खंडोबाची आरती

Khanderayachi Aarti

पुणे जिल्हातील जेजुरी या गावी वसलेले खंडोबा किंवा खंडेराय हे देवस्थान आपण सर्वांनाच परिचित आहे. या ठिकाणी दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांची दरोरोज गर्दी पाहायला मिळते.

मुख्यत्वे करून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यातील हिंदू धार्मिक लोकांचे लोकप्रिय दैवत असल्याने याठिकाणी या राज्यातील लोकांची विशेष गर्दी पाहायला मिळते. आपल्या महाराष्ट्र राज्यांतील अनेक भाविक त्यांना आपले कुलदैवत देखील मानतात.

मित्रांनो, नावासला पावणाऱ्या खंडोबा रायाचा आशीर्वाद आपणास देखील मिळावा याकरिता आपण सुद्धा नियमित त्यांची मनोभावे भक्ती करावी, पूजा करावी आणि नंतर आरती म्हणावी. आरती म्हणजे साक्षात खंडोबारायाना केलेली विनवणी होय. मित्रांनो, आम्ही या लेखाच्या माध्यमातून आपल्याकरिता खंडोबाराय यांच्या जेजुरी या स्थळाबद्दल ऐतिहासिक माहिती आणि आरतीचे लिखाण केलं आहे. या लेखातील आरती खास आपणासाठी लिहिली आहे.

खंडोबाची आरती – Khandobachi Aarti

khandobachi aarti
khandobachi aarti

जयदेव जयदेव जय खंडेराया भवतम संहारुनिया दाखवि निजमाया ॥धृ॥ ॥

शिवशंकर गौरीवर हर करुणाकर । निजभक्ताच्या साठीं घेउनि अवतार

भूलोकाच्या ठायीं येवुनि सत्वर ।

मणि – मल्हादिक दैत्या केला संहार ॥१॥

सर्वांगातें लावुनि भंडार …

कंठीं भूषण शोभे रुद्राक्षमाळा ।

सह्याद्रीचे वरुते बैसुनि अवलीळा ।

हरहर वदनीं बोलतसे वेळोवेळां ॥२॥

वसवोनिया बहुसुंदर सुस्थळ जेजोरी ।

महाळसा शोभतसे वामांकावरी ।

रघुविर – प्रिय अवतार तो हा मल्हारी ।

ह्मणवुनि निरंजन गुण गातो बहुपरी ॥३॥

खंडोबारायांच्या भक्तजणांची त्यांच्या चरणी घनिष्ट श्रद्धा आहे. शिवाय, भक्तांचे आपल्या खंडोबारायाच्या प्रती अशी मान्यता आहे की, खंडोबा हे साक्षात शंकराचा अवतार असून त्यांच्या हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपात्र असून त्यांनी चतुर्भुज रूप धारण करून आपल्या कपाळावर भंडारा लावलेला आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात स्थानापण असलेल्या मूर्तीच्या आधारे भक्त ही माहिती देतात. मित्रांनो, खंडोबा हे नवसाला पावणारे देव असल्याने भाविक नेहमीच त्यांच्यासमोर आपला नवस मांडत असतात.

तसचं, जेजुरी येथे चंपा षष्ठीच्या दिवशी मंदिरात हळदीची उधळण केली जाते. यानिमित्त या ठिकाणी यात्रेचे आयोजन देखील केलं जाते. वर्षभर मंदिरात अनेक कार्यक्रम साजरे केले जातात.

खंडोबा यांच्या मार्तंड भेंरव अवतार धारण करण्याबाबत पुराणात अनेक दंतकथा देखील प्रचलित आहेत.

त्यामुळेच जेजुरी येथील मंदिराला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं आहे. सहयाद्री डोंगराच्या रांगामध्ये घनदाट जंगलात वसलेले जेजुरी हे स्थळ पूर्वी लवमुनीची तपोभूमी होती.

लवमुनी याठिकाणी आपल्या आश्रमात राहून तपश्चर्या करीत असत. त्यावेळी लवमुनी राहत असलेल्या प्रदेशाच्या दक्षिणेकडील भागात मणी मल्ल नावाच्या राक्षसांनी थैमान घातले होते. ते नाहक ऋषीमुनींना त्रास देत असतं.

तसचं, त्यांचे आश्रम पडून, त्यांच्या पत्नींची विटंबना करीत असतं. त्याचप्रमाणे आश्रमातील गाई वासरांची हत्या करीत असतं. मणी मल्ल यांच्या त्रासाला कंटाळून तेथील ऋषींनी लवमुनी ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला.

आश्रमात राहून त्यांनी मणी मल्ल नावाच्या राक्षसांपासून सुटका करून घेण्यासाठी भगवान शंकराची आराधना करू लागले.  राक्षसांपासून आपली सुटका करून घेण्यासाठी ते भगवान शंकराला विनवणी करू लागले.

ऋषी मुनींची विनंती एकूण भगवान शंकरानी या भूमीवर मार्तंड भेंरव अवतार धारण केला. भगवान शंकराच्या मार्तंड भेंरव अवताराने ही भूमी पवित्र झाली. मार्तंड भेंरव आणि मणी मल्ल यांच्यात भीषण युद्ध झाले. या युद्धात भगवान शंकराने मणी मल्ल राक्षसांचा वध केला आणि आपले मार्तंड भेंरव नाव सिद्ध केले.

मणी मल्ल राक्षसांच्या वधानंतर मार्तंड भेंरव यांनी याठिकाणीच आपली राजधानी स्थापन करून ते त्याठिकाणी वस्तव्य करू लागले. त्यामुळे ही भूमी जयाद्री म्हणून प्रसिद्ध झाली. भगवान महादेव यांचे मार्तंड भेंरव या अवताराचे भूलोकावरील कार्य संपन्न झाले.

या गोष्टीवर अनंतकाळ लोटला गेला तरी, काडेपठारी प्रस्थानपिठी मार्तंड भेंरव मंदिरातच नांदत राहिले. कालांतराने या ठिकाणी मार्तंड भेंरव यांचे मंदिर बांधण्यात आले आणि मंदिराचे व्यवस्थापन करण्यासाठी दाने इनामे दिली गेली.

राजधानी जयाद्रीचे रुपांतर जेजुरीत करण्यात आले. अश्या प्रकारे या जेजुरी मंदिरा बाबत ऐतिहासिक कथा प्रचलित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here