Saturday, June 10, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

करिश्माकपूरचा जीवन परिचय

करिश्मा कपूर / Karishma Kapoor भारतीय बॉलीवूड चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. नावाजलेले कपूर कुटुंबाची ती तिसऱ्या पिढीची सदस्य आहे.

अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांची प्रथम कन्यारत्न करिश्माच्या अंगा रक्तातच अभिनय असल्यामुळे ६ पासूनच शिक्षण सोडून अभिनयात आपले करियर करायचे ठरविले.

आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या १७ व्या वर्षी १९९१ मध्ये “प्रेम कैदी” या चित्रपटापासून केली.

त्यानंतर त्यांनी लगातार जिगर (१९९२) अनाडी (१९९३) राजाबाबू, सुहाग (१९९४) कुली न.१, गोपी किशन (१९९५) साजन चले ससुराल (१९९६) सारखे यशस्वी चित्रपट केले.

Karisma Kapoor

करिश्मा कपूरचा जीवन परिचय / Karishma Kapoor Biography in Marathi

करीश्माचा जन्म मुंबई मध्ये झाला त्यांचे आईवडील त्यांना “लोला” म्हणून हाक मारायचे. त्यांची आई ख्रिश्चन आणि वडील हिंदू सिंधी होते.

अभिनेता हरी शिवदासानी यांची भाची आणि महान अभिनेता राज कपूर याची नात.आणि प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर यांची बहिण आहे.

करिश्मा कपूरची आई बबिता एक अभिनेत्री होत्या त्यांची मोठी बहिण “साधना”ह्या एक चांगल्या अभिनेत्री होत्या.

आपल्या वडिलांकडून पंजाबी समुदायाशी चांगले संबंधित आहेत तर आई कडून सिंधी आणि ब्रिटीश समुदायाशी सबंधित आहेत.

करिश्माने कॅथेड्रल अंड जोन केनन स्कूल मधून आपले शिक्षण ग्रहण केले.

करिश्मा कपूर चे वयक्तिक जीवन – personal life of Karishma Kapoor

पंजाबमधील सिंधी परिवाराची संबंध असलेली करिश्मा कपूर १९९२ ते १९९५ मध्ये संबंध तुटेपर्यंत चित्रपट “जिगर”मधील सहकलाकार “अजय देवगन” यांच्या प्रेम संम्बंधात अडकली होती.

यानंतर साल २००२ मध्ये अभिषेक बच्चन यांच्याशी त्यांचे सुत जुळून काही महिन्यांनी साखरपुडा सुद्धा झाला होता, मात्र हे नात सुद्धा जास्त वेळ टिकले नाही.

शेवटी २९ सप्टेंबर २००३ मध्ये तिने उद्योगपती संजय कपूर यांच्याशी विवाह केला जे सिक्स्ट इंडिया नावाच्या कंपनीचे संचालक आहेत.

करिश्मा कपूर यांना एक मुलगी समीरा जिचा जन्म २००५ मध्ये झाला आणि एक मुलगा कियान ज्याचा जन्म २०१० मध्ये झाला होता.

२०१४ मध्ये दोघांमध्ये स्वमताने घटस्फोट करिता न्यायालयात अर्ज केला होता.२०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

फिल्मी करियर

१९९६ मध्ये करिश्मा कपूर हिने राजा हिंदुस्तानी साठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवार्ड जिंकला होता. हि तिच्या फिल्मी करीयरची फिल्म होती.

त्यानंतर तिने रोम्यांटिक ड्रामा असलेला “दिल तो पागल है” (१९९७) साठीचा उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा नेशनल फिल्म अवार्ड जिंकला. यानंतर तिने फिजा (२०००) आणि जुबेदा (२००१) मध्ये वेगळ्या भूमिका केल्या.

त्यांच्या अभिनयासाठी त्यांना फिल्म फेअर सेरेमनी मध्ये उत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटीक्स) चा अवार्ड सुद्धा मिळाला.

याप्रकारे करिश्मा कपूर हिने स्वतःला मुख्य नायिका म्हणून सिद्ध केले.

बॉलीवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्र्यांमध्ये करिश्मा कपूरची गणना केली जाते.

वोग स्टेट्स यांच्या अनुमानानुसार आपल्या वेळेस करिश्मा राष्ट्रीय स्टाईल आईकोन या नावाने प्रसिद्ध होत्या.

बॉक्स ऑफिस इंडिया च्या टोप 5 एकट्रेस ऑफ 1990-90 मध्ये करिश्मा कपूर पहिल्या क्रमांकावर होत्या.

आपल्या करियर मध्ये करिश्मा कपूरने एक राष्ट्रीय फिल्म अवार्ड आणि चार फिल्मफेअर अवार्ड जिंकले.

आणि सहा वेळा त्यांना फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळाले होते.

फिल्मी अभिनयासोबत करिश्मा कपूरने टेलीविजन सिरीज करिश्मा – दि मिरयाकल्स ऑफ डेस्टिनी (२००३) मध्ये मुख्य भूमिका केली होती.

रियालिटी शो “नच बलिये” आणि “हंस बलिये” मध्ये जबाबदार जज सुद्धा बनल्या होत्या.

२००३ मध्ये संजय कपूर सोबत विवाहानंतर २००४ नंतर त्यांनी चित्रपट केले नाही.

साल २०१२ मध्ये पदार्पण करीत डेंजरस इश्क मध्ये दमदार भूमिका केली.

सामाजिक कार्य

नायिका म्हणून काम करण्यासोबतच करिश्मा अनेक सामाजिक कार्य पण करतात. त्या अनेक सामाजिक संस्थांशी संपर्कात असतात. ज्यामध्ये सलमान खान यांच्या “बीइंग हुमन” फौंडेशन चा समावेश आहे. यासोबत त्या स्तन कॅन्सर विषयी जनजागृती साठी २०१२ मध्ये पिंकथोने याचि गुडविल एम्बेसेडर बनल्या होत्या.

२०१३ मध्ये करिश्मा ने प्रियांका चोपडा यांच्या सोबत मिळून भारतात मुलींच्या हक्कांसाठी चालविल्या गेलेल्या अभियानामध्ये भाग घेतला.

यासोबत त्या इंटरनेशनल स्किन केयर ब्रांड सोबतही काम करत असतात.

सध्या करिश्मा इंटरनेशनल कॉस्मेटिक एंड ब्यूटी ब्रांड“गार्नियर कलर” चा प्रमुख चेहराही आहेत.

त्यासोबतच त्या मुख्य डिजाईनर मनीष मल्होत्रा, अर्पित मेहता, विक्रम फडणीस यांच्यासाठी राम्पवॉक पण करतात यासोबतच करिश्मा अर्जुन रामपाल, ह्रितिक रोशन, करीना कपूर आणि आफताब शिवदासानी यासोबत युनायटेड स्टेट (U.S.A.) मध्ये एका लाइव कंसरट मध्येही भाग घेतला होता.

Previous Post

रणवीर सिंह यांची जीवनी

Next Post

दूध प्यायचे फायदे आणि नुकसान

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य) राजकीय कारकीर्द 1997 ते...

by Editorial team
July 13, 2022
Next Post
Advantage and Disadvantages of Milk

दूध प्यायचे फायदे आणि नुकसान

Nalanda History

विशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास

Self Improvement Tips

स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी एकदम खास टिप्स

Jackie Shroff

जैकी श्रॉफ यांची कहाणी

कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास | Qutubuddin Aibak History In Marathi

कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास | Qutubuddin Aibak History In Marathi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved