पर्यटकांचा खर्च उचलणार या देशाची सरकार, कोरोनाच्या प्रभावामुळे जाहीर केली नवीन स्कीम

Japanese Government Scheme

संपूर्ण जगाच्या देशांमध्ये कोरोनाची दहशत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि प्रत्येक देशाने आपापल्या परीने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत, तरीही बऱ्याच ठिकाणी या विषाणूमुळे हजारो लोकांचा जीव गेलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील प्रत्येक सरकार गोरगरिबांसाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे सुविधा लागू करत आहे, आणि या संकटातून देशाला आणि जगाला बाहेर काढण्यासाठी आपापल्या परीने मदत करत आहेत, याच दरम्यान जपान सरकार ने पर्यटकांसाठी एक नवीन स्कीम जाहीर केली.

जपान सरकार ची पर्यटक लोकांसाठी योजना – Japan Government skim for Tourism 

Japan Government skim for Tourism 
Japan Government skim for Tourism

संपूर्ण जगात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असल्याने प्रत्येक देशाने लॉकडाऊन ला लागू केलेलं आहे आणि लॉकडाऊन मुळे कोणालाही घराच्या बाहेर जाता येत नाही आहे. आणि लॉकडाऊन संपल्या नंतर सुध्दा बरेच पर्यटक फिरायला जाण्यापासून वाचतील पण याच गोष्टीला लक्षात घेत जपान सरकार ने पर्यटक लोकांसाठी एक नवीन स्कीम तयार केली आहे, ज्या स्कीम मध्ये पर्यटक लोकांना आपल्या देशामध्ये पर्यटनासाठी आकर्षित करण्यासाठी एक नवीन स्कीम घेऊन आले आहेत.

या स्कीम मध्ये जपान सरकार त्यांच्या देशात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनासाठी येणाऱ्या खर्चाचा अर्धा खर्च जपान सरकार देणार आहे आणि या साठी जपान सरकारने १८.३ बिलियन डॉलर खर्च करण्याचे ठरविले आहे. आणि तेथील टूरिस्ट एजन्सीज ना या बाबतीत पूर्णपणे खात्री आहे की त्यांच्या देशात पर्यटक या स्कीम मुळे आकर्षित होतीलच.

द जपान टाइम्स च्या रिपोर्टच्या माहितीनुसार या स्कीम ला जुलै च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू केल्या जाऊ शकते. आताच्या परिस्थिती मध्ये संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे आता जपान मध्ये पर्यटक लोकांना पर्यटनासाठी बंदी घातलेली आहे. पण लवकरच या बंदीला हटवून ह्या स्कीम ला लागू करण्यात येईल असे संकेत जपान च्या या “द जपान टाइम्स” कडून दिल्या गेले आहेत. दिनांक २५ मे ला जापान मधील एमर्जन्सी हटवण्यात आली होती. त्यांनंतर जपान च्या टूरिज्म एजेंसी ने ह्या पॅकेज ची घोषणा केली.

जपान मध्ये मोठया प्रमाणात लोक घरून काम करत आहेत. लॉकडाऊन मुळे तेथील सर्व शाळा, कॉलेजेस बंद आहेत, आणि एमर्जन्सी हटवल्या नंतर जपान च्या रेल्वे स्टेशनांवर गर्दी दिसून आली होती. जापान मध्ये कोरोनाचे १६,६२८ च्या वर रुग्ण आढळून आले आहेत, आणि जपानमध्ये ८५० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

शिंजो आबे यांनी जपानमधील एमर्जन्सी हटवताना सांगितले की एमर्जन्सी हटवणे म्हणजे कोरोनाचा नाश झाला असे नाही किंवा आपल्या देशातून हा आजार गेला असेही नाही. पण बऱ्याच प्रमाणात जपानने कोरोनावर मात केली त्यांनी बोलताना असे सांगितले आणि त्यांनी त्यांच्या देशात पर्यटक लोकांसाठी काढलेल्या या नवीन योजनेचे जगभरातून कौतुक केल्या जात आहे. यामुळे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण न येता पर्यटक त्यांच्या देशात एक प्रकारचा निवेश घेऊन येतील. आणि त्यामुळे जपान ची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. असे जाणकार लोकांचे म्हणणे आहे.

तर अश्याच नवनवीन बातम्यांच्या विश्लेषणासाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत. अश्याच प्रकारच्या बातम्यांच्या विश्लेषणासाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here