श्री गणपति अथर्वशीर्ष

Shri Ganapati Atharvashirsha Stotra

नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांचे लाडके, बुद्धीचे अधिष्ठाता आणि विघनांचे नियंत्रक मानले जाणारे भगवान शिव आणि देवी पार्वती नंदन भगवान गणेश यांच्या अथर्वशीर्षाचे लिखाण करणार आहोत.

श्री गणेश म्हटलं तर हे देवलोकातील सर्व देवांचेच नाही तर भूलोकावर राहणाऱ्या सर्व प्राणी मात्रांचे देखील ते सर्वात लाडके आणि पूजनीय दैवत आहेत. आधुनिक युगात भगवान गणेश यांच्याबद्दल अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्या पौराणिक कथानुसार त्यांची १२ नावे प्रसिध्द असून त्यांना इतरही नावाने संबोधले जाते.

बारा गणेश नावांपैकी आठ नावांची अष्टविनायक मंदिर आपल्या महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आहेत. श्री गणेश यांच्याबद्दल अनेक पौराणिक कथा लिखित स्वरुपात अस्तित्वात असल्या तरी त्यांचे वाचन करायला खुप अवधी लागतो. म्हणून काही संतानी गणपती स्तोत्रांची निर्मिती करून श्री गणेशांची महती सांगणाऱ्या पोथ्यांचे काम सोप केलं आहे.

भगवान गणेश यांच्या संपूर्ण जीवन गाथा त्यांनी थोडक्या शब्दांत आपल्या समोर सदर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे स्तोत्र संस्कृत आणि मराठी अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत. या स्तोत्रांचे नियमित पठन केल्याने आपणास श्री गणेश यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळते. या स्तोत्रांमध्ये भगवान गणेश यांची सगळी नावे, त्यांची कार्यगाथा, आणि आपल्या भक्तांप्रती असलेल प्रेम या सर्व गोष्टींचा या गणपती स्तोत्रांमध्ये उल्लेख केला गेला आहे.

मित्रांनो, आम्ही देखील अश्याच सावरूपाचे काही गणपती स्तोत्रांचे लिखाण खास आपल्यासाठी केलं आहे. तरी, आपण या स्तोत्रांचे नियमित पठन करून गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवा.

श्री गणपति अथर्वशीर्ष – Shri Ganapati Atharvashirsha

Shri Ganapati Atharvashirsh
Shri Ganapati Atharvashirsh

ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि

त्वमेव केवलं कर्ताऽसि

त्वमेव केवलं धर्ताऽसि

त्वमेव केवलं हर्ताऽसि

त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि

त्व साक्षादात्माऽसि नित्यम्।।1।।

ऋतं वच्मि। सत्यं वच्मि।।2।।

अव त्व मां। अव वक्तारं।

अव श्रोतारं। अव दातारं।

अव धातारं। अवानूचानमव शिष्यं।

अव पश्चातात। अव पुरस्तात।

अवोत्तरात्तात। अव दक्षिणात्तात्।

अवचोर्ध्वात्तात्।। अवाधरात्तात्।।

सर्वतो मां पाहि-पाहि समंतात्।।3।।

त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:।

त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।

त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।

त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते।

सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।

सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।

सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति।

त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:।

त्वं चत्वारिवाक्पदानि।।5।।

त्वं गुणत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:।

त्वं देहत्रयातीत:। त्वं कालत्रयातीत:।

त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं।

त्वं शक्तित्रयात्मक:।

त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।

त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं

रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं

वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं

ब्रह्मभूर्भुव:स्वरोम्।।6।।

गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं।

अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितं।

तारेण ऋद्धं। एतत्तव मनुस्वरूपं।

गकार: पूर्वरूपं। अकारो मध्यमरूपं।

अनुस्वारश्चान्त्यरूपं। बिन्दुरूत्तररूपं।

नाद: संधानं। सं हितासंधि:

सैषा गणेश विद्या। गणकऋषि:

निचृद्गायत्रीच्छंद:। गणपतिर्देवता।

ॐ गं गणपतये नम:।।7।।

एकदंताय विद्‍महे।

वक्रतुण्डाय धीमहि।

तन्नो दंती प्रचोदयात।।8।।

एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्।

रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम्।

रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।

रक्तगंधाऽनुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।।

भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्।

आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृ‍ते पुरुषात्परम्।

एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर:।।9।।

नमो व्रातपतये। नमो गणपतये।

नम: प्रमथपतये।

नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय।

विघ्ननाशिने शिवसुताय।

श्रीवरदमूर्तये नमो नम:।।10।।

एतदथर्वशीर्ष योऽधीते।

स ब्रह्मभूयाय कल्पते।

स सर्व विघ्नैर्नबाध्यते।

स सर्वत: सुखमेधते।

स पञ्चमहापापात्प्रमुच्यते।।11।।

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति।

प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति।

सायंप्रात: प्रयुंजानोऽपापो भवति।

सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति।

धर्मार्थकाममोक्षं च विंदति।।12।।

इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम्।

यो यदि मोहाद्‍दास्यति स पापीयान् भवति।

सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्।13।।

अनेन गणपतिमभिषिंचति

स वाग्मी भवति

चतुर्थ्यामनश्र्नन जपति

स विद्यावान भवति।

इत्यथर्वणवाक्यं।

ब्रह्माद्यावरणं विद्यात्

न बिभेति कदाचनेति।।14।।

यो दूर्वांकुरैंर्यजति

स वैश्रवणोपमो भवति।

यो लाजैर्यजति स यशोवान भवति

स मेधावान भवति।

यो मोदकसहस्रेण यजति

स वाञ्छित फलमवाप्रोति।

य: साज्यसमिद्भिर्यजति

स सर्वं लभते स सर्वं लभते।।15।।

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा

सूर्यवर्चस्वी भवति।

सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ

वा जप्त्वा सिद्धमंत्रों भवति।

महाविघ्नात्प्रमुच्यते।

महादोषात्प्रमुच्यते।

महापापात् प्रमुच्यते।

स सर्वविद्भवति से सर्वविद्भवति।

य एवं वेद इत्युपनिषद्‍।।16।।

अथर्ववेदीय गणपतिउपनिषद समाप्त।।

नमस्कार मित्रांनो, “गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया” अश्या प्रकारची हाक आपल्या कानी पडताच आपलं मन कस प्रफुलीत होते. आपण दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची प्रतिष्ठापना आपल्या घरी करीत असतो.

श्री गणेश हे एकमेव असे देव आहेत जे वृद्धांपासून बालगोपालांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत आहेत. भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या लाडके पुत्र भगवान गणेश यांना सर्व देवांमध्ये प्रथम स्थान देण्यात आलं आहे. म्हणून कोणत्याही शुभ प्रसंगी प्रथम गणपती पूजन केलं जाते. तसचं, गणपती आरती व गणपती अथर्वशीर्ष याचे पठन देखील केलं जाते.

तसचं, भगवान गणेश यांना बुद्धीचे दैवत मानलं जाते तसचं, त्यांच्याजवळ माता रिद्धी आणि माता सिद्धी या दोन महत्वपूर्ण शक्ती आहेत. आधुनिक काळात तर त्यांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यानुसार आपण दर महिन्यात येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी आणि महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी गणेश मंदिरामध्ये श्री गणेश स्तोत्र पठन करीत असतो.

त्यामुळे आपल्याला सु:ख शांती प्राप्त होते. गणपतीला सु:ख कर्ता आणि दु:ख हरता अश्या प्रकारची उपमा देण्यात आली आहे.

गणपती बाप्पांच्या स्तोत्रांचे नियमित पठन करीत राहल्याने आपले सर्व दुख , दारिद्र्य नाहीसे होवून जाते. अशी लोकांची भावना आहे. संस्कृत आणि मराठी भाषेत रचल्या गेलेल्या गणेश स्तोत्रांमध्ये भगवान गणेश यांची संपूर्ण माहिती सांगितली आहे. त्यांच्या अनेक नावांचे वर्णन त्यात केलं गेल आहे.

मित्रांनो, आपण देखील या गणेश स्तोत्रांचे नियमित वाचन करावे म्हणून आम्ही देखील या लेखात आज गणपति अथर्वशीर्षाचे लिखाण केलं आहे. तरी आपण या स्तोत्रांचे नियमित वाचन करून आपल्या मित्रानांची सांगा धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top