माहिती आहे का? गाड्यांवर असणाऱ्या लोगो च्या मागचे रहस्य काय आहे!

Cars Logo Mahiti 

आपण बरेचदा रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांवर पाहतो कि वेगवेगळ्या प्रकारचे लोगो असतात, काय कारण असेल बर त्या मागचे कधी विचार केला का?नाही न तर चला आज जाणून घेवूया त्यामागची कारणे.

तर चला सुरुवात करुया…

“जाणून घ्या गाड्यांवर असणाऱ्या लोगो च्या मागचे रहस्य काय आहे?” –  Information about Car Logo in Marathi

Information about Car Logo

गाड्यांवर असणाऱ्या लोगोची माहिती – Information About Logos on Cars

१) Audi Car logo

बरेचदा आपण चार रिंग चा लोगो असणारी गाडी पाहिली असेल, तसेच पाहिल्यावर आपल्याला माहीतच होते कि हि ऑडी ची कार आहे.

काय असेल बर त्या चार वर्तुळासारख्या लोगोच्या मागचे कारण माहिती आहे का?

त्या चार वर्तुळासारख्या लोगो ठेवण्याच्या मागचे कारण असे आहे कि, ऑडी हि कंपनी चार वेगवेगळ्या कंपन्यांना एकत्र करून बनलेली आहे, आणि त्या चार कंपनी ( ऑडी, हॉर्च, डीकेडब्ल्यू आणि वांडरर ) एकत्र आलेल्या असल्या मुळे त्या कंपनीच्या लोगो मध्ये चार वर्तुळे एकत्र आले आहेत हे दाखवले आहे.

२) BMW Car Logo

BMW ह्या कंपनीला विमानाचे इंजिन बनविण्यासाठी बनविले होते, या कंपनीच्या मालकांची पहिली कंपनी पहिल्या विश्व युध्यामुळे बंद पडली होती, आणि त्या कंपनीचा मिळता जुळता लोगो BMW साठी घेण्यात आला होता,आणि BMW मध्ये असणारा पांढरा भाग आणि निळा भाग हा त्यांच्या देशाच्या ध्वजाच्या रंगामधून घेण्यात आला आहे.  BMW चा फुल फॉर्म असा आहे,  Bayerische Motoren Werke.

३) Mercedes Car Logo

मर्सिडीज एक अशी कार आहे ज्या कारचे नाव प्रत्येकाच्या कानावर पडले असेलच, ते गमतीच्या माध्यामातून किंवा आणखी कोणत्या जसे मित्रांमध्ये गप्पा होतात तेव्हा किंवा एख्याद्या गाडीची तुलना करताना होय.

पण मर्सिडीज गाडीच्या लोगोच्या मागचे काय रहस्य असेल बर, तर ते असे कि सुरुवातीला मर्सिडीज चा लोगो हा आताच्या लोगो सारखा नव्हता, मर्सिडीज चा अर्थ होते आनंद आणि लोगो चा अर्थ असा होतो कि पाणी, हवा, आणि जमीन ह्यांच्यावर वर्चस्व असल्याचे हा लोगो दर्शवतो.

४) Lamborghini Car Logo

लॅम्बोर्गिनी हि कंपनी सुरुवातीला ट्रॅक्टर्स बनवत होती, लॅम्बोर्गिनी च्या कंपनीचे मालिक फेरूक्रिओ लॅम्बोर्गिनी यांच्या नावावरून ह्या गाडीचे नाव लॅम्बोर्गिनी पडले.

तसेच लॅम्बोर्गिनी चा लोगो हा त्यांच्या राशीवरून त्यांनी ठेवला होता, त्यांची वृषभ राश असल्याने त्यांनी त्यांच्या कंपनीचा लोगो हा त्यांच्या राशीला दर्शवणाऱ्या बैलाच्या चित्रात ठेवला.

५) Ferrari Car Logo

फेरारी गाडीविषयी तर सर्वांना माहितीच असेल, ज्या गाडीवर एक असा लोगो असतो ज्यामध्ये एक घोडा दिसून येतो ज्याच्या मागे पिवळ्या गडद रंग असतो, फेरारी कंपनीचे मालिक लोगो विषयी सांगताना.

बोलतात पहिल्या विश्वयुध्यामधील एका जेट फायटर सैनिकाच्या आई वडिलांना जेव्हा भेटलो, तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाच्या कपड्यांवरील घोड्याचा लोगो माझ्या कंपनीच्या कार वर लावायची शिफारस केली आणि सांगितले कि हा लोगो तुला प्रगती देईल, तेव्हापासून फेरारी चा लोगो तसाच आहे.

६) Hyundai Car Logo

 ह्युंदाई मोटर कंपनी हि दक्षिण कोरिया ची एक कंपनी आहे, आपल्याला ह्या कंपनीच्या लोगो विषयी तर माहितीच असेल, आणि आपल्याला वाटत असेल त्यात काय नवीन आहे ते तर कंपनीच्या सुरुवातीच्या नावाचा “H” आहे.

परंतु नाही तसे नाही, त्या “H” सोबत आपण जर व्यवस्थित बघितले तर आपल्याला दिसून येईल कि दोन व्यक्ती एकमेकांना हस्तांदोलन करताना दिसत आहेत, ज्यामध्ये ह्युंदाई कंपनी आपल्या ग्राहकाशी हस्तांदोलन करताना आपल्या प्रतिनिधी सोबत दाखवत आहे.

७) Toyota Car Logo

टोयोटा कंपनीची स्थापना १९३७ मध्ये जपान येथे झाली होती.

टोयोटा हि जपान ची प्रसिद्ध कार कंपनी आहे, ह्या कंपनीच्या लोगो ला आपण जर लक्ष पूर्वक पाहिले असता, आपल्याला दिसून येईल कि एका सुई मध्ये धागा टाकताना जी प्रतिमा तयार होते तसे चित्र समोर येईल.

कारण टोयोटा हि सुरुवातीला धागे बनवणारी कंपनी होती, त्यामुळे त्यांच्या लोगो मध्ये अश्या प्रकारचे चित्र पाहायला मिळते, सोबतच जर लोगोच्या प्रत्येक भागाला वेगळे केले तर टोयोटा कंपनीचे नाव हि आपल्याला बनताना दिसते.

आशा करतो आपल्याला आजच्या लेखाच्या माध्यमातून ज्ञानात भर पडली असेल.

आपल्याला आजचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका,मी अश्याच प्रकारे माहितीपर लेख आपल्या साठी घेऊन येत राहील,धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top