गुणकारी ज्येष्ठमध ची माहिती आणि फ़ायदे

Jeshthamadh Information in Marathi

ज्येष्ठमध ही वनस्पती आपल्या सर्वांच्याच वापरण्यात येते. कारण ज्येष्ठमधची नुसती काडी दाताने चावली की खायला ती गोड लागते. आयुर्वेदात उपयोगी असणारी, नेहमी वापरात असणारी औषधी वनस्पती म्हणजे ज्येष्ठमध होय. तसेच ज्येष्ठमध याचा अनेक प्रकारे याचा वापर करण्यात येतो. आणखी बरीच काही माहिती आहे, जे आपण समोर बघणार आहोत.

गुणकारी ज्येष्ठमध ची माहिती आणि फ़ायदे – Jeshthamadh Benefits in Marathi

Jeshthamadh Benefits in Marathi
Jeshthamadh Benefits in Marathi
शास्त्रीय नाव : (ग्लिसराइज ग्लॉब्रा) Glycerrhiza glabra
इंग्रजी नाव : (स्विट वूड) Sweet wood
प्रकार : जलज आणि स्थलज.

ज्येष्ठमध ची माहिती – Jeshthamadh Information in Marathi

ज्येष्ठमध हे झुडूपवर्गात मोडते. हे सर्वसाधारण १ ते ४ मीटर ऊंच असे वाढते. या झाडाचे मूळ हे आकाराने लांबट, पिवळे किंवा राखाडी लालसर रंगाचे असते. हेच खोड औषधी म्हणून वापरण्यात येते. या झुडपाची पाने ही अंडाकृती असतात. या झाडाची फुले हे गुलाबी रंगाची असतात. या झाडाला सुमारे २ ते ४ सें.मी. लांबीच्या चपट्या शेंगा येतात, तीच फळे असतात. त्यात किडनीच्या आकाराच्या २ ते ४ बिया सुद्धा असतात.

लागवड :

ज्येष्ठमध या वनस्पतीची लागवड इराण, अफगाणिस्तान, मध्य आशिया, चीन, अरबस्तान येथे प्रामुख्याने केली जाते. अलिकडे मात्र पंजाब, पेशावर या भागांत सुद्धा याचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेतले जाते.

ज्येष्ठमधाचे विविध उपयोग – Jeshthamadh Uses in Marathi

 • ज्येष्ठमध बाहेरून लावण्यासाठी वापरतात.
 • जसे की केस गळणे, कमी होणे केस पिकणे या सर्व गोष्ठीसाठी ज्येष्ठमधाचा काढा करून केस धुवावेत.
 • एखादया धारदार वस्तूने कापल्यास झालेली जखम भरून येण्यासाठी, वेदना कमी होण्यासाठी, ज्येष्ठमध व साजूक तूप यांचा लेप करून लावल्यास आराम मिळतो.
 • शरीरावर मार लागून सूज आली असता वेदना व सूज कमी होण्यासाठी ज्येष्ठमधाच्या काड्या उगाळून तो लेप त्या भागावर लावला की छान असा आराम मिळतो.

औषधी उपयोग :

 • ज्येष्ठमधाचा उपयोग आयुर्वेदात केला जातो.
 • दीर्घ काळाचा खोकला, सर्दी, पित्त यांवर औषधी म्हणून ज्येष्ठमध हे वापरले जाते. आपला आवाज बसला असेल तर ज्येष्ठमधाचे चूर्ण तुपात मिसळून ते पोटात घेतल्यास आराम मिळतो.
 • कफ झाला असेल तर ज्येष्ठमधाच्या काड्यांचा काढा करून त्यात मध व खडीसाखर घालून प्यावे.
 • सारखी तहान लागत असेल तर ज्येष्ठमधाचा काढा घेतल्यास उपयुक्त ठरतो.
 • मळमळ, आम्लपित्त, अल्सर या रोगांवर ज्येष्ठमधाची मुळी ही खूप अशी उपयुक्त आहे.
 • उचकी लागली तर याचे चूर्ण मधातून दयावे.
 • ज्येष्ठमधाची काडी नुसती दाताने चावली असता त्यातून जो रस निघतो, तो चवीला छान असा गोड लागतो.
 • खोकला लागल्यावर सारखा ठसका लागत असेल तर ज्येष्ठमधाची काडी ही दाताने चांगली चावावी म्हणजे ठसका थांबतो.
 • तसेच त्वचा उजळ होण्यासाठी याचा लेप त्वचेवर लावावा. त्याने त्वचा ही छान उजळते.
 • नेत्रविकारात म्हणजे चष्मा लागला असेल तर ज्येष्ठमधाचा वापर करतात.
 • ज्येष्ठमध ही एक खूप अशी उपयुक्त वनस्पती आहे. आयुर्वेदात तिचा उपयोग यष्ट्यादि चूर्ण, यष्ट्यादि पाक इत्यादीचा कल्प करण्यासाठी केला जातो.

इतर माहिती :

ज्येष्ठमध या वनस्पतीचे मूळ हे औषधी म्हणून वापरले जाते. तसेच या मुळांची वरची साल काढल्यावर आतमध्ये रेषायुक्त जो गाभा असतो, तो औषधी म्हणून वापरण्यात येतो. ज्येष्ठमध ही वनस्पती नावाप्रमाणे चवीलासुद्धा फार गोड लागते.

ज्येष्ठमध विषयीची विचारली जाणारी काही प्रश्न – FAQ about Jeshthamadh

1. ज्येष्ठमध या वनस्पतीची लागवड कश्या प्रकारे केली आहे ?
उत्तर – ज्येष्ठमध या वनस्पतीची लागवड इराण, मध्य आशिया, चीन, अफगाणिस्तान, अरबस्तान येथे प्रामुख्याने केली जाते. तसेच पंजाब, पेशावर या भागांत याचे उत्पादन घेतले जाते.

2. ज्येष्ठमधचे शास्त्रीय नाव काय आहे ?
उत्तर – ज्येष्ठमधचे शास्त्रीय नाव (ग्लिसराइज ग्लॉब्रा) Glycerrhiza glabra असे आहे.

3. ज्येष्ठमध मध्ये कोणकोणते प्रकार आहेत ?
उत्तर – ज्येष्ठमध मध्ये जलज ज्येष्ठमध आणि स्थलज ज्येष्ठमध असे दोन प्रकार आहेत.

4. ज्येष्ठमधची कोणकोणती नावे आहेत ?
उत्तर – ज्येष्ठमधची नावे ज्येष्ठमध, यष्टीमधू, मधुक, मुलेठी, लिकोराईस इत्यादी आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here