छोटा भीम ने राजकुमारी इंदुमती सोबत लग्न करून चुटकी ला धोका दिला का? ट्रेंड च्या नावावर काही पण…

Justice for chutki

भारतात कोरोनाचा कहर चालूच आहे की देशात वादळे, भूकंप आणि बऱ्याच गोष्टी घडत आहेत. या सर्वांमध्ये एक मजेशीर गोष्ट व्हायरल होताना आपल्याला दिसत असेल ती म्हणजे एका कार्टून सिरीयल मधील “छोटा भीम” विषयी. येत्या काही दिवसात आपण सोशल मीडियावर या विषयी Memes, आणखी काही पोस्ट पाहिल्या असतील ज्यामध्ये हे सांगितल्या जात आहे की, छोट्या भीम ने चुटकी सोबत नव्हे तर राजकुमारी इंदुमती सोबत लग्न केले. कार्टून्स पाहायची आवड असेल तर आपल्याला हा लेख वाचण्यास मजा येईल.

छोटा भीम ने राजकुमारी इंदुमती सोबत लग्न करून चुटकी ला धोका दिला का? – Chhota Bheem Married with Princess Indumati

Justice for chutki
Justice for Chutki

आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ह्या विषयी माहिती नसेलही कि हे आहे तरी काय तर काळजी नका करू आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की, “छोटा भीम” ही एक कार्टून सिरीयल आहे, ज्या सिरीयल ची सुरुवात २००८ पासून Pogo चॅनेल वर झाली होती. या सिरीयल मध्ये एक छोटंसं राज्य  दाखवलेले आहे, आणि यामध्ये मुख्य भूमिका भीम नावाच्या मुलाची आहे जो हुशार, आणि बहादूर आहे.

जेव्हा केव्हाही त्या राज्यावर संकट येतं तेव्हा भीम त्या राज्याला स्वतःच्या ताकदीचा आणि कुशाग्र बुद्धीचा वापर करून वाचवतो. त्याच्या सोबत या सिरीयल मध्ये अनेक पात्र दाखवले आहेत जे भीम चे जवळचे मित्र असतात त्यात चुटकी, राजू, जग्गू, कालिया, ढोलू, आणि भोलू, ह्यांचा समावेश आहे. या सिरीयल मध्ये चुटकी ही भीम ची सर्वात चांगली मित्र दाखवलेली आहे.

Justice for chutki 2

जेव्हाही भीम एखाद्या संकटात असतो तेव्हा चुटकी तिच्या आईने बनविलेले बेसनाचे लाडू भीम ला खायला देऊन त्याची ताकद वाढविण्यास मदत करते. आणि भीम लाडूंना खाऊन शत्रूंची दोन हात करतो आणि जिंकतो सुध्दा, संपूर्ण राज्याला संकटातून वाचविल्या बद्दल कधी कधी भीम ला राजाकडून पुरस्कार सुध्दा मिळत असतो. त्या राज्याचा कारभार राजा इंद्रवर्मा पाहत असतो आणि त्याला एक मुलगी असते तिचे नाव असते राजकुमारी इंदुमती.

आपण म्हणणार की हे काय आहे सर्व तर आपल्याला सांगू इच्छितो आपण आजकाल ट्विटर, फेसबुक, आणखी बाकी सोशल मीडिया प्लँटफॉर्म वापरत असणार तर आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळाली असेल की भीम ने चुटकी सोबत लग्न न करता राजकुमारी इंदुमती सोबत विवाह केला?

तर आपल्याला सांगू इच्छितो की छोटा भीम सिरीयल ला बनविणारे भीम गोल्ड अनिमेशन यांच्या द्वारे सांगण्यात आले की सिरीयल मध्ये अश्या प्रकारे काहीही घटना घडलेली नाही. छोटा भीम आणि बाकी पात्र अजून लहान मुलं आहेत त्यांना लहानच राहू द्या. त्यांना लग्न, प्रेम या बंधनात अडकविण्याचे प्रयत्न करू नका. ते सर्व मित्रच ठीक आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ही प्रतिक्रिया त्यांनी ट्विटर वर #JusticeForChutaki असा ट्रेंड सुरू झाल्यावर दिली होती.

आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here