माणुसकीला काळिमा फासणारी केरळमधील घटना

संपूर्ण जगात कोरोनाचा प्रकोप चालू आहे, चक्रीवादळ, भूकंप अश्या अनेक घटनांच्या मध्ये एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना आपल्याला केरळ मध्ये पाहायला मिळाली. केरळच्या मलाप्पूरम येथे एक गर्भावती हत्तींणी भुकेने व्याकुळ होऊन अन्नाच्या शोधात मानवी वसाहती जवळ आली.

काही बिनडोक तसेच माणुसकी शिल्लक नसलेल्या लोकांनी त्या एका गर्भवती हत्तीणीची निर्घृणपणे हत्त्या केली, ती बिचारी अन्नाच्या शोधात होती आणि मानव जातीला कलंक असलेल्या त्या लोकांनी त्या गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी तसेच पेटते सुतली बॉम्ब भरलेलं एक अननस खायला दिला. भुकेच्या भरात त्या गर्भावती हत्तींणीने त्या नराधमांवर विश्वास ठेवून ते अननस खाल्ले पण त्या हत्तींणीला हे समजण्यास थोडा उशीर झाला की ते अननस नसून एक अननस असलेल्या आवरणात फटाके आणि सुतळी बॉम्ब आहेत.

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीची निर्घृण हत्या – The Killing of a pregnant elephant in Kerala is ‘meditated murder’

Kerala elephant news Marathi
Kerala elephant news Marathi

त्यांनंतर जे झाले ते प्रत्येकाचे हृदय थरथरून सोडणारे होते. त्या फटाक्यांचा विस्फोट त्या गर्भवती हत्तींणीच्या तोंडात झाला, आपण विचार करू शकता तिला किती वेदना झाल्या असतील, तरीही त्या गर्भवती हत्तीणी ने कोणालाही थोडासाही त्रास न देता त्या असह्य होणाऱ्या वेदनेसह तेथून निघून गेली आणि नजीकच्या एका तलावात जाऊन उभी राहिली, आपल्या तोंडाच्या अग्नीला शांत करण्यासाठी ती पाण्यात एकाच ठिकाणी ३ दिवस उभी राहिली, तिला होणाऱ्या त्या असह्य वेदना ती सतत ३ दिवस सहन करत होती.

पण त्या तीन दिवसाच्या संघर्षानंतर तिने स्वतःचे प्राण सोडले. त्यांनंतर त्या हत्तींणीला दोन हत्तींच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले, मरण पावल्या नंतर केलेल्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये ही गोष्ट समोर आली की ती हत्तीणी गर्भवती होती. आणि तिच्या गर्भातून एक मेलेलं बाळ बाहेर काढण्यात आले.

या घटनेवरून देशात सगळीकडे आक्रोश उठला आहे सोशल मीडियावर तर असे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. केरळमध्ये घडलेल्या या मानव जातीवर कलंक लावणाऱ्या लोकांची संपूर्ण भारतातुन निंदा होत आहे, देशाचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या घटनेबद्दल केरळच्या सरकार ला अहवाल मागितला आहे आणि या घटनेचा विरोध करत त्यांनी असे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केल्या जाईल असे सांगितले आहे.

पण या प्रकारच्या घटनांमुळे तर आपल्याला निसर्गाचा प्रकोप सहन करावा लागत नसेल? किंवा आपल्यावर निसर्ग अश्या गोष्टींमुळे तर रुसला नसेल? ह्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. अश्याच लेटेस्ट गोष्टींसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top