‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत

Kavita Raut Mahiti

शहरात सर्व सुख-सोयी, मार्गदर्शन मिळूनही कधी कधी आपले ध्येय गाठण्यात, स्वप्न पूर्ण करण्यात आपण अपयशी ठरतो. आणि तुम्ही जर अशा ठिकाणी राहत असाल कि, जिथे कुठल्याच सुविधा नाहीत, पिण्याचे पाणी सुद्धा लांबवरून डोक्यावर आणावे लागते तेव्हा? पण अशा परिस्थितीतही एक खेळाडू जी आदिवासी पाड्यावर राहून, लांबून डोक्यावर पाणी आणून. पायात घालायला बूट काय पण साधी चप्पलही नाही. ती ऑलिम्पिक साठी पात्र ठरते.

‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत – Kavita Raut Information in Marathi

नाव कविता राऊत
जन्म (Birthday) 05 मे 1985
गाव नाशिक जिल्ह्यातील सावरगाव हे गाव
खेळ धावपटू

तुमच्या स्वप्नांना जिद्दीचे आणि मेहनतीचे पाठबळ लाभले की, तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचलेच समजा. हे सिद्ध करून दाखवले नाशिक जिल्ह्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या सावरगाव या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय लांब पल्ल्याची धावपटू कविता राऊत हिने.

कविता राऊत ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणूनही ओळखली जाते. पण तीचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. ती एक आदिवासी समाजातून आलेली खेळाडू. शाळेत शिकत असतांना सुरवातीला जेव्हा ती धावण्याच्या स्पर्धेसाठी नाशिक येथे गेली होती.

तेव्हा तिच्या पायात साधी चप्पलहि नव्हती ती त्या स्पर्धेत अनवाणीच धावली तिला या स्पर्धेत यश आले नाही.

तिची हि कामगिरी प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या नजरेत भरली. त्यांनी तिच्यामधील वेगळेपण ओळखले.

त्यांना वाटले हिने जर तंत्र शुद्ध पद्धतीने सराव जर केला तर नक्कीच हि मुलगी इतिहास घडवेल.

त्यांनी तिच्या आई वडिलांना याबद्दल कल्पना दिली त्यांनाही त्या गोष्टीचे महत्व पटले. डोंगर दऱ्यांमधून अनवाणीच कविताचा सराव चालू झाला..!

कविता राऊत यांचा मैदानावरील प्रवास – Kavita Raut Career

नंतर तीचा सराव प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या मदतीच्या साहाय्याने नाशिक मधील भोसला मिलिटरी स्कूल च्या मैदानावर सुरु झाला. त्यांनी तिला बूट घालून सराव करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून खऱ्या अर्थाने कविता राऊतचा प्रवास सुरु झाला.

सुरुवातीला गुजरातमधील गांधीनगर येथील झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत वयाच्या १६ व्या वर्षी रौप्य पदक मिळाले.

अधिकाधिक सराव करून तिच्या ध्येयाचा पाठलाग ती  करू लागली. मोठ्या स्पर्धांच्या पात्रता फेरीत तिला यश प्राप्त करून ती खऱ्या अर्थाने धावपटू खेळाडू म्हणून उदयास आली.

1958 मध्ये कार्डिफ राष्ट्रकूल स्पर्धेत मिल्खा सिंग च्या सुवर्ण पदकानंतर वैयक्तिक धावपट्टीवर हि कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. कविताने ईतिहास घडविला.

2009 मध्ये चीनमधील क्वांगचौ येथे झालेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी 10,000 मीटर्स च्या धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले.

आता कविता राऊत हे नाव अख्ख्या भारताला कळू लागले होते.

2010 मध्ये भारतात नवी दिल्ली येथे 19वी राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यातही कविता यांनी 10,000 मीटरच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावून पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले.

2011 मध्ये, कविता राऊतने यांनी भारतीय राष्ट्रीय खेळांमध्येही 5000 आणि 10,000 या दोन्ही स्पर्धांमध्ये विक्रम प्रस्थापित केले.

2013 मध्ये ती नाशिक येथील यांत्रिकी अभियंता असलेले महेश तुंगार यांच्यासोबत विवाहबद्ध झाली.

नंतर मार्गदर्शन, सरावाचा वेळ यांचा ताळमेळ न बसल्यामुळे हा काळ त्यांच्यासाठी संघर्षमय गेला.

ऑलिम्पिकसाठी पात्र –

कविता राऊत यांचा खेळ आता संपला असे काहींना वाटू लागले. पण परत जिद्दीने सराव करत त्यांनी गुवाहाटीमध्ये ‘सॅफ’ स्पर्धेत पूर्ण मॅरेथॉन मध्ये विक्रम घडवत सुवर्ण पदक पटकाविले आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्या.

४२ की.मी. अंतर तिने ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी लागणाऱ्या अंतराच्या 7 मिनिटे आधी पूर्ण केले.

त्यावेळी कविता राऊत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होऊन त्यांनी त्यांचे खूप कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाहि दिल्या होत्या.

२०१६ मध्ये ब्राझील येथील रिओ दि जेनेरिओ या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मात्र त्यांना अपयश आले.

लांब अंतराची धावपटू कविता राऊत यांना अनेक पुरस्कार मिळाले पण भारत सरकारचा मानाच्या  अश्या अर्जुन पुरस्काराने २०१२ साली त्यांना सन्मानित करण्यात आले.

कविता राऊत यांचा हा प्रवास जरी थक्क करणारा आहे पण तयार होणाऱ्या, येणाऱ्या नवीन खेळाडू पिढीसाठी त्या आणि त्यांचा हा प्रवास नक्कीच आदर्श म्हणून राहतील यात शंका नाही.

असेच काही माहितीपर लेख जाणून घेण्यासाठी जुळून राहा माझी मराठी सोबत.

धावपटू कविता राऊत बद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – FAQ About Kavita Raut

प्र. १. कविता राऊत ह्या कोण आहेत?

उ. कविता राऊत ह्या लांब अंतर धावणाऱ्या धावपटू आहेत.

प्र. २. कविता राऊत ह्यांचे मूळ गाव आणि जिल्हा कोणता आहे?

उ. गाव सावरपाडा, जिल्हा नाशिक.

प्र. ३. भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने कविता राऊत यांना सन्मानित केले आहे?

उ. अर्जुन पुरस्कार – २०१२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here