विचित्र नावांची रेल्वे स्थानके!

Unique Railway Station Name in India

हो खरचं, भारतीय रेल्वेचे असेही काही स्टेशन आहेत ज्यांची नावे हि थोडी वेगळीच आहेत, ज्यामुळे आपल्याला हसू येऊनच जाईल.

प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याच्या कामामध्ये भारतीय रेल्वेची महत्वाची भूमिका आहे. भारतीय रेल्वे जवळच्या तसेच दूरवरच्या यात्रा करण्याचे एक महत्वपुर्ण साधन बनलेले आहे. रेल्वेच्या ह्या सहयोगामुळे रेल्वे देशाची लाईफ-लाईन बनली आहे.

रेल्वेच्या सरळ पटरीसारख्या या जीवनात कधी कधी हास्याचे ब्रेक तर लागतातच. या हास्याच्या मागचे कारण असे कि काही भारतीय रेल्वे स्थानकांची नावे.

Funny Railway Station Name in India

विचित्र नावांची रेल्वे स्थानके ! – Funny Railway Station Name in India

त्या रेल्वे स्थानकांच्या नावामुळेच आपल्याला हसू येईल. आणि झाले तर या स्थानकांविषयी आपण आणखी माहिती काढण्याचे प्रयत्न कराल.

पण मी तुम्हाला या सर्व रेल्वे स्थानकांची माहिती या लेखाद्वारे देणार आहे.

आपला मूड जर थोडासा बिघडलेला असेल तर मी खात्री देऊन सांगू शकतो कि आपण या लेखाला वाचल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी चांगले वाटेल आणि तुमचा मूड स्विंग करण्यासाठी हा लेख मोलाची देणगी देऊन जाईल.

चला तर कशाची वाट पाहताय, सुरु करू हास्याची एक्स्प्रेस जी ह्या अजब गजब स्टेशन ला भेट देऊन जाईल.

आपल्याला हसून देतील अशी विचित्र स्टेशन ची नावे – Vichitra Railway Station Names

१) बिल्ली स्टेशन – Billi Station

आपण कधी विचारही केला नसेल कि असही नाव असू शकते कोण्यातरी रेल्वे स्थानकाचे ज्यामध्ये मांजरीचे नाव असेल, हो मित्रहो हे एक रेल्वे स्थानक आहे, जे कि आपल्या देशात उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहेत.

हे एक छोटस रेल्वे स्थानक आहे. तिथे रेल्वेची ब्रॉडगेज लाईन टाकलेली आहे.

आपण जर कधी उत्तर प्रदेश मध्ये गेले तर ह्या ठिकाणाला भेट अवश्य द्या.

२) साली स्टेशन – Sali Station

हो स्टेशनच च नाव आहे साली!

वाचल्यावर आपल्याला थोडस हसू आलच असेल, साली हे स्टेशन राजस्थान मध्ये स्थित आहे,  हे सुद्धा एक छोटस स्टेशन आहे, जिथे जास्त प्लॅटफॉर्म सुद्धा नाही आहेत.

ह्या स्टेशन च्या नावातच थोडस  हास्य लपलेलं आहे, आपण कधी राजस्थान मध्ये गेलात तर आपण ह्या स्टेशन ला अवश्य भेट द्या.

३) नाना स्टेशन – Nana Station

हे स्टेशन सुद्धा राजस्थान मध्येच आहे, या स्टेशन वरती २ एक्सप्रेस ट्रेन थांबतात. या स्टेशन च्या जवळ सर्वात मोठे स्टेशन हे उदयपुर आहे.

पिंडवारा जिल्ह्याच्या सिहोरी तालुक्यामध्ये हे गाव वसलेले आहे. या गावचे नाव च नाना आहे त्यामुळे येथे जे रेल्वे स्टेशन आहे त्याला हे नाव देण्यात आले आहे. आपण राजस्थान मध्ये फिरायला गेलेत तर  ह्या आगळ्या वेगळ्या स्टेशन ला अवश्य भेट देऊन पहा.

४) काला बकरा स्टेशन – Kala Bakara Station

प्रत्येक स्टेशन त्याची एक वेगळी ओळख देत आहे.  ह्या गावात असे काही नाही कि काळे बकरे राहत असतील म्हणून या गावाला हे नाव पडले असेल,

नाही अस काहीही नाही बर का ! उघाच आपल्या डोक्याची विचारशक्ती आपल्याला अश्या गोष्टी सुचवते.

तस पहिले असता हे गाव पंजाब च्या जालंदर जिल्ह्यामध्ये येते.

आणि पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेले पंजाबी गायक राई झुझार यांचे कला बकरा हे गाव आहे.

तर जेव्हा पंजाब मध्ये जायचे झाले तर आपण या गावाला अवश्य भेट देऊन पहा.

५) चिंचपोकळी स्टेशन – ChinchPokali Station

चिंच कशी काय पोकळी असू शकते बर !  काही ही ह….

परंतु,आपण जर महाराष्ट्रात राहत असाल तर आपल्याला ह्या स्टेशन विषयी अवश्य माहिती असायला हवी आणि माहिती नसेलही तरीच काळजी करू नका.

मी सांगतो त्या विषयी आपल्याला हे स्टेशन मुंबई मध्ये दक्षिण रेल्वेच्या आत मध्ये येते.

या स्टेशन ला आपण मुंबई मध्ये असाल तर कधीही भेट देऊ शकता. या स्टेशन ला जाण्यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुद्धा रेल्वे उपलब्ध आहेत,  झाले तर एक वेळ अवश्य भेट देऊन पहा या स्टेशन ला.

६) सिंघापूर रोड जंक्शन स्टेशन – Singhapur Road Junction station

सिंघापूर हे आशिया खंडातील प्रेक्षेनीय स्थळापैकी एक आहे, येथे दरवर्षी लाखो पर्यटक पूर्ण जगातून भेट देतात. आणि त्या ठिकाणाचा आनंद लुटतात.

त्या शहराच्या नावासारखे आपल्या देशात सुद्धा एक रेल्वे स्टेशन आहे.

हे स्टेशन तुम्हाला सिंगापूर ला घेऊन तर जाणार नाही, पण बर्याच काही सिंगापूर सारख्या छोट्या गोष्टी दाखवून जाईल.

आपण जर कधी ओडीसाला गेलेत तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या.

७) बिबीनगर स्टेशन – Bibinagar Station

हसु आणेल असे आणखी एक भारतातील रेल्वेचे स्टेशन म्हणजे बिबीनगर.

हे स्टेशन तामिळनाडू च्या बुवानागिरी जिल्ह्यामध्ये येते. आणि या स्टेशन वरून मेमो लोकल सुद्धा जाते.

तसेच हि ट्रेन फलकनुमा स्टेशन पर्यंत आपला प्रवास करते.

आपण जर दक्षिण भारतात फिरायला निघाले तर या स्टेशन ला सुद्धा भेट देऊन पहा.

८) बाप स्टेशन – Bap Station

भारतीय रेल्वेच्या काही स्टेशनांमध्ये आणखी एक नाव म्हणजे बाप स्टेशन. हे स्टेशन राजस्थान च्या जोधपुर जिल्ह्यामध्ये स्थित आहे.

या स्टेशन वरती दोन एक्स्प्रेस ट्रेन थांबतात. हे स्टेशन राजस्थान च्या उत्तर पश्चिमी भागात येते.

तसेच या स्टेशन च्या जवळील मोठे स्टेशन हे सिहाना आहे जे कि त्यापासून जवळजवळ ८४ किलोमीटर येते.

आपण राजस्थानमध्ये या प्रकारचे बरेच गजब नावांचे स्टेशन पाहू शकता.

९) लोंडा जंक्शन स्टेशन – Londa junction Station

ह्या स्टेशन चे नाव हि बऱ्यापैकी हसू आणेल असेच आहे. लोंडा हे स्टेशन उत्तर कर्नाटक मध्ये स्थित आहे. या स्टेशन ला तीन प्लॅटफॉर्म सुद्धा आहेत. आपण जर कधी कर्नाटकला गेलात तर आपण भेट देऊ शकता या स्टेशन ला.

तर मित्रहो आज च्या लेखात आपण पहिले भारतातील काही रेलेवे स्टेशन जे त्यांच्या नावांमुळे एक वेगळ हास्य निर्माण करू शकतात.

या लेखावर आपला अभिप्राय द्यायला विसरू नका, आपला अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहे.

तर आपल्याला हि माहिती तसेच आजचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला सुद्धा विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here