाखो लोकांना रोजगार देण्याचे काम केले. सोबतच जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

मी अश्या व्यक्तीविषयी बोलतो आहे ज्या व्यक्तीला फोर्ड कंपनीच्या मालकाने संकट काळात त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचविली होती, आणि आपल्या त्या आत्मसन्मानाला परत मिळविण्यासाठी त्यांनी अफाट मेहनत घेऊन आपला आत्मसन्मान परत मिळवला. अस व्यक्तित्व !

मित्रहो,

आपण समजूनच गेले असाल, कि मी कोणाविषयी बोलत आहे तर.

हो त्या व्यक्तित्वाच नाव आहेरतन नवल टाटा !

रतन टाटा यांचे टाटा घराण्याशी रक्ताचे नाते नाही आहे, कारण कि रतन टाटांच्या वडिलांना अनाथ आश्रमातून दत्तक घेतल्या गेले होते. आणि त्यानंतर त्यांचे संगोपन टाटा घराण्यात झाले होते. आज भारतामध्ये असा कोणताच व्यक्ती नसेल ज्यालाटाटा”  या शब्दाविषयी माहिती नसेल.

तेवढेच नाही तर लहान मुलांपासून तर वयोवृध्द व्यक्तींपर्यंत सगळ्यांना माहिती असलेला शब्द म्हणजे टाटा”  !

 ते मीठ असो कि चहा. सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव असते ते म्हणजे टाटा”

 “भारतातील एक यशस्वी उद्योजक रतन टाटा” – Facts about Ratan Tata

Ratan Tata
Ratan Tata

तर चला मग जाणून घेऊया, अश्या व्यक्तिमत्वा विषयी ज्या व्यक्तीने टाटा समूहाला जगामध्ये एक वेगळी ओळख देण्याचे काम केले आहे.

तुम्हाला सांगायचे झाले तर टाटा समूहाच्या अंतर्गत १०० कंपन्या काम करतात. आणि सुई पासून तर विमानापर्यंत सर्वच गोष्टी आज टाटा समूहाच्या अंतर्गत बनतात.

१) रतन टाटांच्या परिवाराविषयी – About Ratan Tata’s family

 २८ डिसेंबर १९३७ हा तो दिवस आहे, ज्या दिवशी भारताच्या व्यापाराची धरती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरत शहरामध्ये एका पारशी घराण्यात रतन टाटा यांचा जन्म झाला.

त्यांच्या आईचे नाव सोनू तर वडिलांचे नाव नवल होते. रतन टाटा जेव्हा १० वर्षाचे होते तेव्हा त्यांचे  आईवडील काही कारणास्तव वेगळे झाले होते. तेव्हा जमशेदजी टाटांचा मुलगा रतनजी आणि त्यांची पत्नी नवाजबाई यांनी रतन टाटा यांचे संगोपन केले. हे दोघे रतन टाटांचे आजी आजोबा होते.

२) रतन टाटांच्या शिक्षणाविषयी – Regarding the education of Ratan Tata

 रतन टाटांच्या शिक्षणाची सुरुवात मुंबईच्या “The Cathedral And John Connon School”

पासून झाली, तसेच “Bishop Cotton School Shimla”  येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.

त्यांनतर १९६२ मध्ये वास्तुकलेची पदवी पूर्ण करण्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या “Cornell University” मध्ये आपला प्रवेश घेतला. त्यानंतर १९७५ मध्ये त्यांनी “Advanced Management Program”  चे शिक्षण “Harvard Business School” मधून पूर्ण केले.

३) पाळीव प्राण्यांविषयी प्रेम तसेच प्लेन उडवण्याची आवड – Love for pets and the love of flying a plane

 रतन टाटा हे एक उद्योजकच नसून ते एक चांगले पायलट सुद्धा आहेत. आणि प्लेन उडवणे हि त्यांची एक आवडही आहे तसेच त्यांना पाळीव प्राणीही पाळायला आवडतात. सोबतच त्या प्राण्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणेही त्यांना आवडते.

४) जीवनातील पुरस्कार – Life’s rewards

आपल्या देशामध्ये असे काहीच व्यक्ती असतात, जे आपल्या देशाचे नाव देश-विदेशात पसरवितात. आणि त्यांना भारत सरकारद्वारे त्यांच्या कार्याची प्रशंसा म्हणून त्यांना काही पुरस्कारांद्वारे गौरविण्यात येते.

त्यापैकी रतन टाटा हे एक व्यक्तिमत्व आहे ज्यांना भारत सरकारने त्यांच्या अलौकिक कामगिरीबद्दल सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे.

त्या सर्वोच्च पुरस्कारांमध्ये भारतातील द्वितीय क्रमांकाच्या पद्मविभूषण तसेच तिसर्या क्रमांकाच्या पद्मभूषण या दोन्ही पुरस्कारांनी रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

(पद्मभूषण २००० मध्ये) आणि (पद्मविभूषण २००८ मध्ये)

५) स्वभावाने शांत तसेच दयाळू प्रवृत्ती – By nature calm and kind

 भारतामध्ये घडून गेलेला एक काळा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ ! या दिवशी जेव्हा आतंगवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेल वर हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात जेवढे हि लोक जखमी झाले होते त्या सर्वांच्या उपचाराचा खर्च हा टाटांनी घेतला होता.

तसेच हॉटेलच्या आजूबाजूला हाथगाडी लावणार्यांचे नुकसान झाले होते त्या सर्वांचा खर्च टाटांनीच दिला होता. सोबतच हॉटेल जेवढे दिवस बंद होते तेवढे दिवसांचे वेतन कर्मच्यार्यांना देण्यात आले होते.

आपल्या माहिती साठी मुंबईच्या ताज हॉटेलचे निर्माण हे जमशेदजी टाटा यांनी केले आहे, ताज हॉटेल चे निर्माण १९०३ मध्ये केले गेले होते त्या हॉटेल ला बनवायला ४ कोटी २१ लाख रुपयांचा खर्च लागला होता.

६) रतन टाटा अजूनही अविवाहितच! – Ratan Tata Unmarried!

 हो मित्रहो, रतन टाटा यांनी अजूनही लग्न केलेले नाही. त्यांचे लग्न होता होता राहिले होते. त्यांना अमेरिकेत कॉलेज मध्ये असताना एका मुलीवर प्रेम झाले होते. आणि दोघे लग्नही करणार होते पण रतन टाटांच्या आजीबाईंच्या तब्येतीमुळे त्यांना भारतामध्ये परत यावे लागले. आणि त्यावेळेस भारत आणि चीन चे युध्द झाले होते. त्यामुळे त्यांच्या प्रेमिका भारतामध्ये येण्यासा घाबरल्या आणि त्यांनी काही दिवसानंतर अमेरीकेमध्येच दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले.

७) स्वतःचा आत्मसन्मान परत मिळवला – Regained his self-esteem

 हि गोष्ट आहे १९९९ ची, जेव्हा इंडिका ला लाँच होऊन फक्त एक वर्षच झाले होते. आणि रतन टाटा फोर्ड कंपनीच्या हेडक्वाटर डेट्रोयट येथे गेले होते. त्यांनी तिथे जाऊन बिल फोर्ड यांना विनंती केली कि आमची पॅसेंजर व्हेहिकल बाजारात मंदीमध्ये चालत आहे तर तुम्ही तिला विकत घ्या.

त्यावर बिल फोर्ड यांनी रतन टाटांना सुनावले कि जर गाडी बनवता येत नाही तर या धंद्यात आलेच कशाला तुमचा प्रोजेक्ट घेऊन आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत या शब्दांमध्ये रतन टाटांना बिल फोर्ड बोलले, आणि त्यांचे हेच शब्द रतन टाटांच्या मनाला लागले.

त्याच रात्री ते तिथून पूर्ण टीम ला घेऊन मायदेशी परतले. आणि पूर्ण जिद्दीने आपल्या कामाला लागले.

काही दिवसानंतर टाटा मोटर्सने बाकी कंपन्यांपेक्षा आपल्या कामात जास्त वृद्धी केली. परंतु २००९ मध्ये बिल फोर्ड ची कंपनी घाट्यामध्ये जात होती. आणि त्यांच्या कंपनीचे दिवाळे निघाले होते, अश्या वेळेला टाटा ग्रुप ने त्यांना निमंत्रण पाठवले कि आम्ही तुम्हाला विकत घेणार.

ज्याप्रकारे रतन टाटा त्यांची पूर्ण टीम घेऊन त्यांच्याकडे गेले होते, त्याचप्रमाणे ते त्यांची टीम घेऊन भारतामध्ये आले. आणि त्यांनी हे उद्गार काढले कि तुम्ही आमच्या जैगुवार लॅन्डरोव्हर प्रोजेक्ट घेऊन आमच्यावर उपकार करत आहात,  त्यासाठी आपले धन्यवाद ! आणि रतन टाटांनी ९६०० कोटींमध्ये त्यांचा तो प्रोजेक्ट विकत घेतला.

८)  सर्वात श्रीमंत का नाहीत रतन टाटा? – Why not the richest Ratan Tata?

 बर्याच लोकांच्या मनात हा प्रश्न येत असेल कि एवढी संपत्ती असूनही ते सर्वात श्रीमंत का नाही. तर त्याचे उत्तर असे कि टाटा संस ला टाटा ट्रस्ट द्वारे चालविले जाते. सर्वांना माहित असेलच कि ट्रस्ट  मध्ये कोणत्याही एका व्यक्तीची मालकी नसते. रतन टाटांच्या कमाईचा ६६%  कमाई हि त्यांच्या ट्रस्ट ला जाते.

रतन टाटांच्या निवृती नंतर टाटा समूहाला ठरवावे लागेल कि त्यांचा चेयरमन कोण होईल. एकट्या माणसाची कंपनी नसल्यामुळे रतन टाटा सर्वात श्रीमंत नाही आहेत. अश्या व्यक्तीला माझी मराठी चा मनाचा मुजरा.

आशा करतो तुम्हाला आमचा लेख आवडला असेल आपल्याला आमचा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांच्या सोबत या लेखाला शेयर करायला विसरू नका.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here