Living in Space
मित्रहो, अवकाश म्हटल म्हणजे आपल्या समोर बरेच प्रश्न येतात. जसे, कसे असेल तिथले वातावरण? पृथ्वीच्या बाहेर जीवन असेल का? वैगैरे वगैरे!
पृथ्वीच्या बाहेर वातावरण कस असेल बर हा विचार आला कि आपण ग्रह तार्यांविषयी विचार करायला लागतो,
पण कधी विचार केला आहे का? कि, अवकाशात अंतराळवीर कश्या प्रकारे राहत असतील?
माहित नाही ना!
पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण जास्त असल्यामुळे आपण पृथ्वीवर चांगल्या प्रकारे राहू शकतो, चालू शकतो. परंतु अवकाशात पृथ्वीप्रमाणे गुरुत्वाकर्षणच नाही तर वातावरण सुद्धा नाही. मग कसे राहत असतील बर अवकाशवीर?
तर चला मग जाणून घेऊया आपण काही गोष्टी ज्या अवकाशात गेल्यावर करणे कठीण होतात,
तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील? – How Astronauts Live In Space
१) जेवण –
मित्रहो, शीर्षक वाचल्यावर आपल्याला दररोज च्या जेवणाची आठवण झाली असेलच त्यात शंकाच नाही! ज्यात भाजी, पोळी, भात असतो.
आपण रोजचे जेवण घरी जमिनीवर बसून किंवा जेवणाच्या टेबलवर बसून करत असतो. पण अवकाशात गेल्यावर आपण आपल्या घरच्यासारखे जेवण नाही करू शकत
मग इथे आपल्याला एक प्रश्न उभा राहला असेल. कि, अवकाशवीर काय उपाशी तर राहत नसतील?
नाही! मुळीच नाही!
कारण प्रत्येक व्यक्तीला काम करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. मग ती उर्जा कोणत्याही माध्यमातून मिळो. अवकाशवीरांसाठी त्यांच्या सोबत छोट्या पिशव्यांमध्ये बरेचशे फळे, आणि ज्या अन्नामध्ये पाण्याची मात्रा कमी असते. अशे अन्न त्यांच्या सोबत पाठवल्या जाते.
कारण अवकाशात शून्य गुरुत्वाकर्षण असल्यामुळे कोणतीही वस्तू हवेत तरंगते. म्हणून त्यांच्या जेवणामध्ये पाण्याची मात्रा कमी असणारे अन्नपदार्थ त्यांच्या सोबत पाठविले जातात.
२) झोप –
झोपेमुळे आपण आपल्या शरीराला आराम देऊ शकतो. आणि शरीराला पुन्हा काम करण्यासाठी तयार करू शकतो. अवकाशात जेव्हा अवकाशवीर त्यांच्या विमानात असतात तेव्हा त्यांना झोपण्यासाठी विशिष्ठ प्रकारच्या बॅग उपलब्ध असतात जे विमानाच्या आतील बाजूला बांधलेल्या असतात ज्यामुळे झोपेत ते इकडे तिकडे हवेत तरंगू नयेत.
३) अंघोळ –
आपल्याला अंघोळ करायची असली कि आपण पाण्याची बाटली घेतो आणि अंघोळ करतो. पण मित्रहो हे अवकाशात शक्य नाही आहे. तिथे शून्य गुरुत्वाकर्षणामुळे आपण पाण्याचा जसा पाहिजे तसा वापर करणे अवघड आहे कारण तिथे पाण्याचे थेंब सुद्धा गोलाकार होऊन हवेत तरंगतात मग यावरून आपण विचार करसाल कि अवकाशवीर एवढ्या दिवस कसे बरे विना आंघोळीचे राहू शकतात ? ते विना आंघोळीचे राहत नाहीत तर ते स्पंज ने आपले शरीर स्वच्छ करतात. आणि स्वच्छ कपडे घालतात.
४) ब्रश करणे –
दैनिंदिन जीवनात उठल्या उठल्या सर्वात अगोदर काही करायचे म्हटले कि आपण ब्रश करण्याचे ठरवतो त्याचप्रमाणे अवकाशात अवकाशवीर सुद्धा झोपेतून उठल्यावर ब्रश करतात. पण जेव्हा ब्रश केल्यानंतर थुंकण्याचा विषय येतो तेव्हा ते त्यांची थुंक बाहेर न टाकता आतमध्ये गिळून घेतात. आपण विचार करत असाल कि टूथपेस्ट मध्ये तर फ्लोराईड असते मग कसे ?
मित्रांनो त्यांच्या टूथपेस्ट मध्ये फ्लोराईडचे प्रमाण खूप कमी असते आणि ते गिळल्यामुळे त्यांना काही विकार होत नाहीत.
५) पाणी पिणे –
पाणी हे जीवन आहे. आपण म्हणतो विना पाण्याचा कोणता जीव राहू शकत नाही. मग अंतराळवीर अवकाशात पाणी पीत असतील कि नाही? असा प्रश्न आपल्या समोर आला असेलच.
तर त्याचे उत्तर आहे हो पितात!
पण हो, ते आपल्यासारखे ग्लासाने किंवा बोतल ने नाही तर त्यांना विशिष्ठ प्रकारची पॅकिंग केलेले पाउच उपलब्ध असतात. जे त्यांना जेव्हा तहान लागली तेव्हा ते त्याद्वारे आपली तहान भागवतात.
६) शौचालय –
सकाळी उठल्या नंतर आपल्याला फ्रेश होण्यासाठी आपण शौचालयाचा वापर करतो. पण अवकाशात ते एवढे सोपे नाही. अवकाशात अवकाशवीरांना विमानात त्यांना शौच आल्यास तिथे वेगळी व्यवस्था असते. व्हॅक्यूम ट्यूबच्या सहाय्याने तिथे अवकाशवीर शौच करतात.
७) रडणे –
जर एखाद्या वेळेस आपल्याला खूप दुखः किंवा खूप आनंद झाला तर अश्रू येत असतात आणि आपण पृथ्वीवर असल्याने आपण त्यांना पुसून घेऊ शकतो. पण कधी विचार केला आहे का कि अवकाशात रडल्यावर नेमक काय होत असेल? कदाचित अवकाशात रडूच येत नसेल कि का ?
नाही असे काही होत नाही! अवकाशात सुद्धा व्यक्तीला रडू येत असतो पण हो तिथ रडल्यानंतर अश्रू पुसण्या अगोदाच ते अश्रू त्या वातावरणात तरंगण्याला सुरुवात होते.
८) हाथ धुणे –
ज्याप्रमाणे आपण जेवण करण्याच्या अगोदर नेहमी आपले हाथ स्वच्छ धुवून घेतो आणि त्यांनतर च जेवण करण्यास बसतो.
त्याप्रमाणे हात धुण्याचा विचार जर तुम्हाला अवकाशात आला तर तुम्हाला तिथे घरच्यासारखे हात धुता येणार नाहीत. हाथ स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला हँड सॅनिटायझर चा वापर करावा लागेल.
९) लिहिण्यासाठी काय वापरणार –
ह्या मुद्याच शीर्षक वाचल्यावर तुम्ही सहज सांगसाल कि लिहिण्यासाठी आम्ही पेनाचा वापर करू! पण मित्रहो तुमच्या माहितीसाठी तुम्ही अवकाशात पेनाचा वापर नाही करू शकत कारण अवकाशात शून्य गुरुत्वाकर्षण असल्यामुळे तिथे पेनाने लिहिल्याच जाऊ शकत नाही.
मग आपण विचार करसाल कि मग तिथे अवकाशवीरांना काही लिहिण्याचे काम पडले तर ते कश्याचा वापर करत असतील. आता नवीन शोध लागले आहेत आणि नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैज्ञानिकांनी अशे काही पेन शोधून काढले आहेत कि ते पेन शून्य गुरुत्वाकर्षणा मध्ये सुद्धा लिहू शकतात,
परंतु मग हा प्रश्न उभा राहतो कि, अश्या नवीन तंत्रज्ञानाच्या पेनांचा शोध लागण्यागोदर तिथे लिहिण्यासाठी काय वापरले जात असेल. तर तुमच उत्तर मी तुम्हाला देणार पहिल्या काळात अवकाशात लिहिण्यासाठी पेन्सिल चा वापर केल्या जात असे.
आशा करतो तुम्हाला यालेखामध्ये आपण अवकाशात काय करू शकतो आणि काय करायला अवघड जाते याविषयी नवीन काहि तरी शिकायला मिळाले असेल.
आम्ही अश्याच नवीन रोचक गोष्टी तुमच्यासाठी रोज घेऊन येत राहू,
असेच रोचक लेख वाचत राहण्यासाठी आमच्याशी जुळलेले रहा आणि हा लेख आपल्याला आवडला असेल
तर आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.