अवाक् व्हाल भारतातील या 25 गोष्टी वाचून

Interesting Facts About India

मंडळी महान अमेरिकन साहित्यिक मार्क तवाईन असं म्हणतो,

भारत ही एक अशी भूमी आहे ज्यात भाषेचा जन्म झाला…

या भूमीला इतिहासाची आई म्हंटल्या जातं, महान लोकांची कर्मभूमी, परंपरेची मातृभूमी तसंच मौल्यवान वस्तूंची खाण असलेली ही भूमी आहे या भुमीने हजारो लाखो भूमिपुत्रांना जन्म दिलाय, या भारताचे वर्णन माझ्या शब्दांपलीकडचे आहे.

त्याने केलेल्या वर्णनाला या लेखातून मांडण्यात आलेल्या २५ विस्मयकारक गोष्टींनी विश्वासाहर्ता प्राप्त होते.

अवाक् व्हाल भारतातील या 25 गोष्टी वाचून – Amazing Facts On India

Interesting Facts About India

 • पाण्यावर तरंगते पोस्ट ऑफिस:

शीर्षक वाचून दचकलात ना? हो हे खरे आहे!

संपूर्ण जगात भारतातील पोस्टाचे नेटवर्क हे सर्वात मोठे आणि विशाल आहे. पोस्टाचे हे जाळे तब्बल 1,55,015 डाक घरांनी व्यापलेले आहे. तुम्हाला पाण्यावर तरंगणारे पोस्ट ऑफिस पहायचे असेल तर तुम्हाला श्रीनगर ला जावे लागेल. हो! कारण पाण्यावर तरंगणारे डाक घर श्रीनगर येथील दल सरोवरात 11 ऑगस्ट 2011 साली सुरु झाले.

 • उपग्रहाने (Satelight) घेतलेले अतिभव्य कुंभमेळ्याचे छायाचित्र:

2011 साली हरिद्वार येथे भरलेल्या कुंभमेळ्यात आजवरची सगळ्यात जास्त यात्रेकरूंची आणि भाविकांची गर्दी अनुभवायला मिळाली.

तब्बल 75 Million (साडेसात करोड) भाविक या कुंभमेळ्यात स्नानाकरता एकत्र आले होते. हे छायाचित्र उपग्रहाने घेण्यात आले आहे.

 • विश्वात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण मावसिनराम:

मेघालयातील खासी टेकड्यांमधील एक छोटेसे गाव मावसिनराम सर्वाधिक पाऊस पडल्याने जगाच्या नकाशावर प्रसिद्ध झाले आहे. चेरापुंजी हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण देखील मेघालयातच आहे. 1861 साली येथे अत्याधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

 • पृथ्वीच्या परिघाला गुंडाळण्यास पुरतील एवढ्या स्टील वायर्स वापरण्यात आलेले पहिले ठिकाण बांद्रा वरळी सी-लिंक!:

बांद्रा-वरळी सी-लिंक करता तब्बल 2,57,00,000 इतके तास कामगारांचे श्रम  लागले, तर 50,000 अफ्रिकन हत्तींच्या वजनाइतक्या तारा या कामाकरता वापरण्यात आल्या. हे स्वप्नं सत्यात उतरविण्याचं खरं श्रेय इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट मंडळींचच!

 • जगातील सर्वात उंचीवरचे क्रिकेट मैदान:

तुम्हाला जमिनीपासून तब्बल 2,444 मीटर उंचीवर क्रिकेट खेळायचंय का? अहो मी याकरता विचारतोय कारण असे मैदान आपल्या भारतातच आहे.

हो! आणि याकरता तुम्हाला जावे लागेल हिमाचल प्रदेशातील छैल येथे. या मैदानाचे नांव लक्षात ठेवा, छैल क्रिकेट ग्राउंड छैल. 1893 ला हे बांधण्यात आले असून हे मैदान छैल मिल्ट्री स्कूल चा भाग आहे.

 • शाम्पू हा तर खरा भारतीय शोध:

अहो खरंच सांगतोय! अगदी बाजारात कमर्शीयली विकल्या जाणाऱ्या शाम्पू बद्दल जरी मी बोलत नसलो तरी नैसर्गिक शाम्पू हा भारतानेच शोधला. आणि शाम्पू हा शब्द संस्कृत भाषेतील ‘चंपू’ या शब्दावरून घेण्यात आला आहे. ज्याचा अर्थ मसाज करणे असा होतो.

 • भारतातील राष्ट्रीय कबड्डी संघाने जिंकले आजवरचे सगळे विश्व-कप:

भारताने आजतागायत झालेले 5ही पुरुष कबड्डी विश्वकप जिंकले असून सगळ्या कबड्डीच्या स्पर्धांमध्ये भारत अजिंक्य ठरला आहे. याशिवाय भारतीय महिला कबड्डी संघाने देखील आजवरचे सर्व विश्वकप जिंकलेले आहेत.

 • चंद्रावर पाणी असल्याचा शोध सर्वप्रथम लावला भारताने:

सप्टेंबर 2009 मध्ये भारताच्या Isro Chandrayaan-1 मोहिमेत Moon Mineralogy Mapper ने चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा सर्वप्रथम शोध लावला.

 • स्वित्झर्लंड आजही भारताच्या माजी राष्ट्रपतींच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा करतो विज्ञान दिवस:

भारताच्या मिसाईलचे जनक माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी 2006 साली स्वित्झर्लंड ला भेट दिली होती. त्या भेटीने प्रभावित झालेल्या स्वित्झर्लंडने 26 मे हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले.

 • स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती स्वीकारत असत पगाराच्या केवळ 50% रक्कम:

डॉक्टर राजेंद्र प्रसाद ज्यावेळी भारताचे राष्ट्रपती झाले त्यावेळी ते आपल्या पगाराच्या केवळ 50 टक्के रक्कम घेत असत. यापेक्षा अधिक रक्कम आपल्याला नको असे त्यांनी जाहीर केले होते.

आपल्या 12 वर्षांच्या कार्यकाळानंतर त्यांनी पगाराच्या केवळ 25% रक्कमच स्वीकारली. त्यावेळी राष्ट्रपतींचा पगार हा 10,000 रुपये एवढा होता.

 • चक्क सायकल वरून नेण्यात आले भारतातील पहिले रॉकेट:

भारतातील पहीले रॉकेट हे आकाराने लहान आणि वजनाने हलके असल्याने त्याला नेण्याकरता सायकल सोयीची ठरली.

केरळ राज्यातील तिरुवनंतपूरम येथे थूंबा या लॉन्चींग स्टेशन (Space Center) ला हे रॉकेट ही व्यक्ती किती सहजतेने घेऊन गेली पाहिलंत नं!!!

 • भारतातील हत्तींसाठी असलेले एकमेव स्पा:

आपण स्पा या नावाने जेवढे खुश होतो तितकेच त्यातील महागड्या किमती ऐकून तेथे जाण्यास धजावत सुद्धा नाही.

पण जर मी म्हंटल हत्तींकरता आपल्या भारतात स्पा उघडले आहे तर तुम्ही म्हणाल वा! मजा आहे हत्तींची …

हा स्पा सुरु करण्यात आलाय केरळ राज्यातील पुन्नथुर कोट्टा एलिफंट यार्ड रिजुव्हिनेशन सेंटर मधे.

बरं कां मंडळी, या स्पा सेंटर मधे हत्तींना उत्तम अंघोळ, मालिश, आणि भरपूर अन्न देण्यात येतं.

आपल्या देशाने हत्तींसाठी हे एक मोठं पाऊल उचललं आहे.

 • भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा इंग्लिश बोलणारा देश आहे:

चकित झालात नं ! हो अमेरिकेनंतर भारत हा इंग्लिश बोलणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतातील जवळजवळ साडे बारा करोड लोक बोलण्यात इंग्रजीचा वापर करतात.

येत्या काळात हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

 • जगात सर्वाधिक शाकाहारी भारतात:

धार्मिक कारणांमुळे असो किंवा आपापल्या आवडी-निवडीनंमुळे असो पण जगाच्या पाठीवर सर्वाधिक शाकाहारी हे भारतात आहेत. लोकसंख्येच्या जवळ जवळ 20-40 % लोक हे शाकाहारी आहेत.

म्हणजे आता असे म्हणायला हरकत नाही कि भारत हा शाकाहारी लोकांसाठी अनुकूल देश ठरला आहे.

 • भारत! जगातील सर्वाधिक दुध उत्पादक देश:

भारताने दुध उत्पादनात नुकतेच युरोपियन देशांना मागे टाकले आहे. भारताचे दुध उत्पादन 132.4 मिलियन टनांपर्यंत पोहोचले आहे.

 • साखर वापरणारा पहिला देश ठरलाय भारत:

भारत हा साखरेचे निष्कर्षण आणि शुद्धीकरण तंत्र विकसित करणारा पहिला देश ठरला आहे. अनेक विदेशी नागरिक साखरेचे शुद्धीकरण तंत्र आणि साखरेच्या निर्मिताचा अभ्यास करण्याकरता भारताला भेट देत असतात.

 • भारतीय महिला कॅल्क्युलेटर:

शकुंतला देवी या भारतातील मानवी कॅल्क्युलेटर म्हणून ओळखल्या जातात. त्याचे कारण देखील तसेच अनोखे आहे. 13 आकडी संख्येच्या गुणाकाराचे उत्तर त्या अवघ्या 28 सेकंदात अचूक देतात. असे व्यक्तिमत्व भारतात आहेत हि आपल्या देशाकरता अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे.

 • रवींद्रनाथ टागोर यांनी बांगलादेशाकरिता सुद्धा राष्ट्रगीत लिहिल:

रवींद्रनाथ टागोर यांनी केवळ जन गन मन हे भारताचे राष्ट्रगीत लिहिले असे नव्हे तर बांगलादेशातील राष्ट्रीय गान आमार सोनार बांगला लिहिण्याचे श्रेय देखील टागोरांनाच जाते.

त्यांच्या योगदानाला पहाता ब्रिटिशांनी त्यांना नाईटहूड सन्मान प्रदान करण्याचे योजले होते, परंतु जालियनवाला हत्याकांडानंतर त्यांनी हा सन्मान नाकारला.

 • ध्यानचंद ला हिटलर च्या वतीनं देऊ करण्यात आलं होतं जर्मन नागरिकत्व:

बर्लिन ऑलंपिक मध्ये जर्मनीचा 8-1 ने पराभव केल्यानंतर ध्यानचंद ला हॉकीतील जादुगार समजल्या जाऊ लागले.

त्याच्या या विजयानंतर हिटलर नं त्याला बोलावणं धाडलं, ध्यानचंदला जर्मनीचं नागरिकत्व, जर्मन सैन्यात उच्च पदावर कार्य करण्याची संधी, आणि जर्मन राष्ट्रीय हॉकी संघाकडून खेळण्याची संधी या गोष्टी देऊ केल्या, पण या भारतीय रक्ताच्या खेळाडूने हे सगळे आमीष आपल्या भारताकरता धुडकावून लावले.

 • फ्रेडी मरक्यूरी आणि बेन किंग्सले हे मूळ भारतीय वंशाचे:

विदेशात प्रसिद्ध असलेल्या ‘क्वीन’ या रॉकबँड चा सुप्रसिद्ध गायक फ्रेडी मरक्यूरी हा मूळ भारतीय वंशाचा असून पारशी कुटुंबातला आहे. त्याचे खरे नांव फारुख बुलसारा असे आहे.

शिवाय प्रसिद्ध ऑस्कर विजेता हॉलीवूड अभिनेता बेन किंग्स्ले हा देखील भारतीय असून त्याचे मूळ नाव क्रिश्ना पंडित भांजी हे होय. आश्चर्य वाटले नां! अहो आहेच आपला भारत आगळा वेगळा …

 • अंतराळवीर राकेश शर्मा म्हणतात सारे जहां से अच्छा:

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंतराळात गेलेले पहिले भारतीय राकेश शर्मा यांना हा प्रश्न विचारला होता “अवकाशातून आपला भारत कसा दिसतो” त्यावर राकेश शर्मा उद्गारले “सारे जहां से अच्छा”…

 • हेवेल ही पूर्णतः भारतीय कंपनी असून मूळ मालकाच्या नावावरून पडले हेवेल हे नांव:

हेवेल ही भारतीय कंपनी बऱ्याच वर्षांपूर्वी अवघ्या दहा लाख रुपयांमध्ये विकत घेण्यात आली होती, आणि आज हि अब्जावधी इलेक्ट्रिकल वस्तू बनविणारी कंपनी म्हणून अवघ्या जगात प्रसिद्ध आहे.

या कंपनीचे नाव आजही मूळ मालक हवेली राम गुप्ता यांच्या नावामुळेच हेवेल असे आहे.

 • सर्वप्रथम भारतात सापडले हीरे:

मौल्यवान असे हीरे अगदी सुरुवातीला भारतातील गुंटूर व क्रिष्णा जिल्ह्यातील क्रिश्ना नदीच्या तीरावर डेल्टा इथं सापडले.

त्यानंतर 18 व्या शतकात ब्राझील इथं हीरे गवसले, पण हिऱ्यांच्या उत्पादनात भारताने जगाचे नेतृत्व केले आहे.

 • गिर च्या जंगलात निवडणुकी दरम्यान केवळ एका व्यक्तीकरता उभारले जाते मतदान केंद्र:

आहे नं आश्चर्यकारक! पण खरं आहे… अहो महंत भरतदास दर्शनदास हे गुजरात राज्यातील सिंहा करता प्रसिद्ध असलेल्या गीरच्या घनदाट जंगलात बाणेज येथे एकटे रहातात आणि 2004 पासून ते मतदान करीत आहेत.

या एकमेव मतदाराकरिता प्रत्येक निवडणुकी दरम्यान खास मतदान केंद्र उभारण्यात येतं.

 • सगळ्यांना आवडणाऱ्या सापशिडी खेळाचा शोध भारतात लागलाय:

Snakes & Ladders या खेळाला फार पूर्वी मोक्षा पटामु म्हणून ओळखले जायचे आणि लहान मुलांना आपले कर्म चांगले आणि नैतिक असावेत असा बोध या खेळातून देण्याचा उद्देश होता.

पुढे या खेळाला कमर्शिअल स्वरूप प्राप्त झाले आणि हा जगातील सर्वाधिक आवडणाऱ्या खेळांमधील एक झाला.

आशा आहे की आपणास “Interesting Facts About India” याविषयी हा लेख आवडला असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर कृपया फेसबुकवर शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top