“तुम्हाला माहित आहेत काय? असे कायदे जे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.”

Bhartatil Kayde

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिले आहेत. ज्या अधिकारांचा वापर करून तो स्वतःचा बचाव करू शकतो. स्वातंत्र्य, समता, व बंधुता या तत्वांवर आधारलेले आपले भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला काही मुलभूत हक्क देते. आणि बरेच लोकांना त्या हक्कांविषयी माहिती नसते.

तसेच काही विशेष कायदे आहेत जे आपल्यासाठी महत्वाचे असून आपल्या संरक्षणासाठी आवश्यक आहेत. त्या कायद्यांविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत असे काही कायदे ज्या विषयी बऱ्याच लोकांना माहिती नाही.

“तुम्हाला माहित आहेत काय? असे कायदे जे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.” – Indian Laws and Rules in Marathi

Indian Laws and Rules

१) महिला पोलीसच महिलेला अटक करू शकते:

Criminal Procedure Code, कलम ४६ ज्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पाहता, महिलांना सकाळी ६ वाजेच्या आत आणि सायंकाळी ६ वाजेनंतर अटक केल्या जाऊ शकत नाही.

तसेच महिलांना अटक करण्यासाठी महिला पोलिसांचीच आवश्यकता असते.

२) कोणतेही हॉटेल्स तुम्हाला पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह वापरण्यास मनाई करू शकत नाहीत:

आपण विचार करत असाल कि हे कसे काय शक्य आहे तर हो आपल्याला कोणतेही हॉटेल्स पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह वापरण्यास मनाई करू शकत नाही, मग ते हॉटेल पंच तारांकित का असो !

भारतीय सिरीज कायदा १८८७ नुसार हा नियम बनविल्या गेला आहे.

३) महिला आपली तक्रार इमेल च्या माध्यमातून करू शकतात:

महिलांच्या सुरक्षितेला पाहता जर एखादी महिला पोलीस स्टेशन ला जाण्यास असमर्थ असेल तर ती आपली तक्रार इमेल द्वारे करू शकते.

तसेच महिला ह्या आपली तक्रार पोस्टाने सुद्धा करू शकतात.

 ४) सिलेंडर ब्लास्ट झालाच तर आपल्याला ४० लाख चा क्लेम मिळू शकतो:

जर स्वयंपाक करतेवेळी आपल्या सिलेंडर चा ब्लास्ट झाला तर आपण जवळच्या पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवून आपल्या सिलेंडर कंपनीला ती तक्रार दाखवू शकतो.

त्यांनतर आपल्याला जवळ जवळ ४० लाखापर्यंत रक्कम मिळू शकते. 

५) पोलीस हे कधीही ड्युटी वरच असतात:

पोलिसांची ड्युटी अशी आहे कि ते ड्युटीच्या कपड्यांमध्ये असो किंवा नसो तरीही ते नेहमी ड्युटी वरच असतात.

जर आपण कधीही त्यांच्या जवळ तक्रार घेऊन गेलो तरीही ते आपली मदत करू शकतात.

पोलीस अॅक्ट १८६१ मध्ये हा नियम बनविल्या गेला आहे.

६) खरेदी किमतीपेक्षा जास्त किंमत मोजण्याची गरज नाही:

२०१४ च्या कायद्यानुसार कोणताही दुकानदार आपल्या कडून वस्तूच्या खरेदी किमतीपेक्षा जास्त पैसे घेऊ शकत नाही.

हो पण ग्राहक वस्तूच्या खरेदी किमतीचा मोलभाव करू शकतो.

ज्यामध्ये तो खरेदी किमतीपेक्षा कमी किंमत मोजू शकतो. तर, पुढच्या वेळेस आपण कधीही खरेदी करायला जाणार तर हि गोष्ट लक्षात असुद्या.

७) कोणत्याही गर्भवती महिलेला कामावरून काढता येत नाही:

कोणतीही कंपनी कोणत्याही गर्भवती महिलेला कामावरून काढू शकत नाही, जर कोणत्याही कंपनीने गर्भवती महिलेला कामावरून काढल्यास, काढणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते.

या कायद्याला १९६१ मधेच बनविल्या गेले होते.

८) तरुण युवक-युवती नातेसंबंधात सोबत राहू शकतात:

वयाचे अठरा वर्ष पूर्ण झालेले तरुण-तरुणी आपल्या संमतीने नातेसंबंधात राहू शकतात.

२००५ मध्ये या कायद्याला मान्यता मिळाली होती. सोबतच त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत ते त्यांचा हिस्सा सुद्धा मागू शकतात. 

९) ट्राफिक पोलीस आपल्या गाडीची चावी काढू शकत नाहीत:

भारतीय वाहन नियमामध्ये अनुच्छेद १२८ आणि १२९ नुसार आपण दुचाकीवर विना हेल्मेट सावरी करू शकत नाही, तसेच एका दुचाकीवर दोन पेक्षा जास्त सवारी चालवू शकत नाही, परंतु जर ट्राफिक पोलिसांनी आपल्याला काही कारणस्तव पकडले.

तर ते आपल्यावर जबरदस्ती करू शकत नाही तसेच आपल्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही.

असे केल्यास आपल्याला अधिकार आहे, कि आपण त्यांच्या विरोधात तक्रार करू शकतो. असे वाहन नियम कायदा सांगतो. 

१०) रेकोर्ड केलेले संभाषण न्यायालयात पुरावा म्हणून मान्य असेल:

पुरावा म्हटलं कि आपल्याला न्यायालय आठवते, कधी कधी होते असे कि समोरचा व्यक्ती त्याच्या शब्दांवर ठाम राहत नाही, आणि तो आपण चुकीचे आहोत हे दाखवण्याचे प्रयत्न करतो, तेव्हा आपण त्या व्यक्ती मधील आणि आपल्यामधील झालेले संभाषण हे पुरावा म्हणून न्यायालयाला देऊ शकतो.

आणि तो पुरावा न्यायालयाला मान्य सुद्धा करावा लागतो.

तर आपण आज या लेखात काही नियम तसेच कायदे पाहिले जे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

आपल्याला या लेखातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत पोहचवून त्यांना हि या नियमांविषयी कळवायला विसरू नका.

तसेच सोबतच आपला अभिप्राय सुद्धा द्यायला विसरू नका जेणेकरून आम्ही आमच्यात सुधार करू शकू.

Thank You!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top