लसूण ची माहिती आणि फ़ायदे

Lasun Marathi Mahiti

आपणाला सर्वांना परिचित असणारी रोज जेवणात वापरली जाणारी वनस्पती म्हणजे लसूण होय. लसनाचा उपयोग हा रोजच्याच स्वयंपाकात होतो. तसेच याचा औषधीसाठी सुद्धा वापर केला जातो. तसेच लसूण विषयी आणखी काही माहिती आपण समोर बघणार आहोत.

लसूण ची माहिती आणि फ़ायदे – Garlic Benefits in Marathi

Garlic Benefits in Marathi
Garlic Benefits in Marathi

लसूण ची माहिती – Garlic Information in Marathi

शास्त्रीय नाव : (एलियम सटायव्हम्) Allium sativum
इंग्रजी नाव : (गार्लिक) Garlic

लसूण ही वनस्पती कंदमूळ वर्गात मोडते. लसणाचे झुडूप ४० ते ५० सें.मी. उंच वाढते. लसणाचे गड्डे जमिनीत लागतात व पाने जमिनीतून वर येतात. याची पाने हिरवी असतात. आणि ती वाळल्यावर पिवळी दिसतात. याची पाने आकाराने चपटी, लांबट व आतून नळीसारखी पोकळ अशा प्रकारची असतात.

यातून मधोमध दांडा उगवतो त्याच्या टोकाला झुपक्याने फुले येतात, आणि त्याचा रंग हा पांढरा असतो. लसूण हा जमिनीत उगवतो तरी त्याला लहान लहान पंधरा ते वीस पाकळ्या असतात. तसेच त्याला वरून पांढरट तांबूस रंगाचे टरफल असते. आणि लसूण हा आतून पिवळसर पांढऱ्या रंगाचा असतो,

लसूण लागवड – Lasun Lagwad Mahiti Marathi

लसणाची लागवड करताना जमीन ही मध्यम प्रकारची असावी लागते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकरी याची लागवड करतात. आणि थंडीच्या सुरुवातीला लसूण तयार होऊन बाजारात विक्रीसाठी सुद्धा येतो.

विविध उपयोग :

स्त्रिया स्वयंपाकात लसूण हा रोजच वापरण्यात येतो, लसणाची चटणी करताना स्वयंपाकात भाजी-आमटी करतानासुद्धा लसूण वापरतात. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये स्वयंपाकात लसणाचा वापर जास्त प्रमाणात करतात. रस्सा भाजी, जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी यांतसुद्धा लसूण वापरल्याने भाजी, आमटी, चटण्या खूप रुचकर होतात. मसाल्यात याचा वापर केल्याने चव देखील छान येते.

लसणाचे औषधी उपयोग – Garlic Uses in Marathi

  • बाहेरून वापरण्यासाठी व पोटात घेण्यासाठी लसणाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो.
  • कफनाशक, पित्तनाशक, वातनाशक म्हणून याचा उपयोग केला जातो.
  • संधिवाताने किंवा हाडे झिजल्याने वयस्कर माणसांचे गुडघे दुखत असतील तर त्यावर लसणाचा लेप लावावा म्हणजे त्याने उत्कृष्ठ असा आराम मिळतो.
  • नायटा, गळू यांसारख्या त्वचारोगांवर लसणाचा रस चोळावा.
  • तसेच कान दुखत असल्यास खोबऱ्याच्या तेलात लसणाच्या पाकळ्या गरम करून ते तेल कोमट झाल्यावर कानात घालावे म्हणजे कानदुखी सुद्धा कमी होते.
  • लसूण जेवणात सतत वापरल्याने पोटाचे होणारे अनेक रोग बरे होतात.
  • सारखा खोकला येत असेल तर लसूण भाजून त्यात गूळ मिसळून, गोळी करून खावी म्हणजे आराम मिळतो.
  • आमवात, संधिवात वगैरे वातप्रकारांवर, तसेच अजीर्ण, अपचन वगैरेंवर सुद्धा लसूण सेवनाने आराम मिळतो.
  • अनेक प्रकारच्या नेत्ररोगांवर, दमा, हृदयविकार, ताप अशा अनेक रोगांवर लसूण उपयुक्त ठरतो.
  • तसेच लसणाचे जर नियमित सेवन केले तर कफ सुटतो.
  • पोटातील वायूचा नाश होतो, श्वसननलिकेवरील आलेली सूज सुद्धा कमी होते.
  • पचनशक्ती सुधारते.

असा हा बहुगुणी लसूण उष्ण व तिखट असल्याने गर्भवती स्त्रियांनी, पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात सेवन करू नये. आणि ज्याना लसूण सेवनाने त्रास होत असेल तर धन्याचे पाणी वारंवार प्यावे.

लसणाची इतर माहिती – About Garlic in Marathi

लसूण हा चवीला तिखट व उग्र वासाचा असतो. आणि रोजच स्वयंपाकात गृहिणी लसनाचा वापर करतात; तसेच औषधी म्हणून आयुर्वेदातपण लसूण याचा वापर केला जातो. अशी लसूण विषयीची बरीच माहिती इथे आपण पाहली.

लसूण विषयीची विचारली जाणारी काही प्रश्न – FAQ About Lasun in Marathi

1. लसूनचे शास्त्रीय नाव काय आहे ?
उत्तर – लसूनचे शास्त्रीय नाव (एलियम सटायव्हम्) Allium sativum हे आहे.

2. लसूनची लागवड ही कशी केली जाते ?
उत्तर – पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकरी याची लागवड करतात. थंडीच्या सुरुवातीला लसूण तयार होऊन बाजारात विक्रीसाठी येतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top