झाशीच्या किल्ल्याची माहिती

Jhansi Killa chi Mahiti

उत्तर भारतातील उत्तर प्रदेशात भंगीरा पहाडावर झाशीचा किल्ला बांधण्यात आला असून 11 व्या शतकापासून ते 17 व्या शतकापर्यंत बलवंत नगरच्या चंदेल राजाचे याठिकाणी साम्राज्य होते.

झाशीच्या किल्ल्याची माहिती – Jhansi Fort Information in Marathi

Jhansi Fort Information in Marathi
Jhansi Fort Information in Marathi

झाशीचा किल्ला ई.स. 1613 मधे ओरछा साम्राज्याचे शासक आणि बुंदेल राजपुतांचे प्रमुख बीरसिंह देव यांच्या नेतृत्वात बांधण्यात आला होता. बुंदेलचा हा सर्वाधिक शक्तिशाली किल्ला होता.

पुढे 1728 साली मोहम्मद खान बंगेश ने महाराजा छत्रसाल वर आक्रमण केले. त्यावेळी मोगल साम्राज्या विरोधात लढण्यासाठी बाजीराव पेशवांनी महाराजा छत्रसाल यांना सहाय्य केले होते.

त्यावेळी बाजीराव पेशव्यांचे आभार व्यक्त करण्याकरता महाराजा छत्रसालांनी त्यांना राज्याचा काही भाग दिला, त्यात झाशी चा समावेश आहे.

त्यानंतर 1742 साली नारोशंकरांना झाशीचा सुभेदार बनविण्यात आले. त्यांनी आपल्या 15 वर्षांच्या कार्यकाळात झाशीचा मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणला.

पेशव्यांनी 1757 ला जेंव्हा नारोशंकर यांना परत बोलावून घेतलं तेंव्हा माधव गोविंद ककीर्डे आणि त्यानंतर बाबूलाल कन्हाई झाशीचे सुभेदार झाले. 1766 ते 1769 पर्यंत विश्वासराव लक्ष्मण यांनी झाशीचे सुभेदार म्हणून सेवा दिली.

पुढे दुसरे रघुनाथराव यांची झाशीचे सुभेदार म्हणून नियुक्ती झाली. रघुनाथराव हे कुशल प्रशासक होते, राज्याची आर्थिक स्थिती त्यांच्या कार्यकाळात मजबूत झाली.

किल्ल्यात महालक्ष्मी मंदिर आणि राम मंदिराची त्यांनी निर्मिती केली. शिवरावाच्या मृत्यूपश्चात त्यांचा मोठा मुलगा रामचंद्र राव झाशीचा सुभेदार झाला.

परंतु तो एक कुशल प्रशासक होऊ शकला नाही, त्याचा मृत्यू 1835 ला झाल्यानंतर त्याचा उत्तराधिकारी असणाऱ्या दुसऱ्या रघुनाथरावाचा मृत्यू 1838 ला झाला.

त्यानंतर ब्रिटीश शासकांनी गंगाधरराव नेवाळकरांना झाशीच्या राजाच्या रुपात स्वीकारलं. रघुनाथराव (तिसरे) यांच्या कार्यकाळात झाशीची आर्थिक स्थिती फार कमकुवत झाली होती.

Jhansi Killa chi Mahiti

महाराजा गंगाधरराव नेवाळकरांच्या नेतृत्वात झाशीचा उत्तम विकास झाला. ते एक कुशल प्रशासक होते.

झाशीमधील स्थानिक लोक त्यांच्यावर फार प्रेम करत असत आणि त्यांच्या कार्यावर देखील खूष होते.

1842 साली गंगाधररावांचा विवाह मणिकर्णिका तांबे समवेत झाला…विवाहा नंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले.

1851 साली लक्ष्मीबाईंना मुलगा झाला त्याचे नाव दामोदरराव! परंतु अवघ्या 4 महिन्याचा असतांना या बाळाचा मृत्यू झाला.

त्यानंतर गंगाधरराव यांनी आपल्या भावाचा मुलगा आनंदराव ला दत्तक घेतलं आणि त्याचे नाव बदलून दामोदरराव असे ठेवले. गंगाधररावांच्या मृत्यूपूर्वी एक दिवस अगोदर नाव बदलण्याचा हा विधी पार पडला होता.

हा दत्तकविधी ब्रिटीशांच्या उपस्थितीत पार पडला होता, शिवाय हा आदेश देखील काढण्यात आला की त्यांच्या दत्तक घेलेल्या मुलालाच त्यांचा पुत्र मानल्या जावे आणि त्याला ते सर्व अधिकार बहाल करण्यात यावे जे राजाच्या मुलाला दिले जातात. आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंना राज्याच्या कारभाराची सूत्र बहाल करण्यात यावीत.

नोव्हेंबर 1853 मधे गंगाधरराव यांच्या निधनानंतर गवर्नर जनरल लॉर्ड डलहौजी ने दामोदररावला सत्ता सोपविण्यास नकार दिला आणि राजाला दिले जाणारे हक्क दामोदररावाला देण्यास देखील साफ इन्कार केला.

मार्च 1854 साली राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटीशांना किल्ला आणि महल सोडून जाण्यासाठी 60,000 रुपये देखील दिले होते. 1857 साली मात्र लक्ष्मीबाईंच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी किल्ल्याची जवाबदारी आपल्या हाती घेत ब्रिटीश सरकार विरोधात एल्गार पुकारला.

एप्रिल 1858 साली जनरल ह्यूज च्या नेतृत्वात ब्रिटीश सैन्याने झाशीला चोहोबाजूंनी घेरले.

त्यावेळी राणी लक्ष्मीबाईंनी मोठ्या धैर्याने ब्रिटीश सैन्याचा सामना केला आणि घोड्याच्या मदतीने किल्याच्या बाहेर पडण्यास यशस्वी झाल्या.

1861 साली ब्रिटीश सरकारने झाशी किल्ला आणि शहर ग्वालियर चे महाराज जीयाजीराव सिंधिया यांच्या सुपूर्द केले.

परंतु 1868 मधे ब्रिटीशांनी ग्वालियर राज्यातून झाशी पुन्हा आपल्या ताब्यात घेतली होती.

Jhansi Fort Architecture

झाशीचा किल्ला पहाडावर बनविण्यात आला असून किल्ल्याच्या भिंती ग्रेनाइट पासून बनविण्यात आल्या आहेत.

या भिंती 16 ते 20 फुटापर्यंत जाड आणि भक्कम आहेत.

किल्ल्यात प्रवेशासाठी एखून दहा दरवाजे आहेत…खंडेराव दरवाजा, लक्ष्मी दरवाजा, दतिया दरवाजा, उसीनयर दरवाजा, न्नाव दरवाजा, झरना दरवाजा, सागर दरवाजा, ओरछा दरवाजा, आणि चांद दरवाजा.

किल्ल्याच्या आत शिव मंदिर, गणेश मंदिर, आणि कडक बालाजी मंदिर आहे. या ठिकाणी आज देखील पूजा-अर्चना केली जाते. येते एक स्मारक बोर्ड असून या ठिकाणी राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या घोड्यावरून एक लांब उडी मारली होती. किल्ल्या जवळ आपल्याला राणी महाल देखील पाहायला मिळतो… आज या  महालाला आर्कियोलॉजिकल म्युझियम बनविण्यात आलं आहे.

झाशीचा हा किल्ला जवळ-जवळ 15 एकरात पसरलेला असून जाणकारांच्या मते 312 मीटर लांब आणि 225 मीटर विस्तारलेला आहे.

किल्ल्यात संरक्षणासाठी एकूण 22 मजबूत भिंती बनविण्यात आल्या आहेत.

दोन्ही बाजूंनी खोल दऱ्या आहेत. असं म्हणतात याच्या पूर्वेकडील बांधकाम ब्रिटीशांनी केलं होतं, शिवाय त्यांनी या ठिकाणी एक पंच महाल देखील बनविला होता.

झाशी मोहोत्सव नावाचा उत्सव – Jhansi Mahotsav

दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात येथे झाशी मोहोत्सव नावाचा विशाल उत्सव साजरा करण्यात येतो.

अनेक कलावंत या उत्सवात आपल्या कलेचं प्रदर्शन करतात.

झाशीला कसे पोहोचाल? – How to Reach Jhansi

झाशी मधे हा किल्ला अगदी मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात आला असून संपूर्ण शहर या किल्ल्याभवती विस्तारलेलं आहे.

झाशी रेल्वे स्थानकापासून हा किल्ला 3 की.मी. अंतरावर आहे,

जवळचे विमानतळ ग्वालियर ला असून ग्वालियर-झाशी हे अंतर 103 की.मी. चे आहे.

लक्ष्य दया:

तुमच्या जवळ झाशी किल्ला बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…

धन्यवाद्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here