Sunday, September 24, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

छत्रपती शिवरायांचा एक मावळा “जीवा महाला”

Jiva Mahala Mahiti

”होता जीवा म्हणून वाचला शिवा”

या ओळी इतिहासात ज्या क्षणी कोरल्या गेल्या त्या घटनेला आज तीनशे साडे तीनशे वर्ष होऊन गेलीत तरीदेखील आजच्या पिढीला सुद्धा त्या अवगत आहेत आणि माहिती करून घेण्याची इच्छा देखील आहे.

छत्रपती शिवरायांचा इतिहास जसा त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे गाजला तसाच तो त्यांच्या मावळ्यांमुळे देखील आजतागायत स्मरणात राहिला आहे…

शिवरायांचा एक एक मावळा हा ‘हिरा’ होता, स्वामिनिष्ठेने प्रेरित होता, प्रसंगी या शूर सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वराज्य अबाधित राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, किती नावं घ्यावी? या मावळ्यांनी स्वराज्य आपल्या प्राणापलीकडे जपले…आणि यातच छत्रपती शिवरायांची सावली बनून त्यांचे रक्षण करणारा त्यांचा अंगरक्षक म्हणजे ”जीवा महाला”.

छत्रपती शिवरायांचा एक मावळा “जीवा महाला” – Jiva Mahala

Jiva Mahala

जीवा महालाचे बालपण – Jiva Mahala History in Marathi

जीवामहालाचे मूळ गाव वाई तालुक्यातील कोंडवली बुद्रुक. जीवाचे वडील हे शहाजी महाराजांच्या सेवेत होते. एका युद्धप्रसंगात त्यांना त्यांचा पाय गमवावा लागला होता.

जीवा महालाच्या रक्तातच शौर्य पराक्रम आणि कुटुंबात स्वामीनिष्ठा होती, ज्याचे बाळकडू लहानपणापासून त्याला मिळाले होते.

पहेलवानीचे धडे त्याला आपल्या वडिलांकडून मिळाले होते. जीवा महाला दांडपट्टा चालविण्यात अत्यंत वाकबगार होता.

प्रतापगडाच्या पायथ्या जवळची ऐतिहासिक भेट:

प्रतापगडाच्या पायथ्याशी जेंव्हा शिवाजी महाराजांची आणि अफजलखानाची भेट ठरली त्यावेळी महाराजांसमवेत संभाजी कावजी आणि विश्वासू जीवा महाला हे होते तर अफजलखाना समवेत त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा हा होता.

शामियान्या जवळ पोहोचताच शिवाजी महाराजांनी निरोप धाडला की अफजलखाना पासून सय्यद बंडाला दूर उभे करा आम्हाला त्याची भीती वाटते.

गाफील असलेला अफजलखान महाराजांच्या घाबरण्याला खरे समजून मनोमन आनंदित होत होता.

भेटीदरम्यान जवळ कोणतेही शस्त्र ठेवायचे नाही हे ठरल्यानंतर देखील खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपविला होता.

महाराज जवळ येताच अफजलखानाने त्यांना मिठी मारली आणि त्यांना आपल्या बगलेत दाबून बिचव्याचा वार केला…

खान दगा करेल याची महाराजांना मनोमन पूर्ण खात्री होती…महाराजांनी चिलखत घातलेले असल्याने बिचवा करकर करत अंगावरून घासून गेला.

त्याक्षणी शिवाजी महाराजांनी लपविलेली वाघनख काढली आणि अफजलखानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला.

अनपेक्षित वाराने भेदरलेल्या अफजलखानाने दगा-दगा असा आकांत केला.

जीवा महालाची समय-सूचकता:

दूर उभ्या असलेल्या सय्यद बंडाने शिवाजी महाराजांवर वार केला, परंतु त्याक्षणीच जीवा महालाने दांडपट्टा चालवून त्याचा हात वरच्या-वर कापला.

आपल्या शिवरायांचे प्राण वाचविले.

या प्रसंगामुळेच ”होता जीवा म्हणून वाचला शिवा” या ओळी इतिहासात अजरामर झाल्या.

या प्रसंगी जीवा महालाचे वय 25 च्या आसपास असावे…परंतु त्याच्या समयसुचकतेने छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचले.

जीवा महालाची समाधी – Jiva Mahala Samadhi

रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी आंबवडे गावी वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळा जवळ जीवा महाला यांची समाधी आहे.

ज्या तऱ्हेने इतिहासाच्या पानांमध्ये प्रतापगड येथील अफजलखानाची आणि शिवरायांची भेट अजरामर झाली आहे अगदी त्याच पद्धतीने या लढाईतील जीवा महालाचे अद्वितीय शौर्य देखील सगळ्यांच्या स्मरणात कायमचे कोरल्या गेले आहे.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ जीवा महाला बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Previous Post

“तुम्हाला माहित आहेत काय? असे कायदे जे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.”

Next Post

सबवे रेस्टोरेंटची अपयशाकडून यशाकडे जाण्याचा प्रवास…

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Subway Success Story

सबवे रेस्टोरेंटची अपयशाकडून यशाकडे जाण्याचा प्रवास...

Stress Management in Marathi

"टेन्शन फ्री व्हायचे आहे का? मग आवर्जून वाचा ह्या काही टिप्स"

Richest people in the world in Marathi

"जाणून घ्या त्या लोकांची नावे जे जगातून सर्वात श्रीमंत आहेत.”

Interesting Facts About India

अवाक् व्हाल भारतातील या 25 गोष्टी वाचून

Eklavya

महाभारतातील महान असे पात्र.....एकलव्य यांची कथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved