कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती

Kapil Dev Information in Marathi

क्रिकेट जगतातील एक दिग्गज नाव म्हणजे कपिल देव. उत्कृष्ट फलंदाजी (Batting) सोबत गोलंदाजी (Bowling) मध्ये देखील अव्वल असलेले कपिल देव हे एक अष्टपैलू (All Rounder) खेळाडू आहेत. १९८३ साली भारतीय क्रिकेट संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली दैदिप्यमान विजय मिळवला होता. भारतीय संघाने जिंकलेला हा प्रथम विश्वचषक (World Cup). एखादी गोष्ट मिळवायची असेल तर योग्य नेतृत्वाची गरज असते, आणि ते नेतृत्व कपिल देव यांच्या रूपाने भारतीय संघाला मिळालं होत.

कपिल देव यांच्या विषयी संपूर्ण माहिती – Kapil Dev Information in Marathi

Kapil Dev Information in Marathi
Kapil Dev Information in Marathi

कपिल देव यांच्या बद्दल थोडक्यात – Kapil Dev History in Marathi

नाव (Name) कपिल देव (Kapil Dev)
जन्म (Birth) ६ जानेवारी १९५९ (6th January 1959)
जन्मस्थान (Birth Place) चंदिगढ (Chandigarh)
वडील (Father) रामलाल निखंज (Ramlal Nikhanj)
आई (Mother) राजकुमारी लाजवंती देवी (Rajkumari Lajvanti Devi)
पत्नी (Wife) रोमी भाटीया (Romi Bhatiya)
मुलगी (Daughter) अमिया देव (Amiya Dev)
व्यवसाय (Profession) भारतीय क्रिकेट पटू, समालोचक, क्रिकेट विशेषज्ञ, अभिनेता (Indian Cricket Player, Commentator, Cricket Expert, Actor)
पहिला सामना (Debut Match) १९७८ साली पाकिस्तान विरुद्ध (In 1978 against Pakistan)
सर्वाधिक धावा (एकदिवसीय सामना) (Best Score in ODI) १७५ (नाबाद) (175 Runs, Not Out)
सर्वाधिक बळी (एका सामन्यात) (Best Wicket Score in Single Match) ५ (5)
खेळाडू प्रकार (Player Type) अष्टपैलू (All Rounder)
निवृत्ती (Retirement) १९९४ साली (In 1994)

कपिल देव यांचा जन्म आणि कुटुंब : Kapil Dev Biography & Family

कपिल देव यांचा जन्म चंदिगढ येथे ६ जानेवारी १९५९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामलाल निखंज तर आईचे नाव राजकुमारी लाजवंती असे आहे. कपिल देव यांना एकूण सहा भाऊ-बहिणी आहेत. त्यांनी आपले प्रारंभीचे शिक्षण चंडीगड येथील डी.ए.व्ही. शाळेतून पूर्ण केले. तर पुढील शिक्षण सेंट एडवर्ड कॉलेज येथून घेतले. १९८० साली त्यांनी रोमी भाटीया यांच्यासोबत विवाह केला. १६ जानेवारी १९९६ साली त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले असून तिचे नाव अमिया देव असे आहे.

Kapil Dev Family
Kapil Dev Family

कपिल देव यांना आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून क्रिकेटची आवड होती. त्यांना क्रिकेट विश्वातील नामांकित कोच देश प्रेम आझाद यांच्याकडून क्रिकेटचे धडे मिळाले होते.

कपिल देव यांची क्रिकेट मधील कारकीर्द : Kapil Dev Cricket Career

Kapil Dev Cricket Career
Kapil Dev Cricket Career
 • १९७८ साली त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला होता.
 • आपल्या जीवनातील पहिले शतक त्यांनी १९७९-८० साली हरियाना विरुद्ध दिल्ली या सामन्यात झळकावले.
 • या नंतर १९७९ सालीच वेस्टइंडीज संघ विरुद्ध त्यांनी आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. यावेळी त्यांनी केवळ १२४ चेंडूत १२६ धावा काढल्या होत्या.
 • १९८२-८३ साली भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व सुनिल गावस्कर यांच्या कडून कपिल देव यांच्याकडे सोपविण्यात आले.
 • याच दरम्यान १९८३ सालचे विश्वचषक सामने सुरु झाले. आजपर्यंत जे कधी घडले नव्हते ते या साली घडले. कपिल देव यांनी अंतिम सामन्यात १७५ धावा काढत भारताला आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला होता.
 • या नंतर कपिल देव यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. असे म्हटल्या जाते कि, या विजयानंतर क्रिकेट जगतात भारताला एक वेगळीच ओळख मिळाली.
 • १९९९ साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय क्रिकेट संघाचे कोच म्हणून कपिल देव यांची निवड केली.
 • आपल्या कसोटी कारकिर्दीत त्यांनी ४०० पेक्षा जास्त विकेट घेऊन ५००० धावा काढल्या आहेत.
 • यासोबतच ते क्रिकेट विशेषज्ञ आणि समालोचक (Commentator) म्हणून देखील प्रसिद्ध आहेत.

कपिल देव यांना मिळालेले सन्मान : Kapil Dev Awards and Honours

 • क्रिकेटमधील आपल्या अमुल्य योगदानाबद्दल कपिल देव यांना १९७९-८० सालचा ‘अर्जुन पुरस्कार’ देण्यात आला.
 • १९८२ सालचा पद्मश्री पुरस्कार देखील त्यांना मिळाला.
 • १९८३ साली विश्व चषकातील कामगिरीसाठी देव यांना विस्डन क्रिकेटर ऑफ द ईयर या पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • पद्म भूषण पुरस्कार (१९९१)
 • विस्डन क्रिकेटर पुरस्कार (२००२)
 • भारतीय प्रदेश सैन्याद्वारे लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मानित (२००८)
 • ICC हॉल ऑफ फेम पुरस्कार (२०१०)
 • सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार (२०१३)

कपिल देव यांचे चित्रपटातील योगदान : Kapil Dev Biopic

क्रिकेट मध्येच नाही तर सिनेमा मध्ये देखील कपिल देव यांनी आपले योगदान दिले आहे. ‘आर्यन अनब्रेकेबल’, ‘चैन कुली कि मैन कुली’, ‘मुझसे शादी करोगी’ इ. सिनेमांतून देव झळकले आहेत. या शिवाय त्यांच्या जीवनावर आधारित एक जीवनपट देखील येत असल्याची चर्चा आहे. या सिनेमात कपिल देव यांच्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंह काम करणार आहेत.

कपिल देव यांच्या बद्दल थोडक्यात माहिती : Kapil Dev Information

 • एकूण संपत्ती (Net Worth) : जवळपास ३० दशलक्ष डॉलर ($30 Million)
 • उंची (Height) : ६ फुट (१८२.८८ सेमी) (6 feet /182.22 cm)
 • वजन (Weight) : ८० किलो (१७६ पौंड) (80 kg / 175 lb.)
 • वय (Age) : ६२ वर्षे (२०२१ साली) (62 years till 2021)
 • गोलंदाजीची गती (Bowling Speed) : उल्लेख नाही (Not Mentioned)

काही महत्वाची प्रश्ने : Quiz on Kapil Dev

1. कपिल देव यांनी एकदिवसीय अंतर राष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक किती धावा काढल्या आहेत ?

उत्तर : १७५ (नाबाद)

2. कपिल देव यांना कोणत्या टोपण नावाने ओळखल्या जाते ?

उत्तर : KD आणि हरियाना हरिकेन

3. कपिल देव यांनी आपला पहिला एक दिवसीय आंतर राष्ट्रीय क्रिकेट सामना कोणत्या साली खेळला ?

उत्तर : १ ऑक्टोबर १९७८ साली पाकिस्तान विरुद्ध.

4. कपिल देव यांची मुलीचे नाव काय आहे ?

उत्तर : अमिया देव.

5. कपिल देव यांची एकूण संपत्ती किती आहे ?

उत्तर : जवळपास ३० दशलक्ष डॉलर ($ 30 Million)

6. कपिल देव यांची उंची किती आहे ?

उत्तर : ६ फुट (१८२.८८ सेमी.)

7. १९८३ साली कोणाच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता ?

उत्तर : कपिल देव.

8. कपिल देव यांना कोणत्या साली भारतीय संघाचे कर्णधार म्हणून निवडण्यात आले ?

उत्तर : १९८२-८३ साली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here