• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, May 17, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Aarti

गणपती बाप्पा ची आरती

Ganpati Aarti in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी कोणत्याही शुभ प्रसंगी प्रथम ज्या देवाची आपण मनोभावे पूजा अर्चना करतो, त्यांची आरती करतो अशे सर्व भूलोक तसचं सर्व देवी देवतांचे प्रिय असणारे, सर्व देवांमध्ये प्रथम पूजनीय स्थान असणारे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे  पुत्र श्री गणेश म्हणजेच गणपती यांची महती आणि त्यांची कार्यसिधी बाबत महती सांगणाऱ्या आरतीचे लिखाण करणार आहोत.

गणपतीची आरती – Ganpati Aarti in Marathi

Ganpati Aarti
Ganpati Aarti

गणपती हे सर्व देवांमध्ये प्रथम पूजनीय आहेत. कुठल्याही शुभ प्रसंगी प्रथम त्यांचे पूजन केले जाते. त्यांना बुद्धी चे आराध्य दैवत मानलं जाते. शिवाय, सर्वांच्या लाडके असणाऱ्या श्री गेणेशांचे वाहन उंदीर आहे. गणपती या नावाचा अर्थ सांगायचा म्हटलं तर, गणांचा अधिपती या उद्देश्याने गणपती असे नाव या भगवंताला देण्यात आलं आहे.

भगवान गणेश पूजा विधी – Simple Ganesh Puja at Home

भगवान गणेश यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर,  बालगोपालांपासून वृद्ध वर्गांपर्यंत ते सर्वांचेच लाडके आहेत. आपण सर्वजण त्यांना लाडाने “गणपती बाप्पा” असे म्हणतो. आपण सर्वजण दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करत असतो.

त्यानिमित्ताने आपण आपल्या घराची साफसफाई करून आपल्या लाडक्या श्री गणेशाच्या आगमनाची तयारी करीत असतो. भगवान श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी आपण सुंदर असे डेकोरेशन करतो,  सुंदर प्रकारे मखर उभारून चौरंगावर श्री गणेशाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करतो.

पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळी, सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ अश्या प्रकारे आपण त्यांच्या आगमनाची तयारी करीत असतो. दररोज सकाळ संध्याकळ घरातील सर्व लोक एकत्र जमून त्यांची आरती करीत असतो. दहा दिवस चालणारा हा गणेश उत्सव कधी संपतो माहितच पडत नाही.

अनंत चतुर्थीच्या दिवशी या उत्साहाचे समापन होवून पुढच्या वर्षी लवकर या अश्या प्रकारे आपण त्यांना विनवणी करतो. आपल्या सर्व लाडक्या भक्तांना सुख देणारे आणि त्यांचे सर्व दुख हरणारे अशी भगवान गणपती यांच्या बद्दल लोकांची धारणा आहे. म्हणून त्यांना सर्व देवांमध्ये प्रथम पूजेचा मान आहे. अश्या महान भगवंतांची कोणत्याही शुभ प्रसंगी गायिल्या जाणाऱ्या गणेश आरतीचे लिखाण आम्ही या ठिकाणी केलं आहे.

“सुखकर्ता दुखहर्ता” आरती – Sukhkarta Dukhharta Aarti

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ता फळाची ||1||

जय देव जय देव जय मंगल मूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||धृ ||

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुमकुम केशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || जय || 2 ||

लंबोदर पितांबर फणी वर वंदना |
सरळ सौंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूर वरवंदना ||3 ||

जय देव जय देव जय मंगल मूर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||धृ ||

मित्रांनो, श्री गणेश हे सर्व देवांचे लाडके असणारे भगवंत आहेत. सर्व देवी देवतांमध्ये प्रथम पूजनीय स्थान त्यांना प्राप्त आहे. आपल्या भूलोकावर कुठल्याही शुभ प्रसंगी प्रथम श्री गणेशांची पूजा अर्चना केली जाते. अश्या या महान भगवंतांच्या जन्माबद्दल अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत.

शिवपुराणा मध्ये श्री गणेश यांच्या जन्माचा उल्लेख भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांची अवतरण तिथी सांगण्यात आली आहे तर, गणेशपुराण मतानुसार त्यांचा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी झाला आहे असे नमूद करण्यात आलं आहे. अश्या प्रकारच्या पौराणिक कथा त्यांच्या जन्माबद्दल प्रचलित आहेत. त्यांच्या कार्याची गाथा जितकी गायली जाईल तितकी कमीच.

भगवान श्री गणेश यांच्या चरणी आपण सर्व लोकांची अशी श्रद्धा आहे की, भगवान गणेश आपल्या सर्व दु:ख नष्ट करून आपल्याला सु:ख देतात. काही लोक तर त्यांना नवसाला पावणारा देव देखील म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात देखील त्यांची अनेक ऐतिहासिक मंदिरे प्रसिद्ध आहेत. आपल्या सर्वांचे लाडके असणाऱ्या श्री गणेश म्हणजेच गणपती बाप्पा यांच्या करिता कोणत्याही शुभ प्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या आरतीचे लिखाण आम्ही या ठिकाणी केलं आहे. तरी आपण या आरतीचे वाचन करून इतरांना देखील पाठवा. धन्यवाद..

Ganpati / Ganesh Aarti Image in Marathi

Sukhkarta Dukhharta Ganpati Aarti
Ganpati / Ganesh Aarti Image

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे की गणपती बाप्पा ची आरती – Sukhkarta Dukhharta Ganpati Aarti तुम्हाला आवडली असेलच…. तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Sukhkarta Dukhharta Ganpati Aarti – गणपती बाप्पा ची आरती या लेखात दिलेल्या आरती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Editorial team

Editorial team

Related Posts

Hanuman Aarti in Marathi
Aarti

हनुमंताची आरती

Hanuman Aarti in Marathi राम भक्त हनुमान यांना या भूलोकावर अनेक नावांनी संबोधलं जाते. तसचं, त्यांच्या जन्माबद्दल अनेक पौराणिक कथा...

by Editorial team
April 21, 2021
Parshwanath Aarti Marathi
Aarti

जैन सामुदाय चे २३ वे तीर्थकार भगवान पार्श्वनाथ यांची आरती

Parshwanath Aarti Marathi जैन सामुदाय हा भारतातील अति प्राचीन समुदाय असून या सामुदायात एकूण २४ तीर्थकार  होवून गेले आहे. त्यांपैकी...

by Editorial team
February 17, 2021
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved