विश्व प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ ….. गॅलीलियो गॅलिली

Galileo Galilei Information in Marathi

गैलीलियो गैलिली हे इटली या देशांतील एक महान भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म सन १५ फेब्रुवारी १५६४ साली इटली देशांतील पिसा नावाच्या शहरात झाला होता. गैलीलियो यांचा ज्या वर्षी जन्म झाला होता त्या वर्षी विल्यम शेक्सपिअर यांचा देखील जन्म झाला होता आणि मायकल ॲन्जेलो यांचे निधन झाले होते. त्यामुळे सन १५६४ या वर्षाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं आहे.

गैलीलियो हे आपल्या सात भावडांपैकी सर्वात मोठे होते. तसचं, त्यांचे वडिल एक प्रसिद्ध संगीतकार होते. गैलीलियो यांच्या वडिलांनीच त्यांना मुक्त विचार करण्याची महत्वपूर्ण शिकवण दिली. त्यामुळेच ते एक महान वैज्ञानिक बनू शकले.

अनेक लोक गैलीलियो यांना एक महान खगोलतज्ञ म्हणून ओळखतात. ज्यांनी खगोलीय दुर्बिणीमध्ये सुधार करून तिला आधुनिक स्वरूप प्राप्त करून दिले. तसचं, आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी खगोल विज्ञान क्षेत्राला एक नविन दिशा दिली.

विश्व प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ ….. गॅलीलियो गॅलिली – Galileo Galilei Information in Marathi

Galileo Galilei Information in marathi
Galileo Galilei Information in Marathi

गालीलियो गैलिली यांच्याबाबत थोडक्यात माहिती – Galileo Galilei Biography in Marathi

नाम (Name) गैलीलियो गैलिली
जन्म (Birthday) १५ फेब्रुवारी १५६४
जन्मस्थान इटली

गॅलीलियो गॅलिली यांच्या बाबत बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की, ते एक खगोल शास्त्रज्ञ असण्याबरोबरच एक कुशल गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, आणि तत्त्वज्ञ देखील होते. ज्यांनी युरोप देशांत वैज्ञानिक क्रांती करिता खूप महत्वपूर्ण योगदान दिले. म्हणून, ‘गॅलीलियो गॅलिल’ यांना ‘आधुनिक खगोल विज्ञानाचे जनक’ आणि ‘आधुनिक भौतिकशास्त्राचे जनक’ म्हटल जाते.

गॅलीलियो यांनी तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला होता, तरी सुद्धा त्यांची वृत्ती धार्मिक भावनांसोबत जोडल्या गेली होती. असे असले तरी ते आपल्या प्रयोगाच्या प्रात्यक्षिकरण करतांना आपल्या जुन्या मान्यताच्या विरुद्ध जावून त्यांची पूर्णपणे व्याख्या करीत असत.

गॅलीलियो गॅलिली यांनी खगोल संशोधणाला सुरुवात करण्याआधी इतर अनेक प्रकारचे वैज्ञानिक संशोधन करून संपूर्ण विश्वात ख्याती मिळवली होती. त्यांनी खगोल शास्त्रज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण करण्याआधी लंबकाची गती, थर्मामीटर, हाइड्रोस्टेटिक बॅलन्स, इत्यादी प्रकारच्या वैज्ञानिक क्षेत्रात संशोधन केले होते.

गॅलीलियो गॅलिली यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणी देलेल्या महत्वपूर्ण शिकवणुकीमुळे त्यांना प्रत्येक बाबतीत विचार करण्याची सवय पडली. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीबाबत बारकाईने विचार करीत असतं.

इटली येथील सागरी किनाऱ्यावर बसून तासोन तास समुद्राच्या लाटांचे निरक्षण करीत असतं. कश्या प्रकारे समुद्राच्या लाटांची उंची वाढते किंवा घटते तसचं, कश्या प्रकारे समुद्राला भरती आणि आहोटी येते.

या सर्व गोष्टींचे ते खूप बारकाईने निरक्षण करत असतं. समुद्राला येत असलेल्या भरती आणि आहोटी च्या निरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी पुर्थ्वीचे परिवलन आणि परिभ्रमणाचा सिद्धांत मांडला. आपल्या या सिद्धांताबाबत त्यांचे असे मत होते की, समुद्राच्या पाण्याला येत असलेली भरती आणि आहोटी ही पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमणामुळेच होते.

परंतु, जर्मन खगोल शास्त्रज्ञ जोहान्स केपलर यांनी गॅलीलियो गॅलिली यांचा समुद्राच्या बाबतीत असलेला सिद्धांत मोडीत काढून समुद्राला भरती आणि आहोटी ही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

पूर्वीच्या काळी वाद विवादाच्या माध्यमातून आपला प्रयोग सिद्ध करून दाखवण्याची परंपरा अस्तित्वात होती. परंतु, गॅलीलियो गॅलिली हे आपले संशोधन प्रयोगाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवत असतं.

त्यामुळे त्यांनी अनेक प्रकारचे नियम मांडले जसे, लंबकाच्या साह्याने त्यांनी गतीचे नियम मांडले. तसचं, पृथ्वीवर असलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे वर फेकलेल्या वस्तू खाली खेचल्या जातात. वरून खाली पडणाऱ्या वस्तूचा वेग हा वस्तूच्या आकारमानावर किंवा वस्तुमानावर अवलंबून न राहता पृथ्वीवर असणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे वाढतो.

याचप्रकारे, ज्या दुर्बिणीचा वापर खलाशी दूरवरील बोट पाहण्यासाठी करीत असतं, त्या दुर्बिणीला आकाशाकडे वळवून तिचा वापर आकाशातील ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी केला. कोपर्निकस यांनी मांडलेला पृथ्वीचे स्थान केंद्रीय स्थानी हा समज चुकीचा असल्याचा त्यांनी आपल्या गणिताच्या माध्यमातून सिद्ध केले.

गॅलीलियो गॅलिली यांनी तयार केलेली दुर्बीण दूरवरच्या वास्तूंची प्रतिमा तिच्या मूळ आकाराच्या बत्तीस पट मोठी दर्शवित असे. त्यामुळे आकाशात पृथ्वीच्या जवळ असणाऱ्या अनेक ग्रह ताऱ्यांचा शोध लागला.

ग्रीक तत्वज्ञानी अ‍ॅरिस्टॉटल यांनी मांडलेल्या सिद्धांता विरुद्ध अनेक गोष्टी गॅलीलियो गॅलिली आपल्या दुर्बिणीच्या साह्याने पाहत असतं. त्यामुळे गॅलीलियो गॅलिली यांच्याबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला. लोकांच्या मनात त्यांच्याप्रती ते आपल्यावर काहीतरी जादू टोना करीत असल्याची भावना निर्माण झाली.

त्यामुळे अ‍ॅरिस्टॉटल यांच्या समर्थकांमध्ये गोंधळ उडाला. गॅलीलियो यांनी आपल्या सिद्धांतावर आधारित पुस्तक लिहिल्यामुळे पोप यांनी त्यांचे पुस्तक प्रकाशित न होवू देता त्या पुस्तकावर बंधी घातली. तसचं, गॅलीलियो यांना चौकशी समिती समोर उभे केले.

यावेळी गॅलीलियो यांना एखाद्या कैद्याप्रमाणे वागणूक देऊन त्यांना कैद करण्यात आलं. कैदेत असतांना त्यांनी ‘टू न्यू सायन्सेस’ या पुस्तकाचे लिखाण केले व गुप्तपणे ते पुस्तक हॉलंड या शहरात पाठवून प्रकाशित केले.

कैदेत असतांना त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना त्यांच्या घरीच कैदेत ठेवण्यात आले. कैदेत असतांना सन ८ जानेवारी १६४२ साली वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांचे आजारामुळे निधन झाले. गॅलीलियो यांना त्यांच्या मृत्युच्या पाच वर्षा आधीच अंधत्व आले होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here