पेरू फळाची संपूर्ण माहिती

Peru chi Mahiti

पेरूचे झाड सर्वत्र आढळते. सहसा हि झाडे उष्ण हवामान असलेल्या वातावरणात लगेच वाढतात. याची फळे लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच  खायला आवडतात. हिरवागार कच्चा पेरू असो वा  पिकलेला पिवळा पेरू लोक आवडीने खातात. पेरूमध्ये ‘क ‘ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते; तर ‘अ’ जीवनसत्त्व, लोह, चुना, स्फुरद, फॉस्फरस, कॅल्शियम ही द्रव्येदेखील खूप असतात.

पेरूमध्ये ‘बी’ व ‘सी’ व्हिटॅमिन्स् असतात.

पेरू फळाची संपूर्ण माहिती – Guava Information in Marathi

Guava Information in Marathi
Guava Information in Marathi
हिंदी नाव: अमरूद
इंग्रजी नाव: Guava

हे झाड उंचीने लहान असते. याचे खोड एक वीतभर रुंद, पांढरट रंगाचे असते. खोडाचे पापद्रे निघून, ते आपोआप गळतात. पाने हिरव्या रंगाची असून त्यावर शिरा असतात. ही पाने फांदीवर एका आड एक येतात. पानांना छोटेसे देठ असते.

याची फुले पांढरी असतात. फळे कच्ची असताना हिरव्या रंगाची, तर पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. आतील गर पांढऱ्या किंवा गुलाबी लालसर रंगाचा असतो. ही फळे गोड किंवा अगोडही असतात.

औषधी उपयोग : Benefits of Guava

  • त्वचा सुधारण्यासाठी व चमकदार होण्यास मदत होते.
  • मधुमेह साठी पेरूचे सेवन रोज केल्यास, इन्सुलिन तयार होण्यास मदत होते.
  • पेरूच्या झाडाची पाने चावून खाल्यास तोंडाची दुर्गंदी दूर होते.
  • यामध्ये फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठता दूर होते.
  • कर्करोग पासून संरक्षण मिळण्यास पेरू खाल्यास मदत होते.
  • थायरॉईडची समस्या असल्यास पेरू चे रोज योग्य प्रमाणत सेवन केल्यास आजारावर मात करण्यास मदत मिळते.
  • डोळ्यासाठी देखील उपयोगी फळ आहे.
  • पेरूच्या पानाचा उकळून काढा पिल्याने सर्दी व खोकला ची समस्या दूर होते.

पांढरा आणि तांबडा पेरू अशा याच्या दोन जाती आहेत.

झाड – About Guava Tree

या फळात अगदी बारीक पांढऱ्या बिया असतात. या बियांसहित व वरच्या सालीसहित हे फळ खाल्ले जाते.

पेरूचे झाडाचे खोड चिवट आणि बळकट असते. पेरूच्या झाडाला सतत पाणी द्यावे लागत नाही. हे फळ पोपटाला खूप आवडते. पेरू दिसले की पोपटांचे थवेच्या थवे या झाडांकडे झेपावतात. हे थंड प्रकृतीचे फळ आहे. पेरूची कोशिंबीर आणि वड्या पण करतात. पेरू खाणे माणसाला प्रकृतीच्या दृष्टीने हितावह आहे. ही झाडे लावल्यापासून अडीच ते तीन वर्षांनी त्याला फळे येऊ लागतात.

या फळाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने शेतकरी पेरूच्या बागा तयार करून उत्पादन काढत आहेत. तसेच दारासमोर अंगणातसुद्धा ही झाडे लावतात.

पेरू बद्दल प्रश्न – Quiz about Guava

Q. पेरू मध्ये कोणकोणती जीवनसत्व आहेत ?

उत्तर: ‘क ‘ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते; तर ‘अ’ जीवनसत्त्व सुद्धा आहेत. पेरूमध्ये ‘बी’ व ‘सी’ व्हिटॅमिन्स् देखील असतात.

Q. पेरूचे इग्रजीत, हिंदीत व शास्त्रीय नाव काय ?

उत्तर: इंग्रजीत Guava, हिंदीत जाम /अमरूद तर शास्त्रीय नाव झीळवळी सरक्षरीर हे आहे.

Q. पेरू खाण्याचे तोटे कोणते ?

उत्तर: गर्भवती स्त्रियांनी डॉक्टर च्या सल्ल्यानुसार च पेरू चे सेवन करावे, जास्त सर्दी खोकला येणाऱ्या लोकांनी पेरू चे सेवन टाळावे. ज्यांना पेरू च्या बिया पचन नाही त्यांनी देखील पेऊ खाण्याचे टाळावे. शरीराला नुकसान होऊ शकते. पेरू उपाशीपोटी जास्त प्रमणात खाल्यास पोटात दुखणे वाढू शकते तर जुलाब व ताप येऊ शकतो.

Q. पेरूच्या पानांचे फायदे काय?

उत्तर: खास करून पेरूच्या झाडाची पाने चावून खाल्यास तोंडाची दुर्गंदी दूर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top