कधी विचार केला का? रस्त्याच्या बाजूला असणारे दगड वेगवेगळ्या रंगांचे का असतात बरे!

 Indian Highway Milestone Colour Codes

मित्रहो, 

शीर्षक वाचल्यावरच आपल्याला कळल असेल कि या लेखात आपल्याला काही तरी नवीन शिकायला मिळणार आहे. हो खरच बऱ्याच लोकांना या विषयी माहिती नाही. कि, का बर रस्त्याच्या बाजूला असणारे दगड वेगवेगळ्या रंगांचे असतात?  त्यामुळे काय फायदा होत असेल बरे?  या लेखावर भेट दिल्या नंतर आपल्या मनात असेच काही प्रश्न आले असतील. कारण आपण आजपर्यंत या विषयी कुठ ऐकलेले सुद्धा नाही.

तर मग चला जाणून घेऊया! या मागचे दडलेलं रहस्य! कि का बरे रस्त्याच्या बाजूला असणारे दगड वेगवेगळ्या रंगांचे असतात. (Indian Road Milestone)

कधी विचार केला का? रस्त्याच्या बाजूला असणारे दगड वेगवेगळ्या रंगांचे का असतात बरे! – Why Indian Highways have Coloured Milestones

Indian Road Milestone

मित्रांनो,

पूर्ण भारतामध्ये ५६ लाख किलोमीटर अंतर असलेले रस्त्यांचे जाळे आहे. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, शहरी रस्ते, आणि ग्रामीण रस्ते या सगळ्या रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळेच एवढ्या सगळ्या रस्त्यांमधील फरक लक्षात राहावा त्यासाठी विशिष्ट रंगाचे दगड रस्त्याच्या कडेला ठेवलेले असतात. 

पण आता आणखी एक प्रश्न आपल्या मानत आला असेल कि कोणत्या रंगाचा दगड काय दर्शवण्याचे काम करतो ? 

तर चला त्याविषयी सुद्धा जाणून घेऊया! 

१) पिवळ्या रंगाचे दगड – Yellow milestone

जर तुम्ही राष्ट्रीय महामार्गाने कधी प्रवास केला असेल तर तुम्हाला या दगडांना पहावयास मिळाले असेल, पिवळ्या रंगाचे दगड हे, दर्शवण्याचे काम करतात कि तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत आहात.

याचा फायदा त्या प्रवाशांना होत असतो जे एखाद्या भागात प्रवासाला नवीन गेलेले आहेत.

(उदा. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग या महामार्गावर आपल्याला ह्या प्रकारचे दगड पाहायला मिळतील.)

२) हिरव्या रंगाचे दगड – Green milestone

राष्ट्रीय महामार्ग हे राज्य महामार्गांशी जुळलेले असतात. ते वेगवेगळ्या शहरांना एकमेकांशी जोडण्याचे काम करतात. ज्याप्रमाणे पिवळ्या रंगाचे दगड राष्ट्रीय महामार्गाला दर्शवितात त्याप्रमाणे हिरव्या रंगाचे दगड राज्य महामार्गांना दर्शविण्याचे काम करतात.

म्हणजे जर प्रवास करताना आपल्याला हिरव्या रंगाचे दगड दिसतील तर समजून जायचे कि आपण राज्य महामार्गावरून प्रवास करत आहोत. आणि या सगळ्या राज्य माहामार्गाच्या बांधकामाचे काम हे राज्य आणि केंद्र सरकार मिळून करत असते.

३) निळ्या किंवा काळ्या रंगाचे दगड – Blue or Black Milestone

प्रवास करतांना बरेचदा तुम्हाला रस्त्याच्या बाजूला अंतर दाखविणारे निळ्या आणि काळ्या रंगाचे दगड दिसले असतील. निळ्या आणि काळ्या रंगाचे दगड हे दर्शवत असतात कि आपण जिल्हा आणि तालुक्याच्या रस्त्यावर प्रवास करत आहे. या रस्त्यांची काळजी घ्यायचं काम जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाचे असते.

४) तांबड्या रंगाचे दगड – Orange Milestone

अश्या प्रकारचे दगड आपल्याला ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला पाहायला मिळतील. या रस्त्यांच्या बांधकामाची जबाबदारी हि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार करत असते. ग्रामीण सडक योजनेला दर्शवण्याचे काम सुद्धा तांबड्या रंगाच्या पट्ट्यांद्वारे केल्या जाते.

या लेखावरून आपल्याला कळल असेल कि का अश्या वेगवेगळ्या प्रकारचे दगड रस्त्यांच्या कडेला असतात. तुम्ही तर जाणून घेतले आता तुमच्या मित्रांना आश्चर्यचकित करण्यासाठी त्यांच्यापर्यंत सुद्धा हि माहिती पोहचवा. आणि अश्याच नवीन नवीन लेखांसाठी आमच्याशी कनेक्ट रहा.

YouTube video

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top