जगातील सोन्याने बनलेलं पहिलं हॉटेल, एक दिवस राहण्यासाठी मोजावी लागेल एवढी किंमत

Golden Lake Hotel Hanoi

आपल्या साईटवर जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला नेहमी मिळतच असते, मग ते महाग पदार्थ असो लाकूड असो की आणखी काही. आणि आपणच नाही तर बऱ्याच लोकांना या विषयावर वाचायला सुध्दा आवडत. आजही आपण लेखाचे शीर्षक वाचून लेख वाचण्यासाठी आलेले असणार. तर आजच्या लेखात आपण जगातील सोन्याने बनलेलं पहिलं हॉटेल कोणते आहे? आणि या हॉटेलात एक दिवस राहण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर चला पाहूया जगातील पाहिलं हॉटेल जे बनलंय सोन्याचा वापर करून.

आपण कधी विचार केला आहे का सोन्याने बनलेल्या ठिकाणी राहिल्यावर कसा अनुभव येईल जेथे प्रत्येक वस्तू ही सोन्याने बनलेली असेल, जिकडे तिकडे पाहिले तिकडे सोनेच दिसणार. लोकांना या गोष्टीचा अनुभव देण्यासाठी आणि लोकांची इम्युनिटी मजबूत बनण्यासाठी व्हिएतनाम देशात अश्या प्रकारच्या हॉटेल चे निर्माण केल्या गेले आहे, ज्या हॉटेलची प्रत्येक वस्तू ही सोन्याने बनलेली असेल.

या हॉटेलची प्रत्येक वस्तू ही सोन्याने बनलेली आहेच मग ते जेवणाचे ताट असो, की हॉटेल्स चे खिडकी दरवाजे. सगळेच सोन्याचा वापर करून बनवलेले आहेत. यासोबतच वॉश रूम मधील बेसिन बाथटप, टॉयलेट. या सगळ्यांना बनविण्यासाठी सोन्याचा वापर केला गेला आहे.

जगातील पहिलं सोन्या पासून बनलेलं हॉटेल – Gold Plated Hotel Vietnam Information in Marathi

Gold Plated Hotel Vietnam
Gold Plated Hotel Vietnam

ही हॉटेल व्हिएतनाम ची राजधानी हॅनॉई मध्ये स्थित आहे. ही एक पंचतारांकित हॉटेल आहे, ज्या हॉटेल ला डोल्से हनोई गोल्डन लेक (Dolce Hanoi Golden Lake) या नावाने ओळखले जाते. या हॉटेल चे आकारमान बऱ्यापैकी असून जवळ जवळ २५ मजले उंच इमारती मध्ये या हॉटेल ला बांधल्या गेली आहे. या हॉटेल मध्ये एकूण खोल्यांची संख्या ४०० पर्यंत आहे. आणि या ४०० खोल्यांमध्ये तसेच हॉटेल मध्ये जे फर्निचर वापरल्या गेले आहे ते सोन्याचा वापर करून बनवल्या गेले आहे.

हॉटेल्स च्या स्टाईल्स सुध्दा सोन्याच्या कोटिंग चा वापर करून बनविल्या गेल्या आहेत. या हॉटेल चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. कारण अश्या प्रकारची एवढी मोठी हॉटेल जग पहिल्यांदा पाहत आहे.

कारण या हॉटेल मध्ये प्रत्येक गोष्ट ही सोन्याचा वापर करून बनविल्या गेली आहे. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड हा लालसर सोनेरी रंगाचा आहे. हॉटेल विषयी किती बोलावे तेवढे कमीच कारण तेथील प्रत्येक गोष्टीला सोन्याचा वापर करून बनविल्या गेली आहे.

या हॉटेल चे निर्माण या साठी केल्या गेले आहे कारण सोन्यामुळे माणसाचा तणाव दूर होतो असे मानल्या जातं. आणि यामुळे लोकांना तणावापासून दूर करण्यास मदत होईल असे हॉटेल निर्मात्यांचे मत आहे. त्यामुळेच हॉटेल चे निर्माण सोन्याच्या प्लेटिंग चा वापर करून करण्यात आले आहे. या हॉटेल चे निर्माण २००९ पासून करण्यात आले होते. आणि बऱ्याच वर्षांचा कालावधी नंतर या हॉटेल चे निर्माण झाले आहे.

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, जर या हॉटेल मध्ये एक दिवस राहायचे असल्यास किती पैसे मोजावे लागतील, तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर सुध्दा आपल्याला या लेखातून दिल्या जाणार आहे. तर या हॉटेल मध्ये जर आपल्याला एक दिवस राहायचे असेल तर या हॉटेल चे कमीत कमी रेट हे २० हजार रुपये आहेत, तेच डबल बेड आणि इतर सुविधांसोबत आपल्याला ७५ हजार रुपयांपर्यंत किमंत मोजावी लागेल.

आणि यापेक्षा अधिक सुविधा तसेच शाही खोलींमध्ये एक दिवस राहायचे ४ ते ५ लाख रुपये मोजावे लागतील. या हॉटेल्स चे रेट पाहून आपल्याला एवढं नक्की कळले असेल की हे हॉटेल सामान्य माणसाला परवडणारे नाही आहे. पण ज्यांच्याकडे पैश्यांची कोणतीही कमी नाही ते या हॉटेल मध्ये जाऊन या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतात.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच मराठीतील नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here