Home / Marathi Biography / रणवीर सिंह यांची जीवनी | Ranveer Singh Biography In Marathi

रणवीर सिंह यांची जीवनी | Ranveer Singh Biography In Marathi

रणवीर सिंह भावनानी  / Ranveer Singh हिंदी चित्रपटाचे भारतीय अभिनेते आहेत. इंडियाना युनिवर्सिटी ब्लु मिंगटन येथून स्नातक पदवी पूर्ण केल्यावर भारतात आपले कॅरियर बनविण्यासाठी परत आले.

साल २०१० मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा हिंच्या सोबत यशराज फिल्म्स यांची रोम्यांटिक कॉमेडी फिल्म “ब्यांड बाजा बारात” ने अभिनयात प्रवेश केला. त्यांची हि फिल्म फार गाजली. त्यांच्या अलोचकांनी त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा केली. या फिल्म साठी त्यांना फिल्मफेअर चा उत्कृष्ट डेब्यू मेल अवार्ड सुद्धा मिळाला.

Ranveer Singh

रणवीर सिंह यांची जीवनी / Ranveer Singh Biography In Marathi

यानंतर रणवीर सिंह यांनी रोमांटिक ड्रामा फिल्म लुटेरा ( २०१३ ) नंतर दिपिका पदुकोन यांसोबत संजय लीला भन्साळी यांच्या ट्रयाजिक रोमान्स फिल्म गोलीयो कि रासलीला “रामलीला” (२०१३) केली. हि त्यांच्या करीयर ची सर्वात उत्कृष्ट फिल्म ठरली. यानंतर त्यांनी गुंडे (२०१४) केली. २०१५ मध्ये कॉमेडी ड्रामा फिल्म “दिल धडकने दो” केली.

ऐतिहासिक पृष्ठभूमी असलेल्या बाजीराव मस्तानी यांच्या प्रेमकथेवर आधारित बाजीराव मस्तानी (२०१५) हि सर्वात महागडी आणि कमाई करणारी फिल्म ठरली. या फिल्ममुळे रणवीर यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. त्यांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट अभिनेता अवार्ड सुद्धा मिळाला.

रणवीर सिंह चे सुरुवातीचे जीवन प्रवास

रणवीर यांचा जन्म ६ जुलै १९८५ साली एका सिंधी परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जगजीत सिंह भावनांनी आहे. त्यांच्या आईचे नाव अंजू होते. त्यांच्या आजी-आजोबाचे नाव चांद बुके आणि सुंदर सिंह भावनांनी होते. ते विभाजानाच्या वेळी भारतात मुंबईला स्थानांतरीत झाले होते. रणवीर सिंह यांना एक मोठी बहिण व एक लहान बहिण आहे. मोठ्या बहिणीचे नाव रितिका व लहानीचे साहिमा आहे.

रणवीर मध्ये लहानपणापासूनच एक अभिनेता बनायची इच्छा मनात बाळगायचे त्यासाठी त्यांनी शाळेत, महाविद्यालयात अभिनय आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचे नंतर एच आर कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, मुंबई मध्ये प्रवेशानंतर त्यांना कळून चुकले कि चित्रपटामध्ये काम करणे इतके सोपे नाही. अनेक लोक त्यांना, त्यांच्या परिवाराला फिल्म इंडस्ट्रीशी जुळलेले नसल्याने यश मिळू शकत नाही. असा सल्ला द्यायचे. तरीही मनात अभिनयाची प्रबल इच्छा होती.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेतील इंडियाना कला विद्यापीठात जाऊन कला स्नातकाची पदवी घेतली. विद्यापीठात त्यांनी अभिनयाचे रीतसर धडे घेतले. भारतात अगदी किशोर वयातच ते थीएटरमध्ये जाऊ लागले होते.

आपले शिक्षण पूर्ण करून ते २००७ मध्ये भारतात परत आले. नंतर काही काळ ते ओ & एम आणि जे. वाल्टर थोपसन सारख्या एजन्सीकरिता जाहिराती मध्ये काम सुरु करू लागले. त्यानंतर त्यांनी काही काळ असिस्टंट डिरेक्टरचे कामहि केले. अभिनयात करियर करण्यासाठी त्यांनी ते कामही सोडून दिले त्यानंतर विविध ठिकाणी अभिनयासाठी ऑडिशन देऊ लागले. काही वेळ छोटेमोटे रोल सुद्धा केले.

रणवीर सिंह ला मिळालेल्या अवार्ड आणि नामांकन

रणवीर सिंह ला आतापर्यंत २ फिल्मफेअर अवार्ड मिळाले आहेत. ज्यामध्ये ब्यांड बाजा बारात (२०१०) साठी उत्कृष्ट पुरुष डेब्यू अवार्ड आणि अभिनेत्र्या प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोन यांच्या सोबत अभिनित बाजीराव-मस्तानी (२०१६) साठी उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला यासोबतच २०१३ मध्ये गोलीयो कि रासलीला “रामलीला” साठी त्याचे नामांकन उत्कृष्ट अभिनेत्यासाठी झाले होते.

अशी हि फिल्मी बाजीरावची कहाणी जी बॉलीवूडमध्ये त्याच्या संघर्षाचे कथन करते. जी याद्वारे सांगते कि जर माणसाने ठरवले तर आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. आपण सर्व अशा रणवीर सिंह यांच्या साहसाला नमन करुया.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी रणवीर सिंह बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा रणवीर सिंह यांची जीवनी / Ranveer Singh Biography In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Ranveer Singh Biography – रणवीर सिंह यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

प्रसिध्द कवयित्री संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती…

Sant Muktabai Information in Marathi महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखले जाते या संतामध्ये ज्याप्रमाणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *