बॉलीवूड सिंगर यो यो हनी सिंग यांच्याविषयी माहिती

Honey Singh chi Mahiti

बॉलीवूड नाही तर संपूर्ण जगाला आपल्या संगीताने व गायनाने नाचवणाऱ्या हनी सिंगला आज सर्वच ओळखतात. युवा वर्गाचा तो गळयाचा ताईत बनला आहे. हनी सिंग एक रॅपर संगीतकार, गायक, व सध्या फिल्म अ‍ॅक्टर सुध्दा आहे.

आपल्या गाण्यांनी व संगीताने त्यांनी धमाल उडवली आहे. त्याचे संगीत आज युवा वर्गच नाही, तर लहानमुले व वृध्दानांही बऱ्यापैकी पसंत पडत आहे. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे आज ते एक यशस्वी संगीतकार व गायक आहेत. स्वबळावर आपल्या कौशल्याने त्यांनी चित्रपट सृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यो यो हनी सिंग यांचे खरे नाव हिर्देश सिंग आहे.

बॉलीवूड सिंगर यो यो हनी सिंग यांच्याविषयी माहिती – Honey Singh Information in Marathi

Honey Singh information

हनी सिंग यांचे जीवनचरित्र – Honey Singh Biography in Marathi

हनी सिंग यांचा जन्म १५ मार्च रोजी होशियारपूर पंजाब येथे एका सिख्ख परिवारात झाला त्यांचे खरे नाव हिर्देश सिंग आहे. त्यांनी लंडन मधील ट्रिनिटी स्कुल मधून संगीताचे शिक्षण घेतले आहे. भारतात आल्यावर ते दिल्लीत राहायला गेले.

त्यांचा पहिला पंजाबी अल्बम इंटरनॅशनल विलेजर ११ नोव्हेंबर २०११ ला रिलीज झाला होता त्यामधील “गबरू” हे गाणे एशियन टॉप म्यूझिक चार्ट मध्ये समावेशीत करण्यात आले.

त्यांनी भारतभर विविध म्यूझीक कॉन्सर्ट सुरू केल्या.

त्यांचे पंजाबी गायक दलजीत दोसांझ सोबत गायलेले “लक २८ कुडीदा” हे २८ मे २०११ मध्ये एशियन म्यूझिक चार्ट मध्ये नंबर १ वर राहीले आहे.

हनी सिंग यांना त्यांच्या गाण्यासाठी ग्लासकसी साठी २००६ मध्ये बेस्ट साउंड साठी अवार्ड मिळाला आहे.

रीबर्थ साठी मध्ये पिटीसी बेस्ट फोक पॉप अवार्ड मिळाला आहे.

२०११ मध्ये पिटीसी बेस्ट म्यूझिक डायरेक्टर चा सन्मान मिळविला आहे.

बॉलीवूड मध्ये त्यांनी आपले पाय जमवल्या नंतर २०१२ मध्ये कॉकटेल आणि मस्तान साठी सर्वाधीक मानधन घेतले होते.

सोनाक्षी सिन्हा सोबत त्याचे देसी कलाकार हे गाणे इंटरनेटवर फार पसंत केले गेले.

यु टयुब वरील २०१२ च्या टॉप म्यूझीक अल्बम मध्ये त्याचा अल्बम टॉप ३ मध्ये होता. त्याचे ब्राउन रंग हे गाणे यूटयूब वर सर्वाधीक पसंत केले गेलेले गाणे मानले जाते.

हनी सिंग यांचे व्यक्तीगत जीवन – Honey Singh Life Story

हनी सिंग याचा विवाह शालिनी तलवार हया जवळच्या मैत्रिणी सोबत झाला आहे.

बऱ्याच भेटी नंतर शालिनी सोबत त्यांनी विवाह करायचे ठरवीले हनी सिंग त्याच्या गाण्यांच्या बोलांसाठी फार चर्चेत राहिले.

त्याच्या गाण्यातील बोल फार अश्लिल व उध्दट आहेत.

त्यावर बंदी आणल्या जावी याकरता काही संघटनांनी त्यांच्याविरूध्द उच्च न्यायालयात याचिकाही दिल्या आहेत.

आपल्या वेगळया फॅशन ट्रेंड मूळे हनी सिंग रातोरात प्रसिध्दीच्या शिखरावर पोहोचले. काही चाहत्यांनी त्यांच्या नावाचे मंदीरही बांधले आहे.

हनी सिंग यांच्याबाबत रोचक गोष्टी – Interesting Information about Yoyo Honey Singh

  • हनी सिंग यांना यो यो हे स्लॅग त्यांच्या अमेरिकन चाहत्यांनी दिले आहे ज्याचा अर्थ “तूमचा तूमचा” असा होतो
  • २०१२ मध्ये त्यांचे दोन अल्बमने तर धमाल केली होती. ब्राउन रंग व हाईहिल्स हे गाणे युवा वर्गाच्या मुखावर आजही आहे.
  • यो यो हनी सिंगांनी पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
  • २०१४ मध्ये ते बॉलीवूड मध्ये हिरो म्हणुन एक्स्पोज या चित्रपटातून सर्वांसमोर आले हा चित्रपट फ्लॉप ठरला.
  • हनी सिंग यांनी दुबईत १ लक्ष डॉलर्स रूपये खर्च करून “ब्राउन रंग” या गाण्याची शूटींग पूर्ण केली
  • २००६ मध्ये हनी सिंग वर्ल्ड चार्ट मध्ये नंबर एक वर होते.
  • हनी सिंग यांना क्रिकेट चे फार वेड आहे.

तर हि होती हनी सिंग विषयी संपूर्ण माहिती आवडल्यास शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top